हाय, कसा विश्वास हरवला समर्पणाचा ध्यास हरवला ।
तुझ्यासंगती दरवळलेला उरातला तो श्वास हरवला ।
सातजणांना पुरुन उरे, तो तिळाएवढा घास हरवला ।
जगण्याला धुंदी स्वप्नांची विस्मृतीत इतिहास हरवला ।
युगाहुनी मोठा असणारा प्रतीक्षेतला तास हरवला ।
सत्य ज्यातुनी वेचुन घ्यावे मोहकसा आभास हरवला ।
-सतीश
वाह.....
प्रत्येक, अगदी प्रत्येक शेर आवडला... (पण मतला जरा फिका वाटतोय..) सत्य ज्यातुनी वेचुन घ्यावे मोहकसा आभास हरवला । केवळ सुंदर...
वा! शेवटचे २ शेर फार आवडले! मस्त गझल आहे...
व्वा, मस्तच
हा शेर खासच.
सुधीर
वाह.....
प्रत्येक, अगदी प्रत्येक शेर आवडला... (पण मतला जरा फिका वाटतोय..)
सत्य ज्यातुनी वेचुन घ्यावे
मोहकसा आभास हरवला ।
केवळ सुंदर...
वा! शेवटचे २ शेर फार आवडले! मस्त गझल आहे...
व्वा, मस्तच
सातजणांना पुरुन उरे, तो
तिळाएवढा घास हरवला ।
हा शेर खासच.
सुधीर