निवडक सुविचार संग्रह

Submitted by निमिष_सोनार on 16 October, 2010 - 10:53

* अनुभव म्हणजे तुमच्यासोबत जे घडले ते नव्हे, तर जे घडले त्यावर तुम्ही जे केले तो अनुभव!

* लोक तुमच्याशी कसे वागतात, हे त्यांचे कर्म! पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रीया देता, हे तुमचे कर्म!

* एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करुन काय उपयोग? कारण, ती केव्हा ना केव्हा सुटणारच!
एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही.

* भीतीला टाळाल- तर ती वाढत जाते. भीतीचा सामना कराल, तर ती पळून जाते.

* समस्या कोणत्याही दिशेने येवू द्यात, त्या समस्येवरचे समाधान तुमच्याकडुन जावू द्या!

* कठीण काळ कायम टिकाऊ नसतो, पण कठीण लोक असतात.

* अपयश कायम नसते. यश सुद्धा!

* मुर्खाचे हृदय जिभेवर असते, शहाण्याची जीभ हृदयात असते.

* चिंतेसारखे शरिराला जाळणारे दुसरे इतर काहीही नाही. - पंचतंत्र

* पुत्र सुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो पैसा स्वतः कमावेल. पुत्र कुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो मिळालेला पैसा गमावेल.

* स्वप्ने पाहिली पाहिजेत. ती पूर्ण होतात. नाहीतर, निसर्गाने आपल्याला ते पाहाण्याची शक्ती कशाला बरे दिली?

* "दिलेले वचन" एखाद्या "घेतलेल्या कर्जासारखेच" आहे.

* लोक तुमचा "सल्ला" मानत कधीच नाहीत. ते तुमचे "उदाहरण" घेतात.

* प्रशंसा - स्वीकारायला आणि करायला शिका.

* एखाद्या कृतीमध्ये पाप नसते. त्यामागच्या हेतूमध्ये पाप असते. जग आपल्याला आपण केलेल्या कृत्यांवरून तोलते. देव आपल्याला आपल्या हेतूंद्वारे मापतो. मग आपला हेतू आणि कृत्ये शुद्धच असली पाहिजेत. नाही का?

* कसलीच लाज नसणे हीच एक लाजीरवाणी गोष्ट!

* शब्द विविध पद्धतीने योजले असता वेगेवेगळा अर्थ निघतो. आणि अर्थ वेगेवेगळ्या पद्धतीने योजल्यास वेगळा परिणाम साधता येतो.

* काही लोक यशाची फक्त स्वप्ने बघतात. इतर लोक जागे होवून ती स्वप्ने पूर्ण होण्यासाठी धडपडतात.

* यशासारखे प्रेरणादायी दुसरे काहिही नाही. अपयशासारखा शिक्षक दुसरा कोणीही नाही. जीवनात पुढे जाण्यासाठी आपणांस दोन्ही आवश्यक आहेत.

* वाईट मनुष्य भीती दाखवली तरच आज्ञा पाळतो. चांगला मनुष्य प्रेमाद्वारे.

* मनुष्य ज्याला घाबरतो त्यावर कधीही प्रेम करू शकत नाही.

* आपण एखादी गोष्ट करू शकतो की नाही, हे ती गोष्ट करून पाहील्याशीवाय समजत नाही.

* ज्याचा शेवट गोड, ते सगळेच गोड!

गुलमोहर: