निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असुदे सायलीची वेल लाव. ही वर्षभर हिरवीगार राहते शिवाय चांगली कमानही चढवता येते हिची.
सध्या माझ्या गेटवर हिचाच वेल आहे.

नेवाळीचा वेल मांडवावर पसरवण्याइतका नाही वाढत.
जुई पण चांगली राहते वर्षभर पण तिला फक्त पावसाळ्यात फुले येतात. मोगर्‍याच्या बाबतीतही तेच.

मधुमालतीचा माझ्या आईकडे खुप पसारा झालाय. आणि ही काही वर्षांनी प्रचंड वाढते आणि हिची मुळे जमीनीत इतरत्र पसरून अजुन बाजुला रोपे तयार होतात.
कृष्णकमळाला वर्षातुन एकदा सुरवंट पडतात. सगळीकडे मला माहीत नाही पण आमच्याकडे पडायची.

मधुमालतीला कुठले काटे ? सकर असते ती. मलबार हिलवर मांडवावर कृष्णकमळाची वेल होती. हे दोन्ही वेल मांडव सुगंधी करतील.
पॅशनफ्रूट पण चालेल, पण माझ्या बघण्यातल्या वेली, वर्षभर हिरव्या नसतात. संक्रांतवेल आणि लसूणवेल पण छान शोभा देईल.

जागू, पाने वाढली की. सवडीने अपडेट करणार ना ?

दिनेशदा सध्या खुप बिझी असते. हे अपडेट करण्यासाठी शांतपणे बसावे लागेल मला. पुढच्या आठवड्यात करते. पण एक शंका आहे. पहिल पान मोठ होउन त्याचे दोन नंबर पानात रुपांतर होउन पानांचा क्रम नाही ना बदलणार ? खरतर त्या भितीनेही मी नाही करत.

दिनेशदा मधुमालतीचा वेल जाडा झाला की त्याला मध्ये मध्ये चांगले मोठे काटे येतात. पण खुपच विरळ असतात ते.

जागू, नाही व्हायचे तसे बहुतेक.
असूदे. द्राक्षाच्या वेलाचाही प्रयोग करता येईल. द्राक्षाच्याही बिया सहज रुजतात, तो अनेक वर्षे टिकतो. द्राक्षे लागतीलच असे नाही, पण तो वेल छान दिसतो.

दिनेशदा सध्या खुप बिझी असते. हे अपडेट करण्यासाठी शांतपणे बसावे लागेल मला. पुढच्या आठवड्यात करते. पण एक शंका आहे. पहिल पान मोठ होउन त्याचे दोन नंबर पानात रुपांतर होउन पानांचा क्रम नाही ना बदलणार ? खरतर त्या भितीनेही मी नाही करत.

>>>>> अरे राम! मी खरंच चारवेळा वाचलं की कोणत्या झाडांच्या पानाबद्दल बोलताय आणि काही कळत का नाहीये. Happy

मामी Happy

नेवाळीचा वेल मांडवावर पसरवण्याइतका नाही वाढत.>>>जागू, आमच्या येथे एकाने लावला होता नेवाळीचा वेल आणि मस्त मांडव घातला होता. त्याच मांडवाखाली आम्ही लहानपणी (उन्हाळ्याच्या सुट्टीत) बसून "नवा व्यापार" खेळायचो. Happy

मामी Biggrin

दिनेशदा, आमच्या जून्या घरी अजूनही आहे मधुमालती. काटे असतात तीला. फोटो टाकेल नंतर. बोगनवेलही तशीच.

मग सध्या तरी हे ऑप्शन ठेवतो

१. नेवाळी
२. सायली / जाई
३. पॅशनफ्रूट
४. कृष्णकमळ
५. संक्रांतवेल / लसूणवेल
६. द्राक्षं

बघू तरी यातल काय मिळतं ते.

मी निळ्या फुलांची एक वेल घेतलीय. तीची फुले साधारण मॉर्निंग ग्लोरीसारखी दिसतात पण मॉर्निंग ग्लोरी नाही. मुंबईत खुप ठिकाणी ही वेल दिसते. याची पाने मोठी असतात. फुले या ऋतुत येतात. ही वेल वर्षभर हिरवीगार राहते आणि पसरतेही भरभर. असुद्या, ही वेल लाव.

