स्पर्धा !!!

आत्ताच इथे मायबोली वर कोठे तरी खालील संदेश वाचला :

कथा लिहिणार्‍यांनी हे पहा अन आपला सहभाग नोंदवा.
http://72.78.249.107/Sakal/20Aug2010/Normal/PuneCity/page11.htm

त्या वरुन एक सुचले ....

इथे मायबोली वर अशा स्पर्धा होतात का साहित्यलेखनाच्या ?

नसतील तर आपण सुरु करुयात का ??

शिवाय त्याने येथील साहित्याचा दर्जा वाढेल असे वाटते (अन काव्यात्कारी अन काव्यातिसारी कविंनाही कदाचित खीळ बसेल हसून हसून गडबडा लोळण )

काय बोलया ?? what say you ???

Submit to kanokani.com

.

हरकत नाही............सुचना चांगली आहे. पण असे काही वार्षिक पुरस्कार मुळात माबोवर आहेत असे ऐकलय्...शहानिशा करायला हवी.......... !

इथे पूर्वी कवितास्पर्धा एकदा तरी झालेली आहे. नंतर दर महिन्याला मॉडस चॉइस असायचाच. परत नंतर या महिन्याची उत्तम कविता असा उपक्रम होता.
होतं काय की सगळ्यांनाच पसंत पडेल असा रिझल्ट काढणं कोणालाच शक्य नसतं. तसंच १०० % तटस्थ रहाणं सगळ्याच परिक्षकांना (इथलेच असतील तर!) शक्य असतंच असं नाही आणि मग त्यावरून वादंग माजून उपक्रमाची वाट लागते.
तुम्हाला असा काही उपक्रम राबवायचा असेल तर अ‍ॅडमिनशी बोलून तुम्ही जरूर पुढाकार घ्या. अनेक जण भाग घेतील, मदतीला येतील.

असो.
या वर्षी सा स ने स्पर्धेची मुदत वाढवलेली दिसतेय. कुणाकडे जुलै चा सार्‍याजणी असेल तर त्यातल्या कथास्पर्धेची जाहिरात पण इथे टाका प्लीज.