- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
धन्य ते गायनी कळा
सदस्य प्रवेश |
शास्त्रीय संगीत प्रश्नोत्तरेहिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताचा उगम कुठे आणि कसा झाला? माझ्या वाचण्यात आलेल्यापैकी काही theories खालील प्रमाणे: Theory क्र. १) हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीत हे पर्शियन म्हणजे इराणी संगीतातून निघालयं. साधारण बाराव्या शतकात हे संगीत भारतात आलं आणि त्या नंतर काही महान विभूतिंनी (उदा. तानसेन इत्यादि) त्या संगीताला वेगवेगळी स्वरूपं दिली जसे खयाल, ध्रुपद, ठुमरी, कजरी, टप्पा इ. Theory क्र. २) ही theory आपल्याला पार पुरातन काळात घेऊन जाते. ब्रम्ह्ना, हनुमान, शिव आणि क्रुष्ण ह्या देवादिकांनी चार 'मत' स्थापन केले. इथे 'मत' चा अर्थं 'मती' किंवा 'बुद्धी' असा घ्यावा. इथून पुढे ह्या सर्वं गायकी प्रचलित झाल्या. Theory क्र. ३) नारद मुनींनी गायन विद्या ही स्वर्गातून प्रुथ्विलोकांत आणली. अथर्वंवेदाचा पाठ हा हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताच्या स्वरांमध्ये केल्या जातो. वेदांचं पठण होऊ लागल्यापासून हे संगीत प्रचलित झालं. हा झाला mythology चा भाग. परंतु ह्या मागील व्यावहारिक संदेश काय असेल? ह्यातली कुठली theory खरी मानायची, आणि कितपत खरी मानायची? ह्यावर कुणि प्रकाश टाकू शकेल काय? वरील माहिती दुरुस्तं करावयाची असल्यास जरूर करावी. हा प्रश्न rakhalb यानी विचारला होता. |
|
आज जे सन्गीत कर्नाटकी किन्वा दक्षिणी म्हणून ओळखले जाते, तेच खरे भारतीय सन्गीत आहे, असे म्हणतात. आपण ज्याला उत्तर हिन्दुस्तानी शास्त्रीय सन्गीत म्हणून ओळखतो ते मुघल काळात सुरू झाले.
दक्षिणी सन्गीतात म्रुदुन्ग वापरतात. तबला हा मुघल काळात आला आणि हिन्दुस्तानी सन्गीताचा घटक बनला. मुघल सत्ताधीशाना भारतातील प्रत्येक वस्तू मोडण्याचा नाद होता... त्यातूनच म्रुदुन्ग मोडला जाऊन तबला तयार झाला असेल का? जाणकारानी शोध घ्यावा.
शास्त्रीय सन्गीताच्या परम्परेत लन्काधिपती रावणाचाही आदराने उल्लेख होतो... तो नेमका कशासाठी?
गजाननराव,
१. मुस्लीम आक्रमणाच्या पूर्वी भारतात एकाच प्रकारचे संगीत प्रचलीत होते. पण मुस्लिमांनी ज्याप्रकारे भारतातील राजकीय जीवन उध्वस्त केले त्याचप्रमाणे भारतातील संस्क्रुती व संगीतातही जाणूनबुजून भेसळ केली. भारतीय संगीतात तुर्की व फार्सी संगीत घुसवून त्याचे संपूर्ण स्वरूपच बदलून टाकले. दक्षिण भारतात मुस्लिमाचा प्रभाव फारसा नसल्यामुळे ते संगीत बदलले नाही. फक्त त्यातील भाषा संस्क्रुताऐवजी तेलुगु, तमिळ, कन्नड व मल्याळम या झाल्या. उत्तर भारतातील परिवर्तित संगीतालाच आज आपण , 'हिन्दुस्थानी संगीत' म्हणून ओळखतो("हिन्दुस्थानी" हा शब्द देखील अमीर खुस्रोनेच प्रचलित केलेला).
२. तबला या वाद्याला अत्यंत प्राचीन परंपरा आहे. वेदोत्तर काळात भारतात 'पुष्कर' नावाचे एक वाद्य प्रचारात होते. त्याला आजच्या तब्ल्याचे पितामह म्हणता येईल. म्रुदंगाला मोडून मुसलमान लोकान्नी तबला बनविला ह्या थिअरीला सबळ पुरावा उपलब्ध नाही.
३. असे म्हणतात की लन्काधिपती रावण हा उच्चकोतीचा संगीतज्ञ होता. शिव शंकराना त्याने शिव रंजन स्तोत्र गाउन प्रसन्न केले होते.