त्रिवेणी - २.

Submitted by A M I T on 25 November, 2010 - 07:15

१) गच्चीत उभं राहून चंद्र पाहण्याचं माझं वेड जुनंच .
आताशा तिथं चंद्र दिसत नाही.
तुझा चेहरा पाहिल्यापासून...

२) लाटेने आपल्या पायाखालची वाळू सरकली होती.
तेव्हा नकळत तू माझा हात घट्ट धरला होतास.
मी मात्र उगाच शोधत होतो, तुला स्पर्श करण्याची संधी.

३) हवेला पत्ता विचारला.
आणि सराईतपणे चालू लागलो तुझ्या घराकडली वाट.
तुझा सुगंध आता मला ओळखीचा झालाय.

४) तुझा चेहरा वाचण्याचा छंदच जडलाय मला
पण आज मात्र ही भाषा अनोळखी वाटतेय.
मी ओळखलं, तू गोंधळली आहेस.

गुलमोहर: 

!!!

१) गच्चीत उभं राहून चंद्र पाहण्याचं माझं वेड जुनंच .
आताशा तिथं चंद्र दिसत नाही.
तुझा चेहरा पाहिल्यापासून.

फार छान..... Happy