प्रसिद्ध वाक्ये व काव्यपंक्ती

Submitted by साधना on 27 January, 2011 - 01:04

माझी मुलगी येत्या मार्च मध्ये १०वीची परिक्षा देतेय. मराठीच्या परिक्षेसाठी निबंध लिहिताना प्रसिद्ध वाक्ये व काव्यपंक्तींचा आधार घेतला तर आपला निबंध जरा वेगळा वाटेल आणि त्यामुळे थोडे मार्क वाढतील अशी तिची अपेक्षा आहे. तिचे स्वतःचे वाचन आहे आणि त्यातले जे लक्षात राहते ते ती वापरतेच, पण सोबत तुला काही मिळाले तर पाठव अशी सुचना तिने मला केलीय. Happy

मी नेटवर आणि इतरत्र धुंडाळतेयच, पण कुठलीही मदत लागली की माबोवर धाव घ्यायची सवय लागलीय. म्हणुन ही विनंती - प्रसिद्ध किंवा अप्रसिद्ध लोकांची वाक्ये, काव्यपंक्ती किंवा इतर काही इथे दिलेत तर मदत होईल. इथे शोधताना सुभाषितांचा एक ब्लॉग सापडला तिथलेही काही घेतेय.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भिडेसाहेब, तुमचे आभार. अजुन काही टिप्स असल्यास द्या.

आगाऊ, परिक्षकाबद्दल लिहिलेय ते अगदी खरे आहे. अनुभव घेतलाय Sad

१०-१२ वीच्या मार्कांचा कागद पुढची हवी ती अ‍ॅडमिशन मिळाल्यानंतर कुठेच नाचवावा लागत नाही. १०-१२ वीच्या मार्कांवर अ‍ॅडमिशन शिवाय काहीही अवलंबून नसते

खरे आहे, पुढे काही महत्व नसले तरी पुढे जे काय बनतो ते ११वीला कुठे अ‍ॅडमिशन घेणार त्यावरही ब-याच अंशी अवलंबुन आहे ना. आणि ती अ‍ॅडमिशन मिळवायलाच खुप मारामारी करावी लागते. माझ्या मुलीच्या डोक्यात आधी पुढे जाऊन अ‍ॅस्ट्रोफिजिक्स करायचे प्लॅन्स होते. त्यासाठी सायन्सला अ‍ॅडमिशन घेणे मस्ट. आणि ह्याचा विचार करुन मला धडकी भरलेली. तिचे आतापर्यंतचे मार्क पाहुन ती १० वीला ९०%च्या पुढे जाणार नाही याची मला खात्री आहे आणि ९०%ल्या सायन्सला अ‍ॅडमिशन घ्यायची हे अगदीच अशक्य नसले तरी कठिण काम आहे. वाशीच्या कॉलेजात गेल्या वर्षी ९२% ला सायन्स अ‍ॅडमिशन क्लोज झालेली. गेल्या वर्षी मुलांना बेस्ट ऑफ फाईव मध्ये १००% मार्क मिळालेले. ९०% मार्क म्हणजे किस झाड की पत्ती अशी अवस्था झालेली. तिच्या शाळेत '९५% मार्क मिळाले तरी पुण्यात हव्या त्या कॉलेजात अ‍ॅडमिशन मिळाली नाही' अशी वाक्येही कानावर पडली होती.

मुलांनी सगळ्याची तयारी ठेवावी, ह्या कोर्सला नाही मिळाली अ‍ॅडमिशन तर दुसरा ऑप्शन ओपन ठेवावा वगैरे सगळे ठिक आहे. ब-याच मुलांनी पुढचे नक्की असे काही ठरवलेले नसते, सायन्स, आर्टस किंवा कॉमर्सला जायचे एवढेच निश्चित असते. पण ज्या मुलांनी अमुक एक करायचे असे ठरवलेले असते ती खुप निराश होतात अशा वेळी. आज मार्कांचे महत्व भरमसाठ वाढलेय ते ह्या अ‍ॅडमिशनपायीच. आता तर १०वी निकालानंतर स्टेट बोर्ड विरुद्ध इतर बोर्डाचे पालक अशी कोर्टबाजीही चालते ती या मार्कांपायीच.

