एक - एक

एक ..
झुळूक वार्‍याची ..
एक..
लहर पाण्याची ..
ही ..
लकेर गाण्याची ..
आणि एक ..
आठवणीच्या आड
तुझ्या हसण्याची !

एक ..
कथन गात्रांचे ..
एक ..
रुदन वीणेचे ..
एक ..
नशिब जन्मांचे ..
मीलनात
आणि तुझ्या
एकवार असण्याचे !

Submit to kanokani.com

आठवणीच्या आड
तुझ्या हसण्याची !

आवडले. शेवटच्या ओळी=
नशिब जन्मांचे ..
मीलनात
समजले नाही.
-सविनय.

अनेक जन्म भोगत राहण्याचे नशीब ..
पण मीलनात असायला एकदाच कधीतरी मिळण्याचे
असे काहीसे अभिप्रेत आहे ..