पण असल्या वेली लावण्यापेक्षा जाई, जुई, मधुमालती इत्यादी सुगंधी फुलांच्या वेलीच ब-यारे... मला तरी बिनवासाच्या फुलांपेक्षा वासवाली फुलेच आवडतील..

आणि वेल जरी मांडवावर चडवला तरी तो मुळात असतो बाजुलाच रे... तु काय मधुमालतीला झोके घ्यायला जाणार नाहीस, तिचे काटे टोचुन घ्यायला.... Happy

दिनेशनी मोकळ्या दिलेल्या बिया मी कुठल्या कुंडीत टाकल्या तेच आठवत नाही. पण दोन्ही एकाच कुंडीत टाकलेल्या एवढे आठवतेय. परवा एका कुंडीतुन दोन पाने घेऊन एक रोप वर आले, काल अजुन एक रोप वर आले. त्याची गडद हिरवी आणि मध्ये फिक्या हिरव्या शिरा असलेली पाने पाहुन ते संत्र मोसंबीच्या वर्गातले वाटतेय. पण गेल्या महिनाभरात तरी मी संत्री मोसंबी आणुन बीया कुंडीत टाकल्या नाही. त्यामुळे ते पॅशनफ्रुट असावे असा संशय आहे.. ही बेस पाने आहेत, पुढची पाने अशी असणार नाहीट. त्यामुळे पुढची पाने फुटली की कळेलच.... पॅफ्रू असेल तर असुदे तुला एक वेल नक्की....

साधना, त्याचे पान टोकेरी असेल तर ते पॅशनफ्रुटच असणार. संत्र्या मोसंब्याची पाने किंचीत गोलाकार असतात आणि जाडही असतात. त्यांचे दोन भाग पडलेले दिसतात.

असूदे, एक गाणे आठवले
दो बदन प्यार कि आग मे जल गये
एक चमेली के मुंडवे तले............. (सिनेमा चा चा चा, हेलन होती त्यात.)

कृष्णकमळाला कूंडीमध्ये फुले येतात का? माझ्याकडचे नुसतेच वाढतेय. Sad

असुदे, गोकर्ण पण एक चांगला पर्याय आहे मांडवावर सोडण्याकरता. त्याचा एक भरगच्च प्रकार आहे, मस्त दिसतात ती फुले. मागे कोणी (योगेश्/जागू) इथे फोटो पण टाकले होते त्यांचे.

जिप्सी....नवा व्यापार....काय मस्त आठवण काढलीस. धन्स. आख्खी मुंबई खरेदी करायचो आम्ही सुद्धा सुट्टीत. Lol

मामि Lol
माधव कृष्णकमळ मोठ्या कुंडीत लावा येतील फुल.

असुदे जर तुला भाजीचा मांडव हवा असेल तर कारली, तोंडली, घोसाळ, शिराळ, पडवळ, मायाळू, चवळी अश्या भाज्यांचा मांडव घालता येईल. ह्यातील तोंडली आणि मायाळूचा वेल कायमचा टिकेल. बाकीच्या वेली मात्र ६-७ महिन्यांत जातील म्हणजे सुकत जातील.

तोंडली.......... माझा तोंडल्याचा वेल कोणीतरी चोरला.... कोणाकडे असेल तर द्या वो माय... पुण्य लाभेल

साधना मला पण हवा आहे तोंडल्याचा वेल. माझ्या कुंपणाला तोंडल्याचा वेल फोफावलाय पण तो कडु-जंगली तोंडल्याचा आहे.
असुदे अलिबागला तोंडलीचे मळे आहेत. बघ कोणाकडेतरी मिळेल. मला आणि साधनालाही आण. त्याची जाडी फांदीही जगते.

