नको असलेले पाहुणे

Submitted by दीपाली on 20 November, 2010 - 01:10

नको असलेले पाहुणे पळवून लावायचे किंवा त्यांच्यापासून सुटका करुन घेण्याचे ह्युमरस उपाय हवे आहेत. अगदी टिपिकल घर बंद करून बाहेर जाणे वगैरे नको. काहीतरी नविन....
आणि अगदी लवकर Happy

मला विनोदी उपाय हवे आहेत, सोसायटीच्या ३१ डिसें. च्या कार्यक्रमासाठी स्क्रिप्ट तयार करतोय

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

.

.

..

.

ओळखीत एखादा वायूसेन असेल तर त्याला बोलावून घ्या (माझा एक मित्र आहे पण त्याला ठराविक पदार्थ खायला खूप घालावे लागतात, खर्च परवडणार नाही) किंवा स्वतःच भरपूर पावटे/मुळा/मके/हरभरे खायचे, आणि थोड्या वेळाने सोडा प्यायचा. घरातले वातावरण थोडे कोंडते राहील याची काळजी घ्यायची आणि पाहुण्यांच्या जवळपास फिरताना पाच पाच मिनीटांच्या अंतराने वायूअस्त्र सोडत रहायचे. डोक्यात हातोडा घातलात तरी एक वेळ सहन होईल पण तो वास.... श्श्शी!!!!!

.

श्री, हबा, अम्या, तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद, पण मला विनोदी हव आहे, चमकारीक किंवा किळसवाणं नकोय.:(

असुदे, आपण विनाकारण वैयक्तिक विनोद करतोय हे वेळीच लक्षात आल्यावर माझं नाव घालून लिहिलेली पोस्ट बदललीत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.

नको असलेले पाहुणे ना? सोप्पे व संगीत अनेक उपाय Light 1 आहेत! Proud जरा अतिरंजित उपाय आहेत. पण स्क्रिप्टसाठी जर काही विनोदी हवे असेल तर उपयोगी पडतील.

१. घरातील माळे, कपाटे, भांडीकुंडी, रद्दी इत्यादी प्रकार पाहुण्यांदेखत आवरायला काढणे.... प्रत्येकाच्या हातात झाडू, फडके, केरसुणी इत्यादी आयुधे देऊन त्यांना साफसफाईसाठी उद्युक्त करणे. ह्या उपायाने पाहुणे जरी गेले नाहीत तरी अम्मळ साफसफाई अनायासे होईल.

२. घरात ढेकणाचे - झुरळाचे औषध फवारणे. रात्रंदिन त्यांच्या संहाराच्या आवेशात राहाणे. ढेकणांच्या रक्तपिपासू वृत्तीच्या भयकथा पाहुण्यांना सुनावणे. औषधाच्या वासाने पाहुणेच काय, घरातील लोकही पळ काढू पहातील!

३. घरातील कोणाला तरी स्वाईन फ्लू अथवा तत्सम आजार झाल्याची किंवा त्यासमान लक्षणे दिसल्याची आवई उठविणे. त्यातून भोगायला लागणार्‍या इतर परिणामांनाही तयार राहणे.

४. पाहुणे उंदीरघुशींना घाबरत असतील तर घरात उंदीर शिरल्याची बतावणी करणे.

५. पाहुण्यांना आवडत नसणारे किंवा त्यांचे ज्यांच्याशी अजिबात पटत नाही असे नातेवाईक/ स्नेही खास त्यांच्या भेटीगाठीसाठी बोलावून घेणे! (काट्याने काटा.... हा हा हा)

६. आपल्याला बर्‍याच पैशाची / आर्थिक मदतीची तीव्र गरज आहे असे वातावरण निर्माण करणे.

अकु Lol

१. पाहुणे आल्या दिवसापासून रोजची आरती सुरू करावी. मान म्हणून आरतीचे ताट पाहुंण्यांच्या हातात द्यावे. मागे आपण मोठं आरतीचं पुस्तक घेऊन उभा रहाव. तास दीड तास तरी आरती चालावी.

२. जेवताना ताटाभोवती रांगोळी घालावी तीचा घेर (फक्त पाहुण्यंच्या ताटाभोवती) एवढा मोठा असावा की ताटात हात घालताना वाकायला लागावे.

