औंदा तरी पाऊस पाड गे माय

Submitted by आशुचँप on 27 October, 2010 - 06:42

औंदा तरी पाऊस पाड गे माय
औदा तरी पाऊस पाड
करपून काली ठिकार पडलीया भुई
नजरेच्या पल्याडपर्यंत पेटलयं आभाल
झाडंबी झालीयात उघडी वागडी
त्यास्नी तरी जितं राहु दे गं माय
औंदा तरी पाऊस पाड
रगात वकत सुभान्यानं टाकली मान
आतडं तीळ तीळ तुटाया लागलं जवा
खाटीक वढत गेला त्यास्नी बांधून पाय
मुक्या लेकराचे आवाज काळीज कापतात गे माय
औदा तरी पाऊस पाड
बा गेला, त्याचं सोनं झालं
म्हातारी बी आता काय जगत नाय
लेकरांची दिसाया लागलीयात हाडं
त्यांच्या त्वांडात एकतरी घास घाल गे माय
औंदा तरी पाऊस पाड

(मी जन्मापासून शहरात वाढलेलो असल्याने ही ग्रामीण कविता रचताना काही अक्षम्य चुका झाल्या असतील तर मी त्याबद्दल आधीच दिलगीर आहे)

मला तरी चुका दिसल्या नाहीत (तुझ्यासारखाच जन्मापासून शहरात वाढलेलो असल्याने).
बाकी कविता मस्त.

.

हबा तुमचा प्रतिसाद कळला नाही..खूपच भीषण झालीये का?...काय चुकले असेल तर कान धरा..असा टिंब फेकून नका मारू... Happy

छान्....मस्तच....
आशाळभुत नजरेने आभाळात पाहणारा शेतकरी आठवला एकदम.......
वास्तव्....डोळ्यासमोर आल सार...

सावरी

नितिनजी अगदी मान्य..पण काय करणार तीन चार महिन्यांआधी मी कविताच करत नव्हतो आणि पुढच्या उन्हाळ्यापर्यंत थांबायचा धीर नव्हता...

काय राव पाऊस एवढा पडला न
तुमच्या क्डे नाही पडला
बाकी कवितेच्या ओळिंचा पाऊस झकासच

आशू... Happy

अगदी थोडासा बदल....

औंदा तरी पाऊस पाड गे माय
औदा तरी पाऊस पाड गे माय......

काली ठिकार करपलीया भुई
नजरंच्या भायीर पेटलयं आभाल
झाडंबी झाल्यात उघडी वागडी
त्यास्नी तं श्वास घेऊ दे गं माय
औंदा तरी पाऊस पाड गे माय......

रगात वकत सुभान्या टेकलाय
आतड्याचा पीळ तुटाया लागलाय...
खाटकाला आमच्या काळजाचं काय?
मुकी आसवे, काळीज माजे कापतात माय
औदा तरी पाऊस पाड गे माय.....

बा गेला, त्याचं सोनं झालं
म्हातारी बी काय आता जगत नाय
लेकरांची दिसाया लागल्यात हाडं
त्यांच्या त्वांडात एकतरी घास घाल गे माय
औंदा तरी पाऊस पाड गे माय .....

मी जन्मापासून शहरात वाढलेलो असल्याने >>>>> आपल्याच बांधवांच दु:ख समजाया अन ते मांडाया शब्द आड आले नाहीत, आवडली.बेस!