कॅनडा

कॅनडातले मायबोलीकर

Submit to kanokani.com

हाय रिमझिम
अगं , मी मायग्रेशन घेतल २००६ मधेच , पण मागची २-३ वर्षे तिकडे काळे -पिवळे सोने मिळवत होतो स्मित बायको अन मुलगा इथेच होते . आता मी पण या कडकीच्या जमान्यात इकडे आलो स्मित , शोधतोय काहीतरी उध्योग पोटापाण्यासाठी .
कशी आहेस ? अरे हा अभिनंदन बर का स्मित

अथक
धन्यवाद रे!
बर्‍याच दिवसांनि( कि वर्षांनि?) दिसलास.बरे वाटले.
मग आता सहकुटुंब कॅनडात आहेस का?

हाय अथक,

स्वागत आहे .. ( पुन्हा एकदा )

हाय रिमझिम
बरेच वर्षांनी स्मित
हो सहकुटुंब इकडे , खरं म्हणजे कुटुंब इकडेच होते , मीच तिकडे भटकत होतो स्मित
तुझे कसे काय सुरु आहे ?
-----------
अरे वा एकारसिकाची इकडे चक्कर .. पावन झाली म्हणायची कॅनडाभुमी स्मित

Software Engineering Manager (Java) position is open in our office. Pl contact me.

Details as follows

Essential Functions:

Work with product management, customers, business team and other technical associates to create specifications for complex software applications, modules or systems.
Support/modify/maintain existing applications based on multiple programming languages and platforms.
Develop functional and attribute specifications for software applications or modules.
Use project management tools to develop project milestones and completion dates.
Evaluate, analyze and make recommendations for products, design, resource allocation and cost to improve the competitive position of the company.
Direct and monitor the work and productivity of all team members.

Knowledge Skills and Abilities:

Advanced knowledge of Java and JEE programming and architecture.
Strong knowledge of software development methodologies including automated tested and automated software inspection.
Background in image processing, multimedia or biometrics a plus.
Fluency in verbal and written English.
Strong people, team and project management skills.
Qualifications and Experience:
BS degree in Computer Science or related field.
Minimum 8 years software development experience.
Minimum 3 years experience in development management

ghoshana.jpg

नमस्कार मंडळी!!

वाजत गाजत गणरायाचं आगमन झालं. आपल्या मायबोलीवरदेखील गणेशोत्सव दणक्यात साजरा होतो आहे. आणि बघता बघता बाप्पांना निरोप द्यायची वेळ येणार. निव्वळ विचारानंदेखील मन थोडं खट्टु होतं खरं! पण बाप्पांना 'पुढच्या वर्षी लवकर या' सांगून बोळवलं की निवांत बसायला वेळ आहेच कुठे? कारण दिवाळी अंकासाठी लिखाण करायचंय!

एव्हाना सगळ्या मायबोलीकरांनी दिवाळी अंकाची घोषणा वाचली असेलच. पण कामाच्या गडबडीत दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचा विसर पडू देऊ नका! महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त अंकात एक खास, वेगळा विभाग असणार आहे. तेव्हा त्या अनुषंगानं साहित्य पाठवण्याचं लक्षात असू द्या. तुमच्या कथा, ललित लेख, विनोदी लेख, कविता, गझलांशिवाय अंकाला शोभा नाही! तेव्हा लवकरात लवकर लिहिण्याचं मनावर घ्या.

साहित्य पाठवण्यासाठी इथे जावं लागेल. एकाच बैठकीत लेखन पूर्ण झालं नाही तरी हरकत नाही. फक्त लेखन स्थिती 'अपूर्ण' ठेवून save वर टिचकी मारा. तुमचं अपूर्ण लेखन इतरांना दिसणार नाही. वेळ मिळाला की, त्या दुव्यावरच्या स्वतःच्या 'सदस्यत्वा'तून 'पाऊलखुणां'त जाऊन अपूर्ण लिखाण पूर्ण करता येईल. लिहून, तपासून झाल्यावर 'सुपूर्त करण्यायोग्य'वर टिचकी दिलीत की फक्त संपादक मंडळाला ती साहित्यकृती दिसू लागेल.

तुमचं साहित्य ५ सप्टेंबर, २००९च्या आत संपादक मंडळाकडे सुपूर्त व्हायला हवं. लागणार ना लिखाणाला?

दिवाळी अंकात साहित्य पाठवण्यासाठी काही मदत लागली तर नि:संकोच sampadak@maayboli.com या पत्त्यावर ईमेल पाठवून किंवा 'विचारपुशी'त जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.

आपले,

संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २००९

नमस्कार, मी सुरुचि.
ओटावा मधले कोणी इथे आहे का?
मला नोव्हेंबर च्या शेवटच्या आठवड्यामधे ओटावा ला यायचे आहे १ वर्षा साठी.
तिथे १ BHK घराचे भाडे साधारण काय असते? कोणी सांगु शकेल का?
- सुरुचि

खुषखबर! खुषखबर!! खुषखबर!!!

माँ पहने, बाप पहने और अब बच्चा भी पहनें....
खास लोकाग्रहास्तव आता मायबो'लेकरांसाठी सुद्धा आम्ही टीशर्टस् घेऊन येत आहोत...
लक्ष ठेवा www.maayboli.com/node/16873 ह्या बाफवर..

मंडळी, कृपया इकडेही लक्ष असुद्या -

दरवर्षी प्रत्येक टि-शर्ट आणि कॅपच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या एखाद्या संस्थेला देतो. यंदा टीशर्ट विक्रीतून उभी राहणारी रक्कम काश्मीरातल्या अनाथ मुलींसाठी काम करणार्या श्री. अधिक कदम व त्यांच्या ’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे.
या संस्थेची माहिती http://www.bwfindia.org.in/index.php इथे उपलब्ध आहे.

अजून जर का टी शर्ट नोंदणी बाकी असेल तर त्वरा करा.

http://www.maayboli.com/node/26769?page=3#new

टी शर्ट समिती

LastDay.jpg

बॉस्टनच्या गटगचे आमंत्रण करायला आलोय !

http://www.maayboli.com/node/27199

मॉन्ट्रीयलपासून फार लांब नाही. टोरांटोपासूनही सहज जमू शकेल.

जरूर या !

२ वर्षापूर्वीचे मेसेज आहेत इथे अजून. अरेरे

टोरोंटोला कोणि मायबोलिकर आहेत का? नवर्‍याचि कंपनि त्याला एक वर्षासाठि टोरोंटोला पाठवत आहे. त्यामुळे थोडि माहिति हवी होति.

प्रिया७, काय माहिती हवी आहे?

हेलो, हेलो...

हाय झिंगर
तुम्ही कुठे असता कॅनडात?

northwest

तुम्ही इकडे कुठे?

मी नाही...माझा भाऊ.. कॅलगरी.

तुम्ही रोज येता का मायबोलीवर?

रोज नाही. कधीतरी वाचन. इथे तर कोणी येतही नाही.

इथे तर कोणी येतही नाही.
---- सर्व थंडीने गारठली असतांत... स्मित

उलट थंडीतच तर एकत्र जमून (तोंडाची) वाफ दडवायला हवी. स्मित

इथे अनेक ठिकाणी गप्पाष्ट्के सुरू असतात. आपण इथे सुरू करायचे का?

नमस्कार मायबोलीकरांनो!