नात तुझी

Submitted by वर्षा_म on 1 December, 2010 - 00:30

लेक तुझ्या मातीला
आज हवी होती ...
नात तुझी बाजुला
आज हवी होती ...

तगमगता जीव तू
आठवांनी घायाळ
शेवटच्या या भेटीला
आज हवी होती ...

पालनाचे ऋण ते
ना वाटले जरी
दोन अश्रु वहायाला
आज हवी होती ...

जाळे ते वेदनेचे
चेहर्‍यावरी दिसेना
शेवटच्या संवादाला
आज हवी होती ...

गुलमोहर: 

वर्षा,हे तुझं नवं रूपसुद्धा छान आहे.( नवं कदाचित माझ्यासाठी,कारण मी तुझी फक्त विडंबनंच वाचली आहेत.).....खूप टची झालीये कविता !:)