प्रसिद्ध वाक्ये व काव्यपंक्ती

Submitted by साधना on 27 January, 2011 - 01:04

माझी मुलगी येत्या मार्च मध्ये १०वीची परिक्षा देतेय. मराठीच्या परिक्षेसाठी निबंध लिहिताना प्रसिद्ध वाक्ये व काव्यपंक्तींचा आधार घेतला तर आपला निबंध जरा वेगळा वाटेल आणि त्यामुळे थोडे मार्क वाढतील अशी तिची अपेक्षा आहे. तिचे स्वतःचे वाचन आहे आणि त्यातले जे लक्षात राहते ते ती वापरतेच, पण सोबत तुला काही मिळाले तर पाठव अशी सुचना तिने मला केलीय. Happy

मी नेटवर आणि इतरत्र धुंडाळतेयच, पण कुठलीही मदत लागली की माबोवर धाव घ्यायची सवय लागलीय. म्हणुन ही विनंती - प्रसिद्ध किंवा अप्रसिद्ध लोकांची वाक्ये, काव्यपंक्ती किंवा इतर काही इथे दिलेत तर मदत होईल. इथे शोधताना सुभाषितांचा एक ब्लॉग सापडला तिथलेही काही घेतेय.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पंतप्रधान झालो तर..

असा विषय पूर्वी हटकून असायचा. त्यावर विनोदही प्रचलित आहेत. पण पूर्वी दूरदर्शनच्या जमान्यात जेव्हा दर्जेदार चर्चा चालायच्या तेव्हा एका शिक्षणतज्ञाने त्यामागची भूमिका स्पष्ट केली.

निबंधातून मुलाची समज, आकलन, लिखाण करण्याची पद्धत हे समोर येतं. दहावीच्या मुलाला आजूबाजूच्या वातावरणाचं काय आकलन असेल त्याचप्रमाणे त्याचा निबंध यायला हवा. उगाच त्या निबंधात अणुकरार, गॅट करार असे क्लिष्ट विषय आले कि घोटून घेतल्याचं दिसून येतं. मी पंतप्रधान झालो तर हा विषय मुलाच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा आहे. सगळीकडेच चांगले शिक्षक असणे शक्य नाही तेव्हा पालकांनीच ही भूमिका समजून घेऊन गृहपाठ करून घेणं गरजेचं आहे.

निबंध लिहीणं ही एक कला आहे हे लक्षात ठेवणं गरजेचंच आहे.

उत्तम निबंधाचा शेवटही तितकाच समर्पक असला पाहीजे. गुडाळलाय किंवा अपूर्ण वाटतोय असं झालं नाही पाहीजे. हे सरावानं येतं. मी चौथीला आणि सातवीला स्कॉलरशिपच्या परिक्षा दिल्या होत्या. त्या वेळी मराठीच्या पेपरचा झालेला अभ्यास पुढेही उपयोगात आला. त्या वेळी वेगवेगळी पुस्तकं असायची. आता कदाचित एकच असतं. आत्ताचं मी पाहीलेलं नाही पण फारसा फरक नसेल तर त्यातल्या भाषा विषयात चांगले निबंध दिलेले असतील. एकदा खात्री केलेली उत्तम !

साधना ताई

मी एक सुचवू का

तुमच्या मुलीकडून वेगवेगळे निबंध लिहून घ्या आणि ते इथे अवलोकनार्थ टाका. त्यावर सूचना देणं खूप सोप्प जाईल. त्यातल्या ज्या उपयुक्त वाटतील त्या लिहून घ्या... हे कसं वाटतं ?

अनिल, सुचना चांगली आहे. पण आता कॉलेज सुरू होईपर्यंत ती हाती लेखणी धरेल असे वाटत नाही... Happy ११-१२वीलाही मराठी विषय आहेच. तेव्हा सांगेन तिला लिखाण करायला.

अरे खरंच, त्या काळात निबंधलेखन म्हणजे एक प्रोजेक्टच असायचा. आमच्याकडून शंभराच्या वर निबंध लिहून घेतले असतील. आता नाही जमणार !

अनिल, द्या ना.. इथे दिलेली माहिती वाया जाणार नाही. कोणाला ना कोणाला उपयोग होईलच.

हो, दिनेश, आमच्याकडुनही निबंध लिहुन घेत. शाळा सुरू झाली की माझा आवडता ऋतू हा पहिला निबंध आणि त्यात पावसाळा हाच ऋतू अशी अपेक्षा असायची. मला तर पावसाळा अजिबात आवडायचा नाही, माझा आवडता ऋतू हिवाळा. पण मला गुपचुप पावसाळ्याच्या गुणगायनाचा निबंध लिहावा लागायचा Angry

एक गंमन आठवली.

चौथीला असताबा सरांनी वृक्ष हवेतच हा निबंध लिहायला सांगितला. मी एकदम उत्साहाने लिहीला आणि विशेष म्हणजे सरांनी तो आवर्जून वाचून दाखवला. आणि प्रेमाने समोर बोलावून पाठीत दोन धपाटे दिले आणि कानही पिरगाळले. मी लिहीलेला निबंध असा होता.

झोपेतून उठलो तोच सगळीकडे गोंगाट सुरू होता. आवराआवर करून शाळेला जात असताना रस्ता वेगळाच दिसत होता. अचानक पाऊस आला म्हणून झाडाखाली जावं असा विचार केला तर झाडं, वृक्ष काहीच दिसेनात. सहज वर पाहीलं तर काय, वृक्ष हवेत तरंगत होते..

पुढं जे काही लिहीलं होतं ते देण्यात अर्थ नाही पण तो निबंध आणि मार दोन्ही लक्षात राहीलं. Happy

माराचे काही वाटले नाही, नाहीतरी तो असा नाही तर तसा कसाही मिळणारच होता, पण तुमची दैवी कल्पनाशक्ती समजुन घ्यायला सरांची कल्पनाशक्ती थिटी पडली याचे वाईट वाटले. Happy

Pages