मना दाटते सुख, देव पुन्हा घरा आले
काळोखाच्या भय-स्वप्नी तांबडे आभाळ झाले
वाट चुकलेला कोणी, शोधतो काय जाणे?
उरले न त्याचे काही, काय देणे काय घेणे?
कवटाळ घट्ट घट्ट गुदमरे श्वास येथे
भेट तुझी होता देवा, मोकळे भान झाले...
दर्पणात बघतो प्रतिमा देवपणा लाभलेली
तुझ्या-माझ्या मधे कशी द्वैत-काच आडवी उभी?



मना दाटते सुख, देव पुन्हा घरा आले
काळोखाच्या भय-स्वप्नी तांबडे आभाळ झाले >> मस्त रे, सुरवातच आवडली!!!
सुरेख.
अप्रतीम !!!
>द्वैत-काच आडवी उभी?
खरंय !