पुन्हा एकदा परी

देविकानी(वय ११) काढलेली अजून एक परी fairy_resized.jpg

इथे तिची पहिली परी

आणि हा तिचा ब्लॉग

Submit to kanokani.com

डिस्ट्रेस्ड परी का? तिच्या पाठीवरचा टॅटू भारी आहे..पंख पण छान जमलेत..
छान आहे चित्र..

हो काल सुट्टी असून बाहेर जाता आलं नाही म्हणून वैतागल्या होत्या मॅडम स्मित

टॅटू आणि ड्रेसेसची चित्रं काढणं फार आवडतं तिला स्मित

पंख, ड्रेस वगैरे मस्तच आलेत. मनाची काढलेय, की कुठली पाहून वगैरे? पुढल्या वेळी ह्या परीचा हसरा चेहरा बघायला आवडेल स्मित

सुकेशिनी परी स्मित

अ प्र ति म !! व्वा...एवढ्या लहान वयात शरीराची ठेवण, बांधा वगैरेची किती जाण आहे तिला!! पंख पण सुंदरच आलेत. (चेहरा खरच बघायला आवडला असता)

पूनम , मागच्या आठवड्याच्या आर्टक्लास मधे शाळेत टिचरनी काढलं होतं म्हणे बोर्ड वर.

आर्या, लवकरच हसरा चेहरा दिसणारी परी काढायला सांगते तिला स्मित अभिप्रायाबद्दल थँक्स ग

जो, अभिजित धन्यवाद स्मित

ती ब्लॉगवरपण टाकत असते चित्र अधुनमधुन हे ही टाकेल कदाचित . इथे आहे हसरा चेहरा स्मित

सुंदर काढलंय. चित्र काढतानाचा तिचा मूड चित्रात उतरलाय पूर्णपणे. स्मित

सुरेख काढलय चित्र. रेषांची जाण मस्त आहे, परीचा दु;खी, नाराज मूड पुरेपूर उतरलाय चित्रामध्ये. चित्राचा ब्लॉगही खूप आवडला. कलाकार आहे गं लेक तुझी. स्मित

सहीच! ब्लॉगवरची 'गर्ल' काय सुरेख आली आहे. आणि 'दिवाली ग्रीटींग'ही! मस्तच!

मस्त आहे चित्रं. चित्रकला तर छान आहेच पण वेगवेगळे प्रयोग करते हे अजून कौतुकास्पद. स्मित

परीचे पंख खुप आवड्ले..!

सुंदर. परिच्या शरीराचे प्रपोर्शन्स, पंख सुंदर्च. ब्लॉगपण मस्त आहे देविकाचा.
त्या स्पर्धेतलं चित्र पण टाक ना, जर परत मिळालं असेल तर.

मस्तच ! परीचे केस खूप आवडले.

सगळीच चित्र भारी आहेत स्मित

ब्लॉग खुप छान आहे गं!! कलाकार आहे तुझी मुलगी...खुप खुप शुभेच्छा!!

शामले परी सुरेख काढलीये देविकाने..मुख्यतः चित्रातही परीचा मुड पकडता आला तिला..सही.. अनेकानेक शुभेच्छा!!!.. स्मित

खूप छान काढलय चित्र.

भारी आहे की. स्मित

श्यामली, छानच काढलीये परी. डिटेलींग आवडलं.
देविकाचा ब्लॉगही मस्त! आईसारखीच कलाकार आहे! स्मित

काय सुंदर काढलंय. बारकावे पण फारच मस्त. टॅटू झकास!

देविकाकडून सगळ्यांना thank you very much
तिनी स्वतः २० मिनिटं इथे बसून सगळे अभिप्राय वाचून काढले.
@अभिजित तुझ्या अभिप्रायतला शब्द नवा होता तिच्यासाठी त्याचा अर्थ विचारून तो वापरून बघून झालं स्मित
पूनम, शैलजा, देवा, अल्पना तुम्ही तिकडे का फिडबॅक दिला नाही? अस विचारल आहे.

देवामामाच्या अभिप्रायाला स्पेशल थॅंक्स म्हणे स्मित

श्यामली, तिला सांग परत एकदा सवडीनं तिकडच्या सगळ्या चित्रांना अभिप्राय देईन मी. स्मित आत्तासाठी सॉरी. स्मित

खुपच सुंदर काढलंय. बारकावे पण फारच मस्त. स्मित
बाकीचे फोटो ही सुंदर.

क्या बात है. सुरवातीला चेहरा शोधत होतो.
मस्त आवडल. बहोत खुब.

श्यामली, मस्तच.

तुझ्या देविकाच्या परीला काय द्यावं बरं मूंहदिखाईला ...... स्मित

आवडली परी. पंख खूप छान काढलेत. आत्ताच ब्लॉग वरची चित्रं पाहिली. ती पण खूप छान आहेत. ते ग्रीटिंग मस्त झालय.

देविकाला म्हणाव मस्त आहेत चित्रं.......

सुंदरच जमलंय श्यामली.

मस्त आली आहे परी.