माझी मुलाखत!!

अरे लोकांनो उद्या म्हणजे २९ मे ला दुपारी २ वाजता स्टार माझा वर 'करीअर मंत्र' या कार्यक्रमात माझी मुलाखत आहे. लाइव्ह आहे आणि फोन इन.
रीकास्ट कधी आहे ते माहीत नाहीये पण रात्री असण्याची शक्यता आहे.


दुपरी दोनला पहाणे जरा अवघड आहे. शनिवार, रविवार किंवा एखाद्या सायंकाळी पुनःप्रसारित होणार असेल तर कृपया कळवा!



अज्जुका, अभिनंदन!!
रात्री कधी पुनःप्रसारण असेल ते सांग म्हणजे बघता येईल. कारण ऑफिसात टिव्हीची सोय नाही.



हो, रात्रीच पाहणे शक्य आहे. तेव्हा रात्री परत दाखवत असतील तर सांगा.

साधना.



अज्जुका, अभिनन्दन.
रिटेलिकस्ट कधी आहे ते नक्की सांग. म्हणजे बघता येईल.
अनघा



नीरजा, २ ला नाही गं, ३ वाजता आहे मुलाखत. मी पहाणार आहे! स्मित सुदैवाने आज बापु नाहियेत ऑफिसात! फोन करु का तुला???



मी पण २ वाजता अपेक्षेने बघायला गेलो तर कॉलेज कट्टा कार्यक्रम होता. आता परत बघतो.



मुलाखत छान झाली. या क्षेत्राबद्दल अज्जुकाने उत्तम माहिती दिली.





रीकास्ट रात्री १ वाजता.
ते दुपारी २ नसून ३ आहे हे मला स्टुडिओमधे पोचल्यावर कळले त्यामुळे काही करता आले नाही. क्षमस्व!!



नीरजाचे नाव स्क्रीनवर निरजा असे दिसत होते, आणि मुलाखत चालू असताना अर्ध्या स्क्रीनवर जी दृष्ये दाखवत होते त्याचा नीरजाच्या कार्यक्षेत्राशी फारसा संबंध नव्हता.



अरे वा छान. मला नाही बघायला मिळाली अरेरे
नीरजा, अभिनंदन!! अशाच अनेक अजून छान मुलाखती होऊ देत ही शुभेच्छा स्मित
_____________________________________
|| यज्ञभृद् यज्ञकृद् यज्ञी यज्ञभुग् यज्ञसाधन: || यज्ञांतकृद् यज्ञगुह्यमन्नमन्नाद एव च ||



अभिनंदन नीरजा!
असाच उत्कर्ष होत राहो. आमच्या शुभेच्छा.



छान छान!!!!!!!!!



हाय अज्जुका, कशी झाली मुलाखत आणि कशाबद्दल होती? कॉस्च्युम, नाटक का इतर काही?



अरे फारेंडा करीअर मंत्रा म्हणजे करीअर गायडन्स चा स्लॉट आहे. कॉश्च्यूम डिझाइन मधल्या करीअर बद्दल होती. पण आधी कॉश्च्यूम डिझाइन म्हणजे नक्की काय इथपासून सांगितली माहिती. कारण अनेकांना फॅशन आणि कॉश्च्यूम डिझाइन यातला फरक लक्षात येत नाही.

तरी एकदोन गमतीशीर प्रश्न आलेच होते. एकाने सॉफ्टवेअर मधला प्रश्न विचारला तेव्हा मी उठून पळून जाण्याच्या तयारीत होते. कानावर हात ठेवून घाबरून पळून जाणारी मी कशी दिसेन असं एक दृश्य मी तेवढ्यातल्या तेवढ्यात बघून घेतलं मनात. अजून एक प्रश्न आला की मला मॉडेल व्हायचंय मी काय करू? मी मनात म्हणलं मग बन मॉडेल मी काय करू.. ते बहुतेक माझ्या चेहर्‍यावर दिसलं असणार.. स्मित



>>>सॉफ्टवेअर... मी मनात म्हणलं मग बन मॉडेल मी काय करू.. ते बहुतेक माझ्या चेहर्‍यावर दिसलं असणार.. हाहाहाहा
मॉडेलिंग आणि तुझा व्यवसाय यांची एकत्र मोट बांधणे एकवेळ समजू शकतो, पण सॉफ्टवेअर ?? तू मऊ कपड्यांच्या पेहरावाबद्दल बोलत होतीस का तेव्हा ? स्मित ही मुलाखत मिसली मात्र. फॅशन आणि तुझं क्षेत्र यांतल्या फरकाबद्दलचे फंडे अजून चांगले समजले असते.

    *** The opinions expressed herein are not necessarily those of my employer, not necessarily mine and probably not necessary. ***



    स्लार्टी माझ्या वेबपेजवर माय रायटींग्ज मधे जा. तिथे फॅशन कशाशी खातात असा लेख आहे माझा. तो वाच. तुझ्या सर्व शंका दूर होऊन तुला ज्ञानाचा प्रकाश दिसू लागेल... स्मित
    -नी
    http://saaneedhapa.googlepages.com/home



    अहो मॉडरेटर.. हे पेज उडवून टाका प्लीज.
    -नी
    http://saaneedhapa.googlepages.com/home