३. एखाद्या बुवाचे अचाट वर्णन करण्यात रात्रीच्या महत्वाच्या मालिकांचा व बातम्यांचा वेळ जाईल याची दक्षता घ्यावी.

४. घरातल्या लहान मुलाला एखादे दहा मिनीटांचे किळसवाणे एकपात्री नाट़क बसवून ठेवायला सांगा. असे पाहुणे आले की त्याला श्रोता मिळतो व पाहुण्यांना मनाजोगते मनोरंजन.

५. सकाळी पाहुण्यांच्या चेहर्‍यावरून त्यांच्या प्रातःविधीच्या वेळेचा अंदाज करावा व मराठी वर्तमानपत्र घेऊन आत घुसावे... निवांत बसावे....

असे अनेक उपाय सांगता येतील. पण, ते नाटकात ठीक आहे. प्रत्यक्षात कधीही कुणाचा असा अपमान आपल्या हातून होणार नाही याची काळजी घ्या.

घरातील माळे, कपाटे, भांडीकुंडी, रद्दी इत्यादी प्रकार पाहुण्यांदेखत आवरायला काढणे>>>> बेस्ट उपाय smileyvault-cute-big-smiley-animated-023.gif

एक रड्के पात्र नेहमी ठेवावे. पाहुण्यांसमोर कायम स्वतःच्या गोष्टी सांगून रडणारे.

एक फार उत्साही पुणेरी आजोबा. एक कूल ड्यूड कायम आयपॉड लावून. एक लॅपटॉप वर फेसबूक करणारी मुलगी. ज्यांना घरून फक्त जेवण व झोप हवी असते असे. पण टेक्निकली स्पीकिन्ग असे लोकांकडून कल्पना घेऊन काय स्क्रिप्ट लिहायचे? लिखाण ही काही कोलॅबरेटिव प्रोसेस नाही.

पुणेरी पाहुणचार करावा. आल्याबर्रोबर पाहुण्यांना पाणि घेणार का? घेणार असल्यास किती? अशा प्रश्नांनी सुरुवात करावी. मग पुढे चहा जेवन इ. इ.

त्यानंतर मी चहा घेवुन येते/येतो म्हणुन स्वतः आत जावुन चहा पिवुन यावे.

थोड्यावेळाने त्यांना परतीच्या गाडीचा टायमिंग सांगावा (माहीत असल्यास). नसल्यास दरवाजात उभे राहुन शेजार्‍याला जोरजोरात ओरडुन परतीच्या गाडीची चौकशी करावी. इ. इ..

अर्थात हे फक्त विनोदी उपाय. प्रत्यक्षात मात्र "अतिथी देवो भवः"

अकु भारी Happy

>पाहुणे येण्याआधीच त्यंना आपण amway/quickstar इ. चे सभासद अहोत असे सांगणे.
Proud

अरे!!
हा उपाय का नाही सुचवला कोणी?
कविता / लेख वाचून दाखवणे? त्यावर पुर्वीच लय जोक झालेत म्हणुन?
पण जालिमतेबाबत अजूनही हारणार नाही होऽ! Wink

पाहुणे येण्याआधीच त्यंना आपण amway/quickstar इ. चे सभासद अहोत असे सांगणे.>>> हे सही Happy घरात एक कायमस्वरूपी व्हाईट बोर्ड व त्यावर एक वर्तुळ काढून, आत "तुम्ही" आणि बाहेर कार, घर वगैरे "तुमची स्वप्ने" ई. काढून ठेवावे.

यावर एक पूर्वी दूरदर्शन वर हिन्दी नाटकात जबरी कथा होती. घरात ठाण मांडून बसलेल्या एका ज्येष्ठ नातेवाईकाला घालवण्यासाठी नवरा आणि बायको नकली भांडण सुरू करतात. बरेच झाल्यावर वैतागून तो काका की कोण बॅगा घेउन बाहेर पडतो. मग नवरा आणि बायको खुश होउन "मी थोडाच खरा रागावलो होतो", "मी थोडीच खरी भांडत होते" वगैरे संवाद म्हणतात. तेवढ्यात पुन्हा दारातून बॅगा घेउन तो काका आत येतो आणि म्हणतो "मी थोडाच खरा गेलो होतो" Happy