न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे.
वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.


१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
-----
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही

२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

Submit to kanokani.com

लोकहो, माझं नाव त्यामगच्या प्रश्णचिन्हासगट काढून टाका. अरेरे इतक्या वर्षात पहीलून मला $१६० मधे नॉन्स्टॉप ओरलँडो टु कनेक्टिकट राउंडट्रिप तिकिट मिळत होतं. पण निषादची कॉन्सर्ट आहे त्या वीकएंडला, आणि नवरा इथे नसणार. त्यामुळे येऊ शकणार नाही. अरेरे
ह्यानंतरचं ए. वे. ए. ठी. जर उन्हाळ्यात करणार असाल तर मी खरच आत्तापासून तिकिट काढून ठेवायला तयार आहे.

मैत्रेयी, खात्री करुन घ्यायला विचारते आहे- क्लब हाउस मधे ओव्हन आहे ना?
मी रगडा आणू का?
प्राजक्ता

मी भेळ आणु ?

प्राज, तिथे मायक्रोवेव्ह आहे. ओवन चे लक्षात नाही आता. बहुधा नहिये.
पण पार्टी ट्रे अन टीलाइट वापरू शकतो गरम करायला.

मित्रहो, मीसुद्धा शाकाहारी आहे.....

मला वरील पदार्थांपैकी काहीही करता येत नाही, आणि मला करून देईल अशीही कोणी नाहीये अजून...
त्यामुळे मी ज्युस किंवा तत्सम (रेडिमेड) गोष्टी आणू शकेन... आणि सगळं झाल्यानंतर धुणी-भांडी करू शकेन... स्मित

आज पहिल्यांदा असं झालं असेल की गेल्या १६ पोस्टींमधल्या ८ पोस्ट्स नयनीश वैद्य यांच्या नाहीयेत.. फिदीफिदी

आज पहिल्यांदा असं झालं असेल की गेल्या १६ पोस्टींमधल्या ८ पोस्ट्स नयनीश वैद्य यांच्या नाहीयेत<<

पहिल्यांदा कसं? अरेरे पूर्वी ते नव्हते इथे तेव्हा झालं होतं एकदा....

विनय हाहा

चटपटीत मेन्यु चालेल, पळेल, पोटात येईल.. काय म्हणाल ते !!!
---------

ज्युस किंवा तत्सम (रेडिमेड) गोष्टी आणू शकेन
सांटिनो, तुम्ही काय आणणार ते ठरले की कृपया माझ्याशी संपर्क साधा.
धन्यवाद.

वर मी लिहिलेच आहे, परत कॉपी करतेय
ज्यांना काही आणणे शक्य नाही त्यांनी सोडा, ज्यूस, पार्टी सप्लाईज (पेपर प्लेट्स, ग्लासेस, चमचे, बाउल्स, ४ पार्टी टेबल क्लॉथ्स,)यातले आयटेम्स निवडले तरी चालतील स्मित
यात अजून काही रेडीमेड गोष्टी, जसे चिप्स + साल्सा, स्वीट, इतर देशी अपेटायझर्स असे पण चालेल.

हे लेखन वाहून जाउ नये म्हणून या ग्रुपमध्ये एक नवीन लेखनाचा धागा चालू करु शकता.

नविन धागा.
http://www.maayboli.com/node/5234
पुढील लेखन येथे करा
- अनिलभाई

चिप्स + साल्सा >>> नको अरेरे त्यापेक्षा केळ्याचे चिप्स, कुरकुरे वगैरे आणु.

हे पान काढुन टाकले तरी चालेल. हे पान तयार केले तेव्हा गप्पांच्या पानाची सुविधा नव्हती.

- अनिलभाई

नविन धागा.
http://www.maayboli.com/node/5234
पुढील लेखन येथे करा
- अनिलभाई

हे असं का झालं.. म्हणजे पानांची बदलाबदल?

विनय

इथल लेखन वाहुन जात ना म्हणुन.
नविन धागा.
http://www.maayboli.com/node/5234
पुढील लेखन येथे करा

- अनिलभाई

.... हा हा हा ! पहा: कल्ट्स आणि ब्रेनवाशिंग!!

मराठीत मजकूर लिहिण्यासाठी मी इथे येतो. जीमेलवर तशी सोय आहे, पण मला इथली सवय आहे, इथे कंटाळा यायच्या आत मजकूर लिहून संपतो.

धन्यवाद.

काय लिहिताय?. कादंबरी तर नाही ना?. स्मित