न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. स्मित

Submit to kanokani.com

अजून 'का?' आहेच का मनात?

कशाला , नको का भाई?

आम्ही चाल्लोय परत. आमच्यासाठी पण केलत तर चालेल फिदीफिदी

अरे किती वेळा 'चाल्लोय' चाल्लंय.. स्मित

आता शेवटच बर्का देसाई. स्मित

कशाला , नको का भाई?>> करुया की. एक कारण हवं ना. म्हणुन म्हंटल. स्मित
पिने वालेको पिनेका बहाना चाहीये. स्मित
अमृते, नक्की का?. स्मित

फिदीफिदी

हात्तिच्या! सोप्पी उत्तरं आहेत की!

का : बारा जीटीजीला कारणं लागत नाहीत. टण्या इथे येणार आहे हे कारण नसून निमित्त आहे. फिदीफिदी
कधी : २५ सप्टेंबर - लंच की डिनर हे सर्वांच्या सोयीने ठरवा
कुठे : शोनूच्या घरी. मी 'आयडीच्या जिवावर बायडी उदार' होत नाहीये! गैरसमज नसावा. शोनूने सर्व जीटीजीकरांना दिलेलं हार्दिक निमंत्रण मी सर्वांपर्यंत पोचवायचं काम करते आहे फक्त. स्मित

मग सांगा आता कोण कोण येणार? मी सुरुवात करते.

स्वाती_आंबोळे (१)

टण्या (१) - विसू: मी कुठलाही पदार्थ बनवून आणणार नाही स्मित

हो हो, शोनूच्या घरी , २५ सप्टेंबर.
दुरुन येणार्‍यांना शुक्रवारी रात्री /शनिवारी रात्री रहायचे आमंत्रण अध्याहृत !
एकदम घाईत आहे आता, पण मेनूच्या सूचना, फर्माइशी इथेच लिहा . पार्ल्यात नको - वाहून जातील मी पाह्यच्या आधी.

मी कुठलाही पदार्थ बनवून आणणार नाही >>> मी पण (तेच सगळ्यांच्या हिताचं आहे शिवाय पुस्तक शेल्फावर आहे) फिदीफिदी

सिंडरेला (१)

नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे : आरंभशूर मृण्मयी (१) फिदीफिदी

शोनू, आलेच तर आधल्या दिवशीपासून डेरा टाकणार.

अगदी शेवटच्या वेळी असल्याने मी आत्ताच नाही सांगु शकत. गाडी विकायच्या मागे असु तेव्हा किंवा विकली पण असेल.
असाम्या येतोय का? तो येणार असेल तर त्याच्या गाडीत बसुन येइन फिदीफिदी

गाडी असली तरी तुम्ही त्याच्या गाडीतुनच येणार तेव्हा हो म्हणून टाक फिदीफिदी

अश कै नैये कै... नवर्‍याने केलं म्हणजे मीही करेन अस वाटलच कसं तुला? फिदीफिदी

असाम्या फक्त सात वर्षातुन एकदाच येतो ए.वे.ए.ठि. ला. तेव्हा दुसरा कोण डिरायवर बघा. स्मित

दुसरा डिरायवर सिंडीच.. सिंडी माझी बाय ती. मागे पन्नाला उचललेलस तसं मलाही उचल ग. फिदीफिदी

तुम्ही टेक्सास ला का करत नाही आहे गटग यावेळी? आँ? टण्या आमच्यापासुन १ ते दिड तासावर येत आहे. आणि लालू पण म्हटलेली कि ती टेक्सासला येणार आहे म्हणुन . आणि टेक्सास मध्यावर आहे सगळ्याना. आणि मृ ला पण जवळ आहे. झालच तर मी पण सगळ्याना आमंत्रण देत आहे. माझ्या वतिने वाटल्यास स्वाती ला आमंत्रण द्यायला भाग पाडते.आणि काय कारण हवी असतील तर ती पण लिहिते. राग

झालच तर नविन जागा,ठिकाण एक्स्प्लोअर केली पाहिजेत हे ही कारण अ‍ॅड करा. सारख आपल न्यु जर्सी. फिदीफिदी दिवा घ्या

टेक्सास मध्यावर आहे सगळ्याना >> मग शिकागोने काय घोडं मारलंय? शिकागोच मस्त! लेट्स गो बुल्स..

मी हवी ती सोय (मैत्रिनी सोडून) करायला तयार आहे. स्मित

( टण्या, फचिन काळजी नका करु, आपण नंतर सरस्वतीच्या शोधासारखे "मैत्रिनींच्या शोधात" असे अभियान हाती घेऊ. )

सीमा, केदार, आता हा तर व्हेन्यू ठरला. तुम्ही पुढच्या वेळी लावा नंबर. फिदीफिदी
या वेळी (आपापल्या मैत्रिणी घेऊन) इकडेच या. स्मित

केदार.. शिकागोला ठरलेच आहे ना? बॄमम २०११ ला येतोच आहे.. स्मित

सीमा, तू अन टण्या बाय वन गेट वन फ्री डील शोधा मग तिकिटांचं स्मित

अगोला पण आणा स्मित

येथे येन्यासाठी काय करावे लागत ?
कोनीही मायबोलीकर येथे येवु शकतो का?

अवधुत
काहीही करावे लागत नाही. गाडी काढायची आणि फिलीला यायचे. बस्स एवढच.
सगळ्या ओळखीच्या किंवा अनोळखी मायबोलीकरांनी जरूर यावे. गटगला जाम धमाल असते.

अवधूत, फिलीला आल्यावर मात्र तुमच्या आधी मायबोलीकर झालेल्या सर्वांना कडक सलाम ठोकावा लागतो. फिदीफिदी

फिलीपर्यंत ड्राइव्ह, काय हुकलीस का ग मामी ? मी आलो तर बस ट्रेन विमान असे काहितरी बघेन,

अबाबाबा! नुसती ए वे ए ठि चा विचार झाला तर लगेच बाफं, पोस्टी सुरु??!!! वा वा!!! स्मित
वैद्यबुवा (१)

ह्यावेळी पण एका गाडीनी जायचं आहे का, जर्सीहून? फिली अगदी जवळ नसलं तरी १-२ तास तरी लागतीचलच.

गाडी करून जायची आयडिया बरी आहे! मी येणार.

फिलीला आल्यावर मात्र तुमच्या आधी मायबोलीकर झालेल्या सर्वांना कडक सलाम ठोकावा लागतो >>>
स्वाती बहुदा तुलाच त्यांना सलाम ठोकावा लागणार, त्यांना मायबोलीवर येवून ८ वर्ष होऊन गेलीत. स्मित