पनीर कॅप्सिकम

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पनीर- बोटासारखे लांब तुकडे करुन, भोपळी मिरची- बोटासारखे लांब तुकडे करुन, टोमॅटो- बारीक चिरुन साधारण पाव वाटी, आलं-लसूण पेस्ट- एक ते दिड टीस्पून, धणे- एक ते दिड टे. स्पून, लाल मिरच्या-अंदाजे, कसूरी मेथी- १ टे. स्पून, मीठ-चवीप्रमाणे, कोथिंबीर.
पनीर आणि भोपळी मिरची समप्रमाणात असावी.

क्रमवार पाककृती: 

तेलावर उभी चिरलेली भोपळी मिरची परतून झाकण घालून शिजवावी. जरा मऊ वाटली की आलं-लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून पुन्हा एक वाफ काढावी. धणे-लाल सुक्या मिरच्या आणि कसूरी मेथी मिक्सरला वाटून पावडर किंवा पाणी घालून पेस्ट करावी. ती ही भाजीत घालावी. सगळ्यात शेवटी पनीरचे तुकडे आणि मीठ घालून शिजवावं. भाजीला खूप रस रहाता कामा नये. वरुन कोथिंबीर घालावी.

वाढणी/प्रमाण: 
माणसांप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावं.
अधिक टिपा: 

हव्या असल्यास लाल, केशरी, पिवळी भो.मिरची वापरायलाही हरकत नाही.
पुन्हा करेन तेव्हा आठवणीने फोटो काढून टाकेन. दुसर्‍या कुणी टाकल्यास माझा इगो हर्ट होणार नाही फिदीफिदी

माहितीचा स्रोत: 
आठवत नाही.
Submit to kanokani.com

यम्मी स्मित

मी टॉमॅटो पेस्ट्/प्युरी घालते आणि लाल मिरच्यांच्या ऐवजी थोडा गरम मसाला/पावभाजी मसाला... स्मित

छाने पाकृ. करुन बघेन.

मस्त आहे, आणि झटपट. लेकाला इन्डियन बरीटो म्हणून पोळीत गुंडाळून देता येईल.

सायो का गं पनीरच्या रेसिप्या टाकतेस? राग बरं कधीतरी तोफू घालून करून बघेन. डोळा मारा

आडो, घरी कर की पनीर. अ ओ, आता काय करायचं

त्याची रेसिपी टाक माझ्या विपुत. टांगायला वै लागतं कां? मग नाही जमणार.

टाकते.

टांगण्याऐवजी दाबु पण शकतेस. फिदीफिदी
नाहितर देसाईंना विचार, त्यांच्याकडे एक भयानक रेसिपी आहे पनिर करायची फिदीफिदी

अमृता आधी साधंच पनीर करून बघते. ते जमलं की दाबून बघेन.

फोटो टाकत जावा गो बाय्कांनो. आम्हाला कसं कळणार कसं दिसतं ते?? अरेरे
पन एकंदर झ्याक असावं.

आडो, तुच टाक बघ फोटो शहाण्या आडोसारखी.. (तोफु टाकुन... )

सायो, झकास पाकृ! नेहमीचे मसाले नाहीत. त्यामुळे जास्तच आवडली. करून बघेन.

(पनीर नसलं तर चिकनचे तुकडे/बटाटे चालतात का? फिदीफिदी)

चिकन चालावं बहुतेक. स्वतःच्या जबाबदारीवर करुन पहा डोळा मारा
पनीर ऐवजी बटाटे? घाल. पण त्याला भो मि, बटाटा भाजी म्हण. स्मित

पनीर ऐवजी बटाटे?>>> मी घालते ग बरेचदा. उभ्या फ्राईज साठी करतो तश्या काचर्‍या करून घालते.
यम्मी लागते. स्मित
स्वाती, माझ्या लेकाला ब्रेड मध्ये घालुन देते मी ही भाजी. त्याला भारी आवडतो हा प्रकार.
सायो पुन्हा एकदा धन्यवाद. आमच्याकडे सगळ्यांची लई आवडती भाजी.

मी बरेचदा केलीय सायोची हिच क्रुती वापरुन,एकदम यम्मी आणि सोपी पण.
आडो,मी तोफू वापरुनपण केलीय.मस्त होते.

मस्त.
सायोची पनीरमाखनी हिट्ट आहे आमच्याकडे. आता ही करून बघेन.

माझ्याकडे पनीर बनवायचा डबा आहे. पुर्वी कोथंबीरीचे डबे मिळायचे जाळीचे तसा डबा आणि त्याचे लूझ झाकण आहे. दूध फाडल्यावर डब्यात ओतून, झाकणावर वजन ठेवायचे. सकाळपर्यंत पनीर तयार. स्मित

यम्मी वाटतय. करुन बघते ग. फोटो टाक ना. स्मित