तो जंगली तोंडलीचा सगळीकडे दिसतो. राणीबागेतही भरपुर आहे. माझ्या कॉलनीत एकाने लावलाय पण अजुन कोवळा आहे. अजुन थोडे दिवस जाऊ द्यावेत आणि मग खडा टाकुन पाहावा असा विचार करतेय

निकिता, तसे नाही अगदी किचनच्या छोट्या खिडकितही (उन येत असेल तर) काहि झाडे लावता येतात.

मी लावली आहेत Happy

गेल्या वर्षी तुम्हाला विचारलेलं ना. एका छोट्या कुंडीत टरबुज पण आलं होतं. भरपुर हळद हल्लीच काढली आणी लोणचं केलं. एकदा मोहरिच्या पानांची भाजी खाल्ली. दोन गुलाब आहेत.

जागा अगदी कमी आहे. पण वरील सगळ्या चर्चा वाचुन वाटतं बंगले असावेत म्हणुन विचारलं.बंगले नस्तील तर जागा कशी मिळते एवढी?

अरे वा. निकिता झाडे लावण्याच्या बाबतीत तरी "सब भूमी गोपाल की" असे समजायचे. कुठेही झाड लावायचे.
घरातलाही हिरवा कोपरा जपायचा.

काही जणांचे गावाकडे घर आहे, इतकेच.

उंदिराचा प्रॉब्लेम सुटला Happy Happy खरंतर "घूस" होती ती. रोज येऊन कुंडितली माती उकरत होती. शेजार्‍यांनी केला बंदोबस्त Wink
पण, सध्या अबोलीच्या पानांना आणि गुलाबी जास्वंदच्या कळ्यांना सफेद रंगाच्या किडीने ग्रासले आहे Sad यावर काहि उपाय? (अबोलीवर सफेद रंगाची बुरशी आली आहे :(). मी पाण्याचा स्प्रे करतो पण कामाच्या दगदगीमुळे रोज जमत नाही पण आठवड्यातुन एक्-दोनदा तरी संपूर्ण झाडांना स्प्रे करतो. काहि उपाय आहे का? मला रासायनिक औषध नको पण घरगुती औषधाने या किडी जातील का?

घराच्या बाल्कनीतच जोपासलेली हि माझी छोटीशी बाग Happy

साधनाने दिलेल्या झाडाला आता पाने फुटायला लागली आहे. Happy
नाव माहित नाही Sad
लाल सदाफुली
फुले येऊन गेल्यावर सदाफुलीला आता या अशा शेंगा धरायला लागल्या आहे.
जागूने दिलेला अळुही बहरायला लागला आहे Happy
सध्या अळुची पाने छोटी आहे म्हणुन वाट बघतोय Happy नाहीतर "अळुवडी" ऐवजी "बाकरवडी" व्हायची. Proud
काहि दिवसांपूर्वी लावलेल्या निशिगंधाच्या झाडाला आता कळ्या येण्यास सुरुवात झालीयं Happy
गुलाबी जास्वंद
हिरवीगार "झिपरी"

जिप्स्या, मस्त रे फोटू... लाल सदाफुलीच्या शेंगा बघुन आश्चर्य वाटले. अशा शेंगा आपल्या गावठी गुलाबी आणि पांढ-या सदाफुलीला येतात. तुझ्या फोटोतली सदाफुली विंका वाटतेय. हायब्रिड जात.. त्यामुळे शेंगा आल्या म्हणजे धमालच. आता ह्या शेंगांवर रोज लक्ष ठेव आणि सुकल्यासारख्या वाटल्या की काढ आणि थोड्या बीया धाड माझ्याकडे. Proud लक्ष मात्र रोजच ठेव नाहीतर कळणार नाही तुला कधी शेंगा फुटून बीया हरवल्या ते.

मी दिलेल्याचे नाव एडेनियम - डेझर्ट रोजही म्हणतात.

रच्याकने वाशीला ऑर्बीट मॉलसमोर नमुमपाचे फळाफुलांचे प्रदर्शन भरलेय. मी आधीच इथे लिहिणार होते पण विसरले. मस्त प्रदर्शन आहे. काल आणि आज दोन दिवस. आज भेट द्या.

