नुकतीच वाचनात आलेली गंगाधर महांबरे यांची एक मालवणी कविता
ऐनाच्या बैना शबय शबय शबय शबय | मालवणाच्या बंदरात म्हावरा लय |
घेऊ किती नावा सुळे, मुडदुशी | कोळंबी, शेवटे, पालु, तांबुशी |
पेडवे, सौंदाळे, पापलेटा, गुंजली | रावस, बांगडे, मोरी नि कर्ली |
मांदेली, सरंगे, कुलमौ एकठथ.. |
पाण्यातलो रूचकर माशांचो खजिनो |
भरुन घे डोलकरा तुझो छबिनो |
खोल पाण्याचा मेल्या खय तुका भय?..|
हलवाच्या ऐवजी हलवो | नाव घेवन येक येक |
मेल्यान आवंढो गिळलो | सुक्या हुमण तिखला अख्खो |
बाजार तळलो | चाटून पुसून खावची सवय |
खूप काही कळली नाही पण छान वाटतात मराठी लहेजा असलेल्या कविता.
ती कॉमा देऊन आलीली नामे, माशांची नावे आहेत का?
|नीलुताइ,
मी सध्या हिमाचल मधे आहे. वरील नाव वाचुन माशांची फारच आठ्वण येते आहे.