हा सगळा विचार करुन मी थकलेय आणि देव पाण्यात बुडवुन बसलेय. एकदाची लेकीला हव्या त्या कॉलेजात अ‍ॅडमिशन मिळाली की गंगेत घोडे न्हाले. Happy

साधना, तुझी धडपड योग्य आहे.
निदान परिक्षेच्या निमित्ताने तरी "अवान्तर" वाचन होईल हा फायदाच
फक्त अपेक्षा येवढीच, की असे बरेचसे अवान्तर वाचन करुन, नन्तर वाढीव वयात नतद्रष्टासारखेच बोलत सुटायचे असेल, तर ती न शिकलेलीच बरी! नै का? Wink Proud
हे बघ साधना, अवान्तर वाचना(?) करता बाजारातून/वाचनालयातून ढीगभर छापिल पुस्तके आणून ती पोरान्च्या बोकाण्डी मारण्यात जर काहीच हरकत नसेल, तर मग माबोसारख्या साईटवरुन, म्हणी/उक्ति/वाक्प्रचार इत्यादी बाबी गोळा करुन पोरान्चे माथी मारण्यास कुणाची का हरकत असावी? दोन्हीही अभ्यासाचेच प्रकार आहेत ना?
उलट मी तर, या वयातही या धाग्याचे (अन अर्थात आलेल्या/येऊ घातलेल्या प्रसिद्ध महत्वापूर्ण वाक्यान्चे) माझ्या अभ्यासाकरता स्वागतच करतो Happy
मला सावरकरान्चे एकच वाक्य ठाऊके (अगदी झोपेतुन उठवले तरी ते चट्टदिशी आठवू शकते), एखादा उपक्रम चालवायचा नेटाने, तर "याल तर तुमच्या सह, न याल तर तुमच्या विना, अन आडवे याल तर निखन्दून, आम्हि आमचे इप्सित ध्येय साध्य करुच करू"

नन्तर वाढीव वयात नतद्रष्टासारखेच बोलत सुटायचे असेल, तर ती न शिकलेलीच बरी!>>> लिंब्याभाऊ, हा नतद्रष्ट कोण? इथला 'स्पेसिफिक' नतद्रष्ट की आपला एक 'जनरल' नतद्रष्ट? Wink

या हतवळणेंचं पुस्तक आईने आणलं होतं ताई १० वीत असताना. मोठी ताई तेव्हा १२वीत आणि मी ७वीत.
मी पुस्तक वाचून आधीच आईला सांगितलं, की हे वाचून जर तू माझं "रूटिन" वगैरे बसवणार असशील, ८वी-९वीपासून १०वीची तयारी आणि अभ्यास वगैरे घेणार असशील, तर मी अभ्यास करणार नाही!!!

सुदैवाने आई-बाबा हाडाचे शिक्षक, आणि नैसर्गिक बुद्धि, अभ्यासाची पद्धत वगैरे गोष्टींवर पुरेसा विश्वास होता त्यांचा, म्हणून त्यांनी असं काही केलं नाही. (खरंतर त्यांना जमलंही नसतं. चांगल्या अर्थाने. "तुला जसं योग्य वाटतंय तसं कर, चुकलं तर सांगायला आम्ही आहोत" हेच धोरण त्यांनी आम्हा तिघींसाठीही ठेवलं कायम)

बाकी अवांतर वाचायला आणि निबंध वगैरे लिहायला मुळापासून आवड असली की उसनं काही लागत नाही.

साधनाताई, तुमच्या मुलीला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!! Happy

साधना, आता एकच महिना राहिलाय ग. आतापर्यंत तिचा जो साचा बनुन गेला असेल तो बिघडवू नकोस. म्हणजे सुविचार वगैरे वाचू देत पण पण मुळात नविन काही प्रयोग नसावेत असे मनापासून वाटते. ही वेळ जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवायची. तिला मनापासून शुभेच्छा. माझी भाचीही यंदा दहावीला आहे आणि मलाही इथे टेन्शन यायला लागलय.

