सांगता सांगता शब्द गोठून गेले,
तरंग मनाचे असे विरून गेले,
जगाची मला नसे काही चिंता,
तरी एक दडपण दाटून गेले
तुझीच व्हावे प्रिती अपुली जूळावी,
तुझी साथ मजला जन्मोजन्मी मिळावी,
तुझी प्रितवेडी मी तुझी मूर्तवेडी,
तुझी साद कानावरी या पडावी
सांगावेच का..की जाणशील तू,
मनीचे गुपित कधी उलगडशील तू,
नयनांच्या भाषेत उतरेल जेव्हा ते,
सांग तेव्हा कवेत घेशील का तू?
की नाही समजणार तूला माझी प्रीत,
की येईल आड जगाची या रीत,
की जाशिल सोडून तू अधूरी कहाणी,
कशी रे जगेल मग तुझी ही दिवाणी?
--स्नेहा
सांगता सांगता शब्द गोठून गेले,
तरंग मनाचे असे विरून गेले,
जगाची मला नसे काही चिंता,
तरी एक दडपण दाटून गेले
मस्त फ्लो होता. पुढे जरा फ्लो बदलला असं मला गरिबाला वाटलं. पण टोटॅलिटीत मस्त !