मित्रा - पल्लि

त्या क्षणाचा आभार मानु
की सुखाचा अवतार मानु
अभिमान मानु मी तुझा
की स्वतःला धन्य मानु?
दारापल्याड दाहक ऊन
मज दाखवी तप्त वाकुल्या
भेटलास मित्रा तु जसा
ना भेटल्याही सावल्या.....
आज मी एकांत यात्री
क्लांत मनाच्या काहिल्या
शिडकाव शब्दांचा तुझ्या
गंधित मृत्तिका जाहल्या
गुणगुणतील शब्द आता
घेउन हाती कवडसा
भेटलो मी तुला अन
भेटलास मजला तु जसा....
काय मी सांगु मित्रा
काय मजला वाटले
फार दिसांनी जणु काही
आयुष्य मजला भेटले!


तुझ्या प्रतिभेला माझा सलाम....

क्लांत मनाच्या काहिल्या
शिडकाव शब्दांचा तुझ्या
गंधित मृत्तिका जाहल्या

खरं सांग

ताई, शब्द तुझे गुलाम तर नाही ना?

*******************
अभिजीत४मैत्री



भेटलास मित्रा तु जसा
ना भेटल्याही सावल्या.....

कुणी एवढ छान कस लिहु शकत?



तसा मी कवितेचे कौतुक करायला लहान आहे,तरी कविता मला फार आवडली...



छान



ठमे,
आवडली हं कविता.
- अनिलभाई



सर्वाचे मनःपुर्वक आभार्...



पल्ली,
दारापल्याड दाहक ऊन
मज दाखवी तप्त वाकुल्या
भेटलास मित्रा तु जसा
ना भेटल्याही सावल्या.....

आवडल्या ह्या ओळी!