उदंड देशाटन करावे ... लडाख

चंदन यांच्या 'अतुल्य भारत' मधील लेह-लडाख वाचत असताना लेह मधल्या ढगफुटीची बातमी आली आणि गेल्यावर्षी आम्ही काही जणांनी बाईकवरून जम्मू - श्रीनगर - द्रास - कारगिल - लेह आणि मग - सरचू - मनाली मार्गे दिल्ली असा १३ दिवसांचा प्रवास केला होता ते सर्व क्षण डोळ्यासमोरून तरळून गेले. आम्हाला वाटेमध्ये मदत करणारे ते लोक, लष्कराचे जवान, आम्ही लेहमध्ये जिथे राहिलो ते 'नबी'चे घर, त्याचे कुटुंब, आमचा ड्रायव्हर तेनसिंग हे सर्व सुखरूप असतील अशी मनाला खात्री आहे. लडाखवरील आलेली आपत्ती दूर होवो आणि तिकडे गेलेले सर्वजण सुखरूप असोत हीच प्रार्थना... मृत्युमुखी पडलेल्या सदैव मदतीस तत्पर आणि मनमिळावू अश्या तिथल्या स्थानिक लोकांना मनापासून श्रद्धांजली. का कोण जाणे माझे मन पुन्हा एकदा लवकरच लडाखकडे जावे असे म्हणते आहे. त्या १३ दिवसांचा सफरनामा येथे मांडतोय. अपेक्षा आहे आपल्याला आवडेल.

Submit to kanokani.com

मायबोलीकरांचे आभार... अवघ्या ३-४ दिवसात केलेल्या ह्या लिखाणाला तुम्ही सर्वांनी चांगला प्रतिसाद दिलात... अपेक्षा आहे की पुढे सुद्धा असेच देत राहाल...

प्रवासवर्णन वाचले...एका फट्क्यात वाचुन काढले....अतिशय सुन्दर वर्णन अन लेखन देखिल्....माझि देखिल ईछा आहे लडाखला जान्याचि बाइक वरुन बघु कधि मुहुर्त येतोय ते....बाकि मे तुझे ट्रेकवर्णन पण वाचलेय छान अहे ते पण्....तुझ्या ह्या लेख मालिकेचा नक्किच उपयोग होइल कधितरि....ह्यासाठि लागनार्‍या तयारीवर पण पोस्ट कर न काहितरि...ह्या वाचनिय अनुभवाबद्दल धन्यवाद.....

एक प्रश्न आहे...एवढ सगळ तु एव्हढ्या कमी वेळात ते ही काहि चुक न करता कसे लिहिलेस्....आय मीन मराठीत.....it took me 5-7 min to write this sentense....krupaya evdhya fast kase kay lihile link tutu na deta he sangave....

तू मराठी लिहायला काय वापरतोस??? मी ऑफलाईन असेन तर बराहा नाहीतर ओन्लाईन थेट जीमेल वापरतो... कधी कधी quillpad .com

धन्यवाद मित्रा

तसा जी मेल हेक्टीक वाटते,कधीतरी ब्लॉगर वर असेन तर मला तिथे नाही जमत