कांथा वर्क

एखादा प्लेन शर्ट मिळाला की तसाच घालणे मला अगदी नकोसे वाटते. त्यामुळे मग बरीकसे काहीतरी काम त्यावर केले जातेच - त्यातला एक नमुना -

IMG_0588.jpg

कामाचा क्लोजप -

IMG_0586.jpg

या शर्टला रॅगलान प्रकारच्या बाह्या आहेत आणी केले काम गळ्याजवळ केले असुन घातल्यावर खांद्यावर येते.


मिनोती, छान आली आहे डीजाईन.



वा मस्तच आहे.



काय सुबक आलं आहे.. मस्त!
हे असं काहीतरी पाहून माझेही हात शिवशिवतात! स्मित 'कर्नाटकी कशीदा' आणि 'कच्छी टाका' शिकलेय, पण आता विसरायला झालेय.. प्रॅक्टीस घेणार का? स्मित ब्लॉगवर लिहिलेस तरी चालेल..



design mast aahe स्मित



सुंदर दिसत आहे प्रत्यक्शात याहुन सुंदर दिसत असनार.
मीही शाळेत असताना बरेचसे टाके शिकले होते
पण सराव नसल्याने विसरले आहे.
तुम्हाला शक्य असल्यास टाक्याबद्दल माहिति मिळेल का?
म्हणजे कसा टाका कसा घालायचा वगैरे?