मालवण ऐतिहासिक वारसा

मी बघितलेले मालवण जरासे शहरी...बरेचसे ग्रामिण....अन ऐतिहासिक वास्तुचि देणगि लाभलेले एक सुंदर गाव.
माझ्या द्रुष्टितुन पाहिलेले हे गाव माझ्या फोटोग्राफिच्या पहिल्या प्रयत्नातुन येथे सादर करत आहे. scan.jpg
श्री जयंत साळगावकर यांनि बांधलेले हे श्री गणेशाचे मंदिर पुरातन नसले तरी या गावतिल एक महत्वाचे प्रेक्षणिय स्थळ आहे. या मंदिरातिल श्री गणेशाचि हि मुर्ति स्वर्ण मुर्ति आहे.
scan0001.jpg
हे श्री रामाचे मंदिर जेथे श्री रामाचि एकटी मुर्ति आहे... बंधु लक्ष्मण आणि सीतामाई त्यांच्यासोबत नाहित.
scan0002.jpg
हे श्री विठ्ठल रखुमाईचे मंदिर शिवकालिन असल्याचे तेथिल लोक सांगतात. कौलारु घरासारखे दिसणारे हे मंदिर जरासे दुर्लक्षित असले तरि उत्तम व्यवस्थापनेमुळे ब-याअवस्थेत आहे.
scan0004.jpg
हा सागरी किनारा
ओला सुगंधि वारा...
असेच वर्णन मालवण येथिल या सागर किना-याचे करायला हवे. हा सागर किनारा आणि याच्या लाटांशि झुंज देणारा हा कुरपे बेटावरील सिंधुदुर्ग किल्ला.
scan0005.jpg
शिवरायांच्या वास्तुकलेचा एक उत्तम उदाहरण म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला. शिशाच्या रसात बसविलेले हे दगड आजहि वास्तु स्थापत्याला आवाहन देणारे आहेत. कोणाच्याहि नजरेला प्रथम दर्शनि न पडणारे प्रवेशद्बार हेच आहे.
(बोटितुन फोटो घेतल्यामुळे प्रवेशद्वार नीट दिसत नाहि.
scan0003.jpg
श्री गणेशाचि हि मुर्ति संपुर्णपणे वाळुचि बनलेलि आहे.
scan0006.jpg
किल्ल्यावरील हा सुर्यास्त ... मला आवड्लेला.


सुरेखच मनमोहक किनारे!



खरच फारच सुन्दर आहे हि जागा,धन्यवाद



मालवणची सहलच घडवुन आणलीत. आभार.



प्रीतीबेन,
सही!
स्मित