प्रचंड आवडली. मात्रांचं मला काय फारसं कळत नाही... पण म्हणताना गडबड वाटत नाहीये.
गोवर्धन, प्रश्नं शेर आवडलेच पण शेवटचा शेर आरपार गेला...
सुखाच्यां बाणांच्या शैय्येवर लागलेली घरघर...
ह्यानंतर आज काहीही वाचणे नाही, पुलस्ती... (बरं झालं इथे संध्याकाळ झालीये)
Submitted by desh_ks on शुक्र., 05/02/2008 - 00:18.
पुलस्तिजी,
'गोवर्धन' आणि 'प्रश्नोत्तर' हे शेर आवडले.
'नीलकंठ' शेराचा संदर्भ अधिक व्यापक असायला हवा असं वाटलं. शेवटच्या शेरात, "प्रयत्नपूर्वक मिळवलेली सर्व सुखं निर्वाणीच्या क्षणी निरर्थक ठरतात / वाटतात", असं म्हणणं अभिप्रेत आहे का?
अस्थानी चिकित्सा होते आहे असं वाटल्यास कृपया सांगावे.
-सतीश
Submitted by pulasti on शुक्र., 05/02/2008 - 06:49.
प्रतिसादासाठी सर्वाना धन्यवाद!
चिन्नु, १६ मात्रांचं मात्रावृत्त आहे. अक्षरगण नाहिये. म्हणून कदाचित पहिल्या वाचनात थोडं अडखळायला होऊ शकतं.. पण २ र्या वाचनात लय सापडेल.
सतीश ("जी" लिहीत नाही ),
नीळकंठ चा मला अपेक्षित "थेट" संदर्भ पर्यावरणाशी आहे. नद्या, समुद्रांमध्ये "हलाहल" वाढतच चाललंय. यावर परिणामकारक उपाय काय? तो कोण योजणार? कोण ही "माझी" जबाबदारी आहे असं मानणार? आज कोण "नीळकंठ" बनणार?
एखाद्याला अध्यात्मिकही संदर्भ लागू शकतो. हे "हलाहल" आणि हे "मासे" कोण असा जर थोडा खोल विचार केला तर.... माझ्यासाठी मात्र मी हा सरळसरळ "पर्यावरण" शेर मानतो. (ओढून-ताणून अध्यात्म तर प्रत्येकच शब्दात सापडतं )
शरपंजर - जगण्याचं सार लढण्यात (मानसिक, शारिरीक, वैचारिक) आहे. त्या "जद्दोजहद" मध्ये, त्या "struggle" मध्ये आहे. हे लढणं थांबलं की मग जमा केलेली, जमा होत असलेली सर्व सुखं एक शरपंजर होतात आणि माणोस म्हणून जगण्याला घरघर लागते.
अशी चिकित्सा मलातरी येथे अजिबात अस्थानी वाटत नाही! देवाणघेवाण होते, शिवाय आपले विचार आपल्यालाच पुन्हा स्पष्ट होतात. छोट्या बहरच्या गझलेबाबत तर अशी चर्चा झालीच पाहिजे कारण अशा गझलेत कल्पना स्पष्ट न होण्याचा मोठा धोका असतो.
गझल ठीकाय. मात्रांमध्ये गडबड आहे वाट्टं. चुभूद्याघ्या.
मतला नी मक्ता नाही कळाले.
काठ्यांचे गर्दीत गोवर्धनाखाली एकत्र यायचे विसरले जातेय. शिवशंकरांना आवताण देवून बरे केलेत
का प्रश्नांना नसते उत्तर?
पुन्हा प्रश्न, मी पुन्हा निरुत्तर!
हे छान. फार आवडले.
का प्रश्नांना नसते उत्तर?
पुन्हा प्रश्न, मी पुन्हा निरुत्तर!
आणि शेवटचा शेर खूप खूप आवडले.
प्रचंड आवडली. मात्रांचं मला काय फारसं कळत नाही... पण म्हणताना गडबड वाटत नाहीये.
गोवर्धन, प्रश्नं शेर आवडलेच पण शेवटचा शेर आरपार गेला...
सुखाच्यां बाणांच्या शैय्येवर लागलेली घरघर...
ह्यानंतर आज काहीही वाचणे नाही, पुलस्ती... (बरं झालं इथे संध्याकाळ झालीये)
पुलस्तिजी,
'गोवर्धन' आणि 'प्रश्नोत्तर' हे शेर आवडले.
'नीलकंठ' शेराचा संदर्भ अधिक व्यापक असायला हवा असं वाटलं. शेवटच्या शेरात, "प्रयत्नपूर्वक मिळवलेली सर्व सुखं निर्वाणीच्या क्षणी निरर्थक ठरतात / वाटतात", असं म्हणणं अभिप्रेत आहे का?
अस्थानी चिकित्सा होते आहे असं वाटल्यास कृपया सांगावे.
-सतीश
pulasti chhaanach!!!!
प्रतिसादासाठी सर्वाना धन्यवाद!
),
)
चिन्नु, १६ मात्रांचं मात्रावृत्त आहे. अक्षरगण नाहिये. म्हणून कदाचित पहिल्या वाचनात थोडं अडखळायला होऊ शकतं.. पण २ र्या वाचनात लय सापडेल.
सतीश ("जी" लिहीत नाही
नीळकंठ चा मला अपेक्षित "थेट" संदर्भ पर्यावरणाशी आहे. नद्या, समुद्रांमध्ये "हलाहल" वाढतच चाललंय. यावर परिणामकारक उपाय काय? तो कोण योजणार? कोण ही "माझी" जबाबदारी आहे असं मानणार? आज कोण "नीळकंठ" बनणार?
एखाद्याला अध्यात्मिकही संदर्भ लागू शकतो. हे "हलाहल" आणि हे "मासे" कोण असा जर थोडा खोल विचार केला तर.... माझ्यासाठी मात्र मी हा सरळसरळ "पर्यावरण" शेर मानतो. (ओढून-ताणून अध्यात्म तर प्रत्येकच शब्दात सापडतं
शरपंजर - जगण्याचं सार लढण्यात (मानसिक, शारिरीक, वैचारिक) आहे. त्या "जद्दोजहद" मध्ये, त्या "struggle" मध्ये आहे. हे लढणं थांबलं की मग जमा केलेली, जमा होत असलेली सर्व सुखं एक शरपंजर होतात आणि माणोस म्हणून जगण्याला घरघर लागते.
अशी चिकित्सा मलातरी येथे अजिबात अस्थानी वाटत नाही! देवाणघेवाण होते, शिवाय आपले विचार आपल्यालाच पुन्हा स्पष्ट होतात. छोट्या बहरच्या गझलेबाबत तर अशी चर्चा झालीच पाहिजे कारण अशा गझलेत कल्पना स्पष्ट न होण्याचा मोठा धोका असतो.
पुलस्तीजी आधी मक्त्याच्या मात्रांत गडबड वाटत होती. आता व्यवस्थित आहे.
धन्यवाद!
पुलस्ती
छान आहे गझल,
नीळकंठ व्हा पुन्हा शंकरा .... मलाही हाच (पर्यावरणाचा) अर्थ डोळ्या समोर आला होता.
पण शरपंजर मात्र निट कळला नव्हता.
सुधीर
माझी प्रतिक्रीया गायब झाली आहे!!!!
असो....