सुस्ती..

घड्याळात बाराचे ठोके
दिवे अजून न विझलेले
निजल्या तरुच्या फांदीला
वटवाघूळ उलटे लटकलेले

हे शहर दाटीवाटीने भरलेले
चोवीस तास व्यस्त-व्यापलेले
सर्द दुलईतील झोप सोडून
कागदांच्या बोजानी वाकलेले

येईल हळूच जरा वेळानी
लगबगीची ती प्रभात रोजची
अन सुरू होईल वर्दळ पुन्हा
चेहर्‍याचेहर्‍यावर दिसेल सुस्ती!

- बी


बी, एकदम साधी आहे कविता. पण "कागदांच्या बोजानी वाकलेले" याच्यात कागदांचा relevance कळला नाही.



कागदाच्या बोजानी... म्हणजे पैश्याच्या असे म्हणायचे आहे का?



बी, छोटेखानी साधी साधी कविता आवडली स्मित



कागदाच्या बोजा = कार्यालयीन कामं अस मला म्हणायचं आहे.