Submitted by पल्ली on 5 May, 2008 - 02:08
ह्या क्षणांना जोडणारे
शब्द मी आणु कसे?
नात्यांचे चुकले संदर्भ सारे
स्पष्टीकरण मागु कसे?
बाळगली ना भीड कुणाची
केले जे जे पटेल ते
आज चुकल्या वाटा तर मी
गाव माझे शोधु कसे?
होण्यास आहे संध्याकाळ वाटे
पुन्हा होणार नाही पहाट जणु
रुतणार नाहीत पायाना
असे काटे कोठुन आणु?
चालले मी आज दूरवर
रक्त घेउन डोक्यावर असे
वागविले मस्तकावर जखमेला
अश्वत्थाम्याने जसे!
ना उमगले रहस्य मजला
प्रयत्नही फसला तसा
स्पर्श करता दूर जातो
चपळ दुष्ट पारा जसा...
ह्या क्षणाला स्पष्ट सारे
त्यावर मी घालते फुंकर
असेच राहु दे धुसर तारे
न दिसावे त्यावरचे विवर........
गुलमोहर:
शेअर करा
ओहो! सुंदर,
ओहो! सुंदर, पल्ली, सुंदर!
रुतणार नाहीत पायाना
असे काटे कोठुन आणु?
............
ह्या क्षणाला स्पष्ट सारे
त्यावर मी घालते फुंकर
असेच राहु दे धुसर तारे
न दिसावे त्यावरचे विवर........
अतिशय अतिशय तरल 'स्पष्टीकरण'!
सुरेख!!!
सुरेख!!! तुमच्या काव्यप्रतिभेला सलाम !!!
खुपच
खुपच सुंदर. प्रतिसाद द्यायला शब्द मी आणु कसे?
सर्वांचे
सर्वांचे आभार. ह्या सार्याच्या निमित्ताने माझे दु:ख झेलण्याची क्षमता वाढली माझी. धन्यवाद मित्रहो....माय्बोलिकरहो....
पल्ली, उत्त
पल्ली,
उत्तम !! सहजसुंदर फ्लो.
"स्पर्श करता दूर जातो
चपळ दुष्ट पारा जसा..."
"रुतणार नाहीत पायाना
असे काटे कोठुन आणु?"
"ह्या क्षणाला स्पष्ट सारे
त्यावर मी घालते फुंकर
असेच राहु दे धुसर तारे
न दिसावे त्यावरचे विवर........"
टॉपच !!
..................अज्ञात
अतिशय तरल,
अतिशय तरल, संवेदनशील मनाशिवाय ह्या भावना इतक्या उत्कटतेने मांडता येणे शक्य नाही. सुन्दर भावप्रतिभा !!!