स्पर्श...

नुकताच आसवांना.. बिलगून स्पर्श गेला..
हळुवार हुंदक्यांना..रडवून स्पर्श गेला..

अनभिज्ञ .. तृप्त गात्री.. रोमांच वेचताना..
अस्थिर स्पंदनांना.. अडवून स्पर्श गेला..

अलगुज भावनांचे .. शब्दात मांडताना..
कवितेत शिल्प माझे.. घडवून स्पर्श गेला..

भावार्थ आर्जवांचा.. समजून सांगताना..
कित्येक गूढ गोष्टी .. पढवून स्पर्श गेला..

अनमोल त्या क्षणांना.. हृदयात शोधताना..
नक्षत्र अंतरंगी.. जडवून स्पर्श गेला..!!!


छान आहे, आवडली कविता

सुधीर



व्वा......क्या बात है...!! आवडेश स्मित



गझल वाटते....

अलगुज भावनांचे .. शब्दात मांडताना..
कवितेत शिल्प माझे.. घडवून स्पर्श गेला..
ह्या ओळी सर्वात आवडल्या...



वा वा. पूजा, गजल हो सकती है!
गागालगालगागा गागालगालगागा
नुकताच आसवांना.. बिलगून स्पर्श गेला..
हळुवार हुंदक्यांना..रडवून स्पर्श गेला..

काही ठिकाणी मात्रांनी गुटली खाल्लीये. पण थोडं काम केल्यास उत्कृष्ट गजल होऊ शकते.
अलगुज भावनांचे .. शब्दात मांडताना..
कवितेत शिल्प माझे.. घडवून स्पर्श गेला..

आवडलीच!



स्मित 'अनभिज्ञ...' , 'अलगुज...' आणि 'भावार्थ...' मस्त.

*** Veni, vidi, Visa. I came, I saw, I bought. ***



सुरेख!
बापू



सुरेख कविता......



"स्पर्श" खुप आवडली, या कवितेतील भावना म्हणजे सुवर्ण आणि कवितेतील शब्द म्हणजे रत्न, आणि ही कविता म्हणजे कुणीही भाळावे असा अप्रतिम दागिना...
मनापासुन अभिनंदन...



पुजा गं पुजा, माझ्याकडे तुझ्या कविता मी जपुन ठेवल्या आहेत. उदा. जमेल??, कशाला??. त्यात ही पण ऍड झाली ...नेहमीप्रमाणे



वाह सही एकदम ..........!



छान!

निखिल.