तिथे एक माडवेल का काय नावाची एक वेल दुकानात पाहिली. डॅफोडिलसारखी दिसणारी पण गुलाबी फुले होती. कुंडीत लोखंडाचे काम करुन त्यावर वेल चढवलेली. किंमत फकस्त रु. ८००. ह्याच्या २-३ कुंड्या होत्या. अजुन एक वेलफुल होते रु ३०० फकस्त. काल रात्री ९ वाजता गेले, सोबत कॅमेरा नेला नव्हता. आज दुपारी जमले तर परत जाणार आहे तेव्हा दुकानवाल्याने परमिशन दिली तर फोटू काढेन. नाव मात्र परत विचारावे लागेल. हे माडवेल काही खरे नाही... अशासारखे आहे पण हे नसावे.

.

जिप्सी,
फोटो आणि झाडाची रोपे पण छान आलेत ..!
Happy

दिनेशदा,
द्राक्षाची शेतीमध्ये रोपांची लावणी ही शक्यतो मार्च ते जुन मध्ये लावल्या जातात ..
तसेच ऑक्टोबर आणि एप्रिल महिन्यात बागेतल्या वेलांची छाटणी (रीकटींग) होत असल्यामुळे त्या काळात खुप प्रमाणात त्या काड्या मिळू शकतात,त्या कुठुनही घेऊन तुम्ही रोपे तयार करु शकता ..
येत्या एप्रिलमध्ये माझा गावाकडुन काही रोपे आणण्याचा विचार आहे ...
Happy

हुश्श् पोचले शेवटच्या पानापर्यंत. मधे भारतात गेले तर इथे कित्ती वाचायचं राहिलं होतं!!
जागु ओरिजिनल पोस्ट मोठी झाली तरी त्याची दोन पाने होत नाहीत. त्यामुळे तिथे अपडेट करायला हरकत नाही Happy
विजय मस्त शेती आहे तुमची. जेव्हा खुप दिवसासाठी भारतात येईन तेव्हा नक्की येणार तिथे.
मामी , तुमच्या कडे मोठी गच्ची असेल तर मोठ्या बादलीत वगरे भोपळा लावला आणि जमिनीवर पसरवला तर येऊ शकेल. आमच्या घरी साबु दरवर्षी लावतात आणि त्यात दोन तीन भोपळे येतातच.

दिनेशदा शंभरी बद्दल अभिनंदन.
जागु सेक्रेटरी पदाबद्द्ल अभिनंदन
बाकी सगळ्यांच्या घरातल्या झाडांचे फोटो बघुन मस्त वाटतय. मी पण भारतात आले की भरपुर झाडे लावणार.
बरं आत्ता येताना हळकुंड घेऊन आलेय. कधी आणि कशी लावु? साधारण तापमान आणि पावसाचे प्रमाण काय असावे ते सांगा. मग इथलं वातावरण बघुन लावेन. आणि लगेच लावायचे नसतील तर कसे ठेवु म्हणजे खराब होणार नाहि?

सावली,
भारतात आली होतीस तर कळवायचे होतेस. मी दर रविवारी आणि सुटीच्या दिवशी शेतावर असतो.आता खुप भाजीपाला झालाय. मला सावरीच्या झाडाचा पत्ता दे.
साधना, मागील आठ्वड्यात भान्डुप आणि कान्जूर च्या मधे जी के ड्ब्लू च्या कम्पाउन्ड मधे एक झाड फुलले आहे. माझ्या मते ते आफ्रीकन ट्युलीप आहे. पण पाने थोडी लहान वाटतात. फुल तशीच आहेत.
मी शनिवारि पटरीवरून चालत गेलो होतो. पण ते झाड खूप उन्च आणि कम्पाउन्ड च्या आत आहे.
पान्ढरी सावरीला पानझड होउन छान बोन्ड लागली आहेत. माझी आई कुलाब्याच्या बोटानिकल गार्डन मधे साकाळि जायची. तीने तेथून सावरीची बोन्ड आणून छान उशा बनवल्या आहेत्.तुला देखील करता येईल. तूमच्या कडे खूप झाडे आहेत.

Pages