ओहायो

ओहायोमधले मायबोलीकर


सिडनी च्या आसपास काही पाहण्यासारखे आहे का?
मी तीन महिन्यांकरता सिडनी ला येत आहे.....



काय बावळट सारखे पोलीस आहेत तुमच्या राज्यात. बघावे तिकडे पोलीसच पोलीस.
.
सगळीकडे speed gun घेवुन उभे. आमचे tri-state बरे, ८० च्या speed ला देखील पोलीस काही म्हणत नाही.



मंडळी,
मायबोलीच्या टी-शर्ट तसेच टोपीची विक्री चालू झाली आहे.
अधिक माहितीसाठी इथे पहा व लवकर आपापली ऑर्डर बुक करा...
धन्यवाद,
टी-शर्ट समिती



मी पोहोचलो ओहायोमध्ये..... कोणी आहे का इकडे?



नमस्कार स्वरूप. ओहायोला कुठे. मी डेटन मधे होतो १ वर्षे.



हो का!... अरे सही.
माझी कंपनी सिडनी मध्ये आहे आणि मी रहातोय ट्रॉय मध्ये...
तुम्ही कुठे असता सध्या?



मी आता LA मधे असतो. LA बीबी वर दिसेन तुला. अरे तुरे करुया रे, आपण एकाच वयाचे असू. काय बोलतो?
तू इथे ओहायोत स्थायिक का?



अरे स्थायिक नाही.... ऑनसाइट आलोय.... सप्टेंबरला परतीन भारतात (एक्स्टेंण्ड नाही झाल तर डोळा मारा )
तु काय स्थायिक का?
मुळचा कुठला?



नमस्कार ओहायोकर्स!
मी डब्लीन (कोलंबस) ला रहायचे पुर्वी.



हाय पन्ना,
आता कुठे असता तुम्ही?



हाय स्वरुप, सध्या मी कनेक्टीकट मधे आहे.
ट्रॉय ला भारतीय आहेत का??



फारसे नाहीत....
म्हणजे असतील पण दिसले नाहीत...
माझा एक (भारतीय)मॅनेजर रहातो ट्रॉय मध्ये!



मी ठाण्याचा. लहानपण (नोकरी लागे पर्यंत तिथेच होतो) कल्याणला गेलं. आता ४ वर्षे झाली इथे आणि लवकर परत जाईन असे वाटत नाही म्हणजे स्थायिकच म्हणायचं. स्मित तु कुठल्या कंपनीत? इथे क्लायंट कोण?



हाय तेजस स्मित मी पण ठाण्याचीच. कल्याणला कुठे रहात होतास? रामबाग कॉ मधे माझा मामा राहतो.



मी इमर्सन (कोपलण्ड) मध्ये आहे....
क्लायंट वगैरे कोणी नाही... आमच हेडऑफिस आहे ओहायोमध्ये!

तेजस, पन्ना तुम्ही काय करता?



पन्ना,

Dublin ला कुठे रहात होतिस? मी पण होतो Dublin ला २००१ मध्ये.



कोणी मायबोलीकर डेनवर ( कोलोरॅडो ) ला आहेत का?
मी पण येत आहे स्मित

नव्या मायबोली वर पटकन लोकं सापडत नाहियेत...

कोणी डेनवर वासिय असतील तर लगेच मझ्याशी संपर्क साधा !!



अरे, समीर चा मेसेज ईकडे बघितलाच नाही.
मी Arbors of Dublin मधे होते. सॉ-मील रोड जवळ. सॉ-मील रोड म्हणजे खाऊ गल्ली होती! स्मित



****************************************************************
तुमच्या लग्नात घेतलवत का हो तुम्ही "नाव"?... नाही.... अरेरे!... पण असु द्या, आता भागवुन घ्या हौस...
काय म्हणला घेतलवतत... अहो मग परत घ्या ना! ... तेव्हढाच पुनःप्रत्ययाचा आनंद आणि दुसर्‍या कुणाच तरी नाव घ्यायची संधी!
काय? तुमच लग्न व्हायचय अजुन... मग तर उत्तमच!.... चला उखाण्याची नेट प्रॅक्टिस करुन घ्या...

कुठ काय विचारताय?.... गणेशोत्सवाच्या स्पर्धेत

सुरु झाला गणेशोत्सव
गोळा झालं गाव...
उखाण्यांच्या स्पर्धेत
टाका घेऊन "नाव" !

इथे टिचकी मारा
http://www.maayboli.com/node/3280/contests
***************************************************************



नमस्कार मंडळी.

दिवाळीची चाहूल कशी अगदी आसमंतात भरून राहिली आहे नाही?
वर्षातल्या सर्वात मोठ्या या उत्सवात लक्ष्मीच्या स्वागतासाठी तुमची लगबग सुरू झाली असेल. घरातली अडगळ काढून साफसफाई करायची आहे. घर रंगवायचे आहे. नवीन खरेदी करायला दोन-तीन दिवस तरी पाहिजेत. प्रियजनांच्या गाठी आणि त्यांच्यासाठी भेटी घ्यायच्या आहेत. नोकरी-धंद्यातल्या संबंधांना यानिमित्ताने उजाळा द्यायचा आहे. बर्‍याच नातेवाई़कांकडे जायचे नियोजन करायचे आहे.. हे ना ते. अनंत विषय मनात असतील, अन् कमी वेळेत कसे कसे होईल हा प्रश्नही!

या गडबडीत आपल्या दिवाळी अंकाला मात्र विसरू नका, म्हणजे झाले.

दिवाळी अंकाची घोषणा होऊनच आता आठवडा उलटून गेला आहे. दिवाळी अंकातला आपला सहभाग निश्चित करण्याच्या दृष्टीने हीच वेळ आहे घाई करण्याची.
आपल्या लाडक्या मायबोलीचा हा नववा 'हितगुज दिवाळी अंक', "मायबोली-मायमराठी- गेले तप आणि येणारे तप" असा विषय घेऊन महाजालावर आपणा सर्वांसमोर येतो आहे, हे दिवाळी अंक घोषणेत सांगून झालेच आहे. या वर्षी आपला दिवाळी अंक मूर्त रूप घेणार आहे तो फक्त शब्दरूपाने नव्हे, तर दृक्-श्राव्य रूपाने सुध्दा. यामध्ये कथा, कविता, ललित, हलकेफुलके लेख, प्रवासवर्णन, रसग्रहण यांबरोबरच बाल साहित्य व आपल्या गुणप्रदर्शनांचे स्वागत आहे..

आपण अजूनही विचार करत असाल, विषय ठरले झाले नसतील तर आपण घाई करायला हवी. ऐनवेळी तुमची धांदल नको, म्हणून ही आगाऊ सूचना!
तेव्हा, लागा बघू तयारीला..!!

आपले साहित्य तयार असेल तर दिवाळी अंकाची घोषणा व त्यातील सूचना पुन्हा एकदा वाचून, कृपया आपले साहित्य दिवाळी अंक लेखनाच्या खालील दुव्यावर पाठवावे.
http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1

काही शंका असल्यास, आपल्या प्रश्नांचे स्वागत आहे..

--
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २००८