अर्धा किलो बारिक लांबट वांगी,
३/४ छोटी अर्धवट पिकलेली केळी,
४ मोठे कांदे,
१ टेबलस्पून तयार दाबेली मसाला (किंवा कुठलाही आवडता मसाला किंवा लाल तिखट + थोडा गरम मसाला )
अर्धा कप काजू किंवा तेवढेच दाण्याचे जाडसर कूट,
बारिक चिरलेली कोथिंबीर, मूठभर.
१ ते २ टेबलस्पून गूळ किंवा साखर,
३ टेबलस्पून तेल,
मीठ, थोडा खडा गरम मसाला (अख्ख्या वेलच्या ३/४, मिरिदाणे २/३, दालचिनीचा छोटा तूकडा )
१) वांगी भरल्या वांग्याप्रमाणे चिरून घ्या आणि मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा. वांगी फार लांब असतील, तर त्याचे आडवे दोन तूकडे करा.
२) कांदा किसून घ्या. त्यात मसाला, सर्व घटकांना लागेल तेवढे मीठ, गूळ वा साखर, कोथिंबीर आणि अर्धे तेल मिसळून घ्या. वापरत असाल तर दाण्याचे कूटही यात मिसळा.
३) वांगी निथळून घ्या.
४) आचेवर ठेवण्याआधीच, एका पॅनमधे उरलेले तेल घ्या. त्यात खडा मसाला (वेलच्या जरा ठेचून ) पसरून घाला. आता मसाल्याला पाणी सुटले असेल तो थोडा थोडा वांग्यात भरा व वांगी पॅनमधे रचा.
५) त्यावर केळ्याच्या चकत्या टाका. वेळ असेल तर केळ्याचेही तूकडे करून, त्यात मसाला भरा.
६) उरलेला मसाला व त्याला सूटलेले पाणी त्यावर ओता.
७) पॅनला घट्ट झाकण लावून मंद आचेवर ठेवा.
८) वीस मिनिटांनी हलक्या हाताने भाजी ढवळा, रस आटला असेल तर थोडे पाणी घाला.
९) काजू वापरत असाल तर आता टाका.
१०) झाकण न ठेवता थोडा वेळ शिजवा.
११) खमंग वास सूटला आणि वांगी शिजली कि आचेवरुन उतरा.
१२) चपाती वा वरण भाताबरोबर हि भाजी चांगली लागते.
हा फोटो आहे, भाजी शिजायला ठेवण्यापूर्वीचा
आणि हा आहे, भाजी शिजत असतानाचा (यानंतरपण थोडा वेळ भाजी शिजचली )
दावेली मसाल्याला छान स्वाद असतो पण त्यातल्या लवंगांमूळे तो जरा उग्र वाटतो. केळी वापरल्याने त्याचा उग्रपणा जातो.
आमच्या नाताळ पार्टीसाठी केली होती. आवडली सगळ्यांना.





वांग आणि केळ काँबिनेशन पहिल्यांदाच वाचल, फोटो टाकलात तर अजून मजा
थोडी गोडसर लागेल का?
कांद्यामूळे थोडासा गोडवा येतोच पण हा मसाला झणझणीत असतो, त्यामुळे तोल साधला जातो.
आवडीनुसार मसाल्याचे प्रमाण वाढवता येईल. या भाजीची मजा, ती कांद्याच्या रसात शिजण्यात आहे. म्हणून कांदा किसूनच घ्यायचा.
छान. करुन बघेन आता.
वेगळी वाटते आहे. करुन पाहीन. धन्यवाद दिनेशदा.
छान, वेगळी आहे पाकृ! फोटोची वाट पहातो!
अरे वाह.. छान आहे. नवं आहे
दिनेश फोटो टाकतिलच, पण बित्तुबंगा तू पण बनवून फोटो टाकु शकशिल की.
दिनेशदा...फोटो पायजे ! वेगळी आहे पाकृ. करून पाहीन. ( किंवा साबांना उकसवेन करण्यासाठी.
)
"जागू" संप्रदायातील लोकांनी या भाजीच्यामसाल्यात थोडा भाजलेला जवळा किंवा सु़के बोंबील (तूकडे करुन, पाण्यात भिजवून, काटा काढून) टाकावेत.
मला कच्चे केळे वाटलेले पण चक्क पिकलेले केळे टाकुन केलीय भाजी. करुन पाहायला पाहिजे./..
वांग्यात सुकट टाकले की ती भाजी अगदी स्वर्गसुखाचा आनंद देते पण सोबतीला केळे आणि काजु असल्यावर काय होईल सांगता येत नाही
साधना, केळे बोंबील असा एक पदार्थ आहे. समुद्र मेथीबरोबर पण हे मासे शिजवतात. केळे अगदी पिकेलेले नाही घ्यायचे. खरे तर केळ्याने मसाल्याच्या तिखटपणाचा तोल साधला जातो.
जास्त झालेले केळेही, कुठल्याही सरभाजीत ढकलता येते.
मला खूप भूक लागली आहे

- थन्क्स.
हे फोटो पाहिल्या वर तर पोटात भट्टीच पेट्ली आहे. फोटोत भाजी एव्ढी छान दिसते आहे तर, चवी ला किती छान असेल ??
मस्त...पुढिल भारत भेटित हा आयटम फिक्स.