गुहागर

गुहागरचे मायबोलीकर


माज़ आजोळ गुहागर मधे वरच्या पाटाला आहे.

लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत आइ बरोबर गुहागर ला जात होतो. सकालि मऊ मेतकुट भात आणी दहि असा ब्रेकफ़ास्ट करुन देविचा देवळात जायाचे.
कधी अशट्वने कधी पर्टवणे.
रोज सन्द्याकाली मात्र समुद्रावर बराच वेळ बागड्ण्यात जायचा की कधि रात्र व्हायची कळायचेच नाही.
पाण्यात खेळायला खुप धमाल यायचि.
नखशिखात वाळुने भरलेले कपडे.बाहेरचा बाथरुम मधे कपडे बदलुनच घरात प्रवेश.
दाभोळ्च्या चणकाइ ल एक दिवस.
व्याडेश्वराला एक दिवस.
पटापट दिवस सम्पयाचे.
येताना पुण्याला दुसरया आजी आजोबान कडे राहुन शाळेचय आधि एक आठ्वडा परत.मग शाळेचि तय्यारि करुन शाळेत जायला तयार.धमाल नि काय.. रेनकोट चि पहिलि खरेदि. आणि पावसाळा आणी शाळा एकदमच सुरु