माझं फॅब्रिक पेंटिंग

डबल बेडशीट वर मी नुकतचं केलेलं फॅब्रिक पेंटिंग.

bird_pics_002.jpg

उशीच्या अभ्र्यावरचे design

bird_pics_004.jpg

चादरीच्या दोन्ही कॉर्नर्स ना design आहे. त्याचा फोटो.

bird_pics_008.jpg


छान झालंय. बेड पण मस्त आहे. स्मित



सुरेखच झालय, आवडलं



खूप छान आहे गं सोनचाफा! स्मित
आजुबाजूची नाजुक वेलबुट्टी झकास.. रंग पण सुरेख आलेत.



छान आहे, बेडचे डिझाईनही छान आहे. उशीच्या अभ्रावर उलट्सुलट पेंट केले असते तर आणखी शोभले असते का ?



सुरेख आल आहे ग!



वॉव !!

प्रिंटेड वाटतेय ! (ईतके छान आले आहे ) स्मित



वा! मला उशीवरची ३ टींब असलेली लांबलचल फांदी आणि त्यावरील फुलेच जास्त आवडली.



सुन्दर. बेड पण खूप छान आहे.



लालू, आयटे, चिनू, दिनेश, अखि, प्रकाश, बी आणि mmm333, प्रतिक्रियांबद्दल खूप खूप धन्यवाद !

खरं तर आत्तापर्यंत किमान २५ चादरी पेंट केल्या असतील पण फोटो निघणं ह्या चादरीच्या नशीबात होतं.. पूर्वी माझ्याकडे डिजिटल कॅमेरा नव्हता आणि फोटो स्कॅन करायची सोयही नव्हती. आता कॅमेरा असल्याने फोटो टाकता आला. मी पेंट केलेल्या सगळ्या चादरी भेट म्हणून देण्यातच गेल्या.. आजही माझ्याकडे मी पेंट केलेली एकही चादर शिल्लक नाही किंवा मी कधी ती वापरलेलीही नाही.. शिल्लक आहे तो फक्त हा बेड जो तुमच्या नजरेत आला. बेडवरची चादर ही जरी माझी हस्तकला असली तरी हा बेड म्हणजे माझ्या नवर्‍याची हस्तकला आहे. स्मित तो त्याने स्वतः डिझाईन केला असून स्वतःच बनवला आहे. तुम्हाला तो आवडला ही प्रतिक्रिया त्याला जरूर सांगेन.

दिनेश, हे डिझाईन ह्या पूर्वी बनविलेल्या काही चादरींवर मी वापरलं होतं. त्यात तुम्ही म्हटल्याप्रमाणे उलटसुलट डिझाईन केलं होतं. ह्या चादरी व उशीची कव्हरं विकतची शिवलेली असतात. ती खूप मोठया उशीच्या मापाची असतात. सर्वसाधारणपणे घरात असणार्‍या उशांना ती खूप मोठी होतात आणि त्यामुळे कव्हरची बाहेरची बाजू उशीच्या बाहेर उरते. त्या वेळी ही डिझाईनची मोठी बाजू नीट दिसत नाही. त्यामुळे ह्या वेळेस मी ते एकाच दिशेने केलं. आणि मी मारे केलं दोन्हि बाजूनी तरी शेवटी वापरताना लोकं कसं वापरतात हे मला काही आजपर्यंत माहीत नाही.. म्हटलं कशाला नेहेमी नेहेमी सगळे अगदी सिमेट्रीचा विचार करत करा? ह्या वेळेस करू असच...



सुपर्ब !!!!! झ्क्क्क्क्क्क्क्कास जमलय ग. खरच बेड आणी बेडशिट दोन्हि छान आहेत.



सोनचाफा नवर्‍याला आवर्जून सांगणे डीझाईन छान आहे म्हणून.



बेडची ऑर्डर घेणार का, ते विचारून सांग.



हे हे हे हे.... स्मित नाही नाही ते जमेल असे आज तरी वाटत नाही.. पण खरं सांगायचं तर त्याला लाकडी किंवा प्लॅस्टिकचे फर्निचर अजिबात आवडत नाही.. त्यामुळे सगळं काही बांबू किंवा वेताचे आहे घरात. कधी काळी प्लॅस्टिक इंडस्ट्री होती त्याची पण ती सोडली आणि इकोटुरिझम मध्ये उडी मारली... आता फॉरेस्ट कॉन्झर्व्हेशनच्या दृष्टीने लाकूड घरात वापरायचं नाही असा त्याचा कटाक्ष आहे.. प्रिंटर, फॅक्स मशीन आणि लॅपटॉप ठेवता येईल असे टेबल सुद्धा बनवायचं आहे पण वेळ मिळत नसल्याने अजून ते अर्धवट स्थितीत पडून आहे. त्याने आणखी एक बनवलेला सिंगल बेड दुसर्‍या खोलीत आहे.. आमचं डायनिंग टेबल सुद्धा बांबूचेच बनवलेलं आहे.. सवडीने त्याचाही फोटो काढून इथे पोस्ट करेन. घरात जेवायला बसायला वेताचे मोढे आहेत आणि बसायला वेताच्याच रेडीमेड खुर्च्या.. अर्थात ते मात्र विकत घेतलेले आहेत.
खरं तर चादरीचे फोटो पोस्ट करतानाच बेडबद्दल लिहीणार होते पण मुद्दाम लिहीले नाही.. विचार केला बघू कोणाच्या लक्षात येतं का ते... बांबूचं फर्निचर खरं तर फार क्वचित कोणी पाहिले असेल आणि आपल्या कडे सर्वसामान्यपणे लाकडी फर्निचरच लोकांना आवडते.. पण साध्या बांबू पासून बनवलेलं टेबल सुद्धा किती सुंदर दिसू शकतं ह्याचा तुम्हाला अंदाज येईल.



खुप छान! अवड्ल॑ बुआ



सुंदर हस्तकला.



हे बघीतलच नव्हत, छान आलय की आणि पलंग पण छान आहे, तुम्हा दोघांच्याही हातात कला आहे म्हणायची. स्मित



सोनचाफा, बांबूचा पलंग लक्षात आला होता गं, पण हाताने घरातच बनवला असेल, हे नाही लक्षात आले!! सहीच जमलेय!! मलाही बांबूचे फर्निचर खूप आवडते. साधे पण क्लासिक वाटते, अजून काही फोटो असतील तर पोस्ट कर गं