साधना, घोकंपट्टी करू नये, हे सांगणार्‍या वरच्या सगळ्यांना प्रचंड अनुमोदन आणि तुझ्या लेकीला शाब्बासकी.
शाळेत असताना माझी एक मोठ्ठी डायरी होती.....म्हणजे अजूनही आहे. त्यात अशी अनेक वाक्यं आहेत.
( शिवाय कॅलिग्राफीचे नमुने, शाळेतल्या एखाद्या खडूस बाईंचा दाढीमिशा काढलेला चेहरा :हाहा:, कोरून कोरून काढलेले पाणीदार डोळे Proud असलंही बरंच कायकाय आहे !)
ती वाक्यं अजूनही जशीच्या तशी आठवतात. आता तो वारसा पुढच्या पिढीकडे चाल्लाय.
त्यातलंच....
" खोलात डुबी जो घेतो, मोती त्याला मिळतात
बुडण्यास भीत जो असतो, शेवाळ येई हातात " ........सध्या ह्याची उजळणी चाललीय. लेकासाठी नाही...नवरोबासाठी Proud देवाने गळा दिलाय, सूरतालाचं ज्ञान दिलंय, पण गाणं आणखी शिकायचे कष्ट नकोयत. Sad
सॉरी गं, खूपच विषयांतर झालं. तुझ्या लेकीला परीक्षेसाठी आणि पुढच्या अ‍ॅडमिशनसाठी शुभेच्छा !

खरे आहे, पुढे काही महत्व नसले तरी पुढे जे काय बनतो ते ११वीला कुठे अ‍ॅडमिशन घेणार त्यावरही ब-याच अंशी अवलंबुन आहे ना. <<<
साधने, माझं कॉपी पेस्ट केलंस ते वाक्य तुला नव्हतं. तुझा मुद्दा पटेश म्हणलाच होता की गं. Happy

>>>> लिंब्याला स्वतःच्या वाढीव वयाची जाणीव झाली तर एकदाची . <<<<
ती तर पाच/सहा वर्षान्पूर्वीच झाली, म्हणून तर (लहानपण देगा देवा असे आळवत आळवत) "लिम्बुटिम्बु" ही आयडी घेतली ना? Wink
असो.
आता "प्रसिद्ध" वा "आशयसम्पन्न" वाक्ये येऊद्यात Happy मला पण हवियेत

मला आवडलेल्या काही काव्यपंक्ती -

मोडुन पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा! - कुसुमाग्रज

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी उन पडे - बालकवी

खोपा इनला इनला, जसा गिलक्याचा कोसा,
पाखराची कामगिरी, जरा देख रे मानसा!
तिची उलुशीच चोच, तेच दात तेच ओठ,
तुला देले रे देवाने, दोन हात दहा बोटं! - बहिणाबाई

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातुन - बालकवी

जुने जाऊद्या मरणालागुनी
जाळून अथवा पुरून टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध! ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवुनी - केशवसुत

फुलपाखरी फूल थव्यावर, कुठे सांडली कुंकूमटिंबे
आरस्पानी पाण्यावर, तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे - बा भ बोरकर

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी - सुरेश भट

ढळला रे दिन ढळला सखया
संध्याछाया भिवविती हृदया
अता मधुचे नाव कासया?
लागले नेत्र रे पैलतिरी - भा रा तांबे

देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणा-याचे हात घ्यावे - विंदा

नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दुरता त्याहुन साहवे - कुसुमाग्रज

आई कुणा म्हणु मी, आई घरी न दारी
ही न्युनता सुखाची, चित्ती सदा विदारी
स्वामी तिन्ही जगांचा, आईविना भिकारी - यशवंत

साधना, वर सगळेजण काय म्हणताहेत ते पटतं आहे... इतक्या आयत्या वेळेला घोकंपट्टी / पाठांतर करुन काय काय लक्षात ठेवणार? त्यापेक्षा लेकीच्या पाठ असलेल्या कविता, सुभाषिते, सुवचने ह्यातूनच (जे आताच्या तिच्या क्रमिक पुस्तकांत नाहीत ते) तिला निबंध वगैरेसाठी मदत होईल.
माझ्या एस एस सी च्या वेळी मी स्वतः शिक्षिकांना अगोदर विचारून ठेवले होते. त्याप्रमाणे पाठ्येतर संस्कृत सुभाषिते, सुवचने, इंग्रजी वचने, इंग्रजी/ हिंदी कवितांच्या ओळी, संतवचने, अभंग इत्यादी मर्यादित स्वरूपात वर्षभरात पाठ झाले होते. आणि त्यातीलच साहित्य वापरले. एखाद्या निबंधात जास्तीत जास्त दोन किंवा तीन सुवचने/ सुभाषिते/ कवितेच्या ओळी इत्यादी. शिवाय त्या ओळींचा थोडक्यात आपल्या विषयाशी कसा संबंध आहे हे.

