निबंध स्पर्धा - माझे आवडते पुस्तक

Submitted by संयोजक_संयुक्ता on 27 January, 2011 - 18:37

mbs_nibandh.jpg

बिरबल आणि बादशहा, राजपुत्र ठकसेन, हिमगौरी... की विम्पी किड? चांदोबा, किशोर, चंपक आणि फँट्म, मॅन्ड्रेकचे कॉमिक्स.. छोट्यांना त्यांच्या आवडत्या पुस्तक/मासिकाबद्दल सांगण्याची संधी. पुस्तक कोणत्याही भाषेतलं असो, त्यांना ते का आवडतं याबद्दल त्यांनी मराठीत लिहायचं किंवा सांगायचं! कोणतं एकच नाही ठरवता येत? मग जेवढ्यांबद्दल लिहावं वाटेल तेवढ्यांवर लिहीता येईल. अगदी दहा ओळींपासून हज्जार ओळींपर्यंत..
ही स्पर्धा आहे हे लक्षात ठेवा!

१. स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.

२. प्रवेशिका लिखीत (स्कॅन स्वरुपात), ऑडियो किंवा व्हिडियो स्वरुपात पाठवता येतील. निबंध मराठीत असावा.

३. प्रवेशिका marathibhasha@maayboli.com या पत्त्यावर पाठवावी. सोबत पालकाने आपला मायबोलीवरचा आयडी कळवावा. पाल्याचे नाव व गट लिहावा तसेच पाल्याचे नाव जाहीर व्हायला नको असल्यास तसे नमूद करावे.

४. प्रवेशिका पाठवताना ई-पत्राच्या विषयात कृपया Marathi Bhasha : Aavadate pustak असे नमूद करावे.

५. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीखः २० फेब्रुवारी, २०११

आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.

संयोजक समितीशी marathibhasha@maayboli.com इथे संपर्क करावा किंवा ह्याच बातमीफलकावर आपला प्रश्न लिहावा.

मराठी भाषा दिवस २०११ च्या इतर कार्यक्रमांसाठी इथे बघा.

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक समिती, मिनी,

प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख वाढवून मिळेल काय? कृपया. काय आहे, १९ अन् २० ला मी इथं नाहीये. निबंध लिहून तयार आहे. फक्त तो टायपायचा बाकी आहे. विकांताला टाईप करणार होतो पण आता ते शक्य नाही. अन् आज उद्यात टाइप होईलसं वाटत नाही.

डुआय, लिंबुटिंबु

जगभरात २० तारीख संपेपर्यंत तुम्ही तुमच्या प्रवेशिका पाठवु शकता. त्यामुळे तुम्हाला जास्तीचे तास मिळु शकतायत.

डुआय, तुमचं लिखाण तुम्ही स्कॅन करुनही पाठवु शकता.

धन्यवाद!

संयोजक समिती,
अंतिम तारीख वाढवून मिळणार नाही तर. असो प्रयत्न करतो.

स्कॅन करणं शक्य असलं तरी ते मी करणार नाही कारण माझं अक्षर! ते वाचता येणं कठिण Sad

Pages