असो. जाता जाता एका साईटवर मला ही वाक्ये मिळाली. उपयोग झाला तर चांगलेच आहे :

"The butterfly counts not months but moments, and has time enough."

"Trees are the earth's endless effort to speak to the listening heaven."

"We come nearest to the great when we are great in humility."

"We gain freedom when we have paid the full price."

"We live in the world when we love it."

"Your idol is shattered in the dust to prove that God's dust is greater than your idol."

--- Rabindranath Tagore

------------------------------------------------------------------------

"The empty vessel makes the loudest sound."

"There is no darkness but ignorance."

"There is nothing either good or bad but thinking makes it so."

"It is not enough to help the feeble up, but to support them after."

"It is one thing to be tempted, another thing to fall."

"To be, or not to be: that is the question."

"A fool thinks himself to be wise, but a wise man knows himself to be a fool."

--- William Shakespeare

-------------------------------------------------------------

"The woods are lovely, dark and deep. But I have promises to keep, and miles to go before I sleep."

-- Robert Frost

The world is the great gymnasium where we come to make ourselves strong.

-- Swami Vivekananda

You cannot escape the responsibility of tomorrow by evading it today.

-- Abraham Lincoln

Quality is not an act, it is a habit.

-- Aristotle

The harder the conflict, the more glorious the triumph.

-- Thomas Paine

We make the world we live in and shape our own environment.

-- Orison Swett Marden

बायदवे, साधना, माबोवरच्या अनेक विपूंमध्येही बरीच वाक्ये/ कवितांच्या ओळी मिळतील तुला! Happy

चाणक्य कहते हैं कि अधिक लाड़ प्यार करने से बच्चों में अनेक दोष उत्पन्न हो जाते हैं। इसलिए यदि वे कोई गलत काम करते हैं तो उसे नजरअंदाज करके लाड़-प्यार करना उचित नहीं है। बच्चे को डाँटना भी आवश्यक है।

एसेसीचा रिझल्ट आज लागला. मुलीला बेस्ट ऑफ ५ मध्ये ८७.८ % आहेत आणि एकुण ८५ %.
मराठीत ८९ मार्क आहेत. सगळ्यांच्या मदतीबद्दल अगदी मनापासुन आभार. Happy

ग्रेट साधना. मराठीत ८९? छानच . मराठीत एकूण टक्केवारीपेक्षा कमी गुण असतात नेहमी. ती १८ची झाली की मायबोलीवर भरती करा.

साधना ,तुमचे आणि तुमच्या कन्येचे अभिनंदन.

भरत मयेकर यांच्या सूचनेवर अव्श्य विचार करा.

अभिनंदन साधना!!!! Happy

ती १८ची झाली की मायबोलीवर भरती करा.>>>>>ती आधीपासुनच मायबोलीची सदस्य आहे. Happy

साधना,तुझ्या मुलीचे हार्दिक अभिनंदन!,ह्या धाग्याची मला आजच माहिती झाली,त्यामुळे तुझी लेक १० वी ला आहे हे माहित नव्हतं.आणि होस्टेलवर राहून इतके मार्क्स मिळाले हे जास्त अभिनंदनीय आहे.

खरच साधना मुलीचे कौतुकच आहे. तुझ्यापासून दूर राहून, क्लास न करता आणि इतर इतकी व्यवधानं पाळून खुपच सुरेख यश मिळवलंय. तिचं पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन. अशा गुणी मुलीला घडवल्याबद्दल तुझंही तितकच कौतुक आणि अभिनंदन!

सगळ्यांचे मनापासुन आभार.

ह्या बीबीवरच्या वाक्ये व काव्यपंक्तींचाही तिला खुप फायदा झाला. तिने मिळतील तेवढी वाक्ये मराठी - इंग्लीश गोळा करुन ठेवली होती. अर्थात ती कशी कुठे वापरायची हे तिचे स्वतःचे कौशल्य. पण एवढे सगळे करुन मराठीचा पेपर खुप छान गेला ह्याचा तिला खुप आनंद झाला. काल परत एकदा पेपर्सबद्दल बोलताना तिने मराठीचा निबंध खुपच छान लिहिला गेला आणि त्यात तिने गेले वर्षभर गोळा केलेली वाक्ये वगैरे नीट वापरता आली याबद्दल खुप समाधान व्यक्त केले.

कालच एका मैत्रिणीशी बोलताना तिने 'मराठी हा भयानक विषय आहे' असे उद्गार काढलेले. तिचा मुलगा आता ९वीत गेलाय आणि मराठी ही खुपच मोठी ब्याद वाटतेय त्याला. त्या पार्श्वभुमीवर त्या मुलाच्याच पिढीतल्या एका मुलीला मराठीतुन निबंध लिहिताना खुप बरे वाटले हे ऐकुन मला बरेच बरे वाटले.

मराठी निबंध लिहिताना तो बहुतेक वेळा सगळ्यात शेवटी लिहिला जातो. तसे न करता निबंधासाठी सुरवातीचे एक-दिड पान मोकळे ठेऊन पुढे पेपर सोडवायला घ्यायचा आणि मग शेवटी निबंध लिहायची वेळ येईल तेव्हा सुरवातीच्या मोकळ्या जागेत निबंध लिहायला घ्यायचा अशी टिप एका मैत्रिणीने दिली होती. ह्यामुळे पेपर तपासताना पहिल्यांदा निबंध तपासायला येतो आणि मग इतर प्रश्न. निबंध जर चांगला असेल तर परिक्षक थोडाफार दयाळू होऊ शकतो असे मैत्रिणीचे मत होते.

ऐशुच्या वर्गात कोणालाच ही टिप आवडली नाही पण ऐशुने मात्र ह्या टिपप्रमाणे दिड पान मोकळे सोडुन पुढे बाकीचा पेपर सोडवला आणि मग निबंध लिहीला. हल्ली एकुण १०० पैकी २० मार्क शाळेचे असतात त्यातले तिला १८ मिळालेले आणि ८० मार्कांचा पेपर असतो त्यात तिला ७१ मिळाले. म्हणजे तिचा निबंध आणि एकुण पेपर परिक्षकाला थोडाफार आवडला असावा. Happy

तुमच्या आजुबाजुला जर दहावीत कोणी असतील तर ही टिप त्यांनाही द्या. काहीतरी फायदा होईल Happy

आलिया भोगासी..
दहावीची परिक्षा जशी आहे तसं देणं हे प्रथम कर्तव्य पार पाडावं. नंतर वेळच वेळ आहे.

चांगला विचार आहे शेअर करण्याचा. जमेल तसं देतो मी पण. इयत्ता चौथीत असताना सरांनी निबंध कसा लिहावा हे शिकवलं. त्याचा मनावर इतका खोल परिणाम झाला कि लिहायची आवड निर्माण झाली आणि अजूनही आवर्जून काही न काही लिहीतो (लोकांना आवडत नाही हा भाग वेगळा ). असे शिक्षक सर्वांना मिळावेत असं मात्र वाटतं.

चौथीत त्यांनी निबंध दिला होता. आमची सहल

हा निबंध लिहीताना सुरूवात कशी करावी हे सांगितलं. सहलीला जायची तयारी शक्यतो एका वाक्यात आटपा ही सूचना दिली. आरंभ नेहमी आपण पुढे काय वाचणार आहे याची उत्सुकता वाढवणारा असावा हे शिकवलं.
त्याची काही उदाहरणे ही दिली.

मग मुख्य भागात पंचलाईन कशा वापराव्यात हे शिकवलं.

उदा. सहल किल्ल्यावर गेलेली असली तर

सहज वरून पाहीलं तर माणसं मुंग्यांसारखी दिसत होती. हे वाक्य निबंधाला उठावदार करतं.

किंवा

सरांनी सांगितलेला इतिहास मनात रेंगाळत होता. मी किल्ल्याकडे एकटक पाहत होतो. आणि अचानक वाटू लागलं कि या पाषाणांना जिव्हा फुटून या किल्ल्याचा इतिहास ते सांगू लागतील. शौर्याचे, धैर्याचे, दु:खाचे, फसवणुकीचे अनेक प्रसंग पाहीलेले हे साक्षीदार मूक असल्याचं कधी नव्हे ते खूप वाईट वाटलं..

या अशा पंचलाईन्स निबंधात असाव्यात.

Pages