अ‍ॅलर्जी बद्दल माहिती हवी आहे

Submitted by sneha1 on 3 August, 2010 - 17:01

नेहमीसारखीच आज पण मायबोलीकरांची मदत हवी आहे.मला न्यू ऑर्लीन्समधे येऊन एक वर्ष होऊन गेलं. आल्यापासून अ‍ॅलर्जीचा त्रास होतो आहे.म्हणजे नाक बंद होतं, कधी नाकातून पाणी येते.घसा खवखवतो.डोकं दुखतं. कधी शिन्का येतात्.ताप आहे असे वाटते, पण थर्मामीटरमधे येत नाही. ह्या सगळ्याचा अगदी अंथरूणावर पडून राहण्याएव्हढा त्रास नाही, पण थकवा येतो.डॉक्टर कडे जाणे वगैरे झाले आहे.त्याच्यामुळे रोज क्लॅरिटीन घ्यावी लागते, आणि नॅसोनेक्स स्प्रे पण. नाहीतर आलर्जी शॉट.
पण मला आता औषधांचा कंटाळा आला आहे.कोणाला काही दुसरे उपाय माहित आहेत का?
कोणीतरी सांगितले तसे वॉलग्रीन मधून नेती पॉट आणला.एक दोन वेळा थोडं बरं वाटलं, पण नन्तर केल्यावर अक्षरशः मेंदूला झिणझिण्या आल्या..
काही अजून उपाय सांगू शकेल कोणी?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेती केल्याने बरे वाटते. मेंदुला झिणझिण्या आल्या तरी सर्दी कमी झाली का?
मल गेले २ वर्षे किंचीत त्रास होतो पण यावर्षी अती वाटले आणि मला क्लॅरिटीन वगैरेची सवय लावून घ्यायची नव्हती म्हणून मग मी दोन गोष्टी करते -
१. नाक चोंदतेय, सर्दी होतेय असे वाटले तर मी नेती करते दिवसातून २ वेळा
२. १/२ टीस्पून वाईल्ड फ्लॉवर हनी सकाळी गरम पाण्यात घालून रिकाम्या पोटी घेते.

sneha1,
फारच जास्त आणि अगदि खुप दिवस त्रास होत असेल तर अ‍ॅलर्जी टेस्ट करुन घेता येते. त्यात नक्की कसलि अ‍ॅलर्जि आहे ते कळते.
त्या आधि तु तुझ्या खाण्यातले बदल तपासुन पहा. काय नविन आहे, काय खाल्ल कि त्रास होतो ते जरा निरिक्षण कर.
खाण्याची नसेल तरि इतर काहि गोष्टींची अ‍ॅलर्जी असु शकते, सिझनल अ‍ॅलर्जी असु शकते.

१/२ टीस्पून वाईल्ड फ्लॉवर हनी सकाळी गरम पाण्यात घालून रिकाम्या पोटी घेते<<<
ह्या करता लोकली प्रोड्युस्ड हनी वापरावा असं ऐकिवात आहे.

गरम पाण्यात मध? Uhoh मिनोती, तुला कोमट म्हणायचेय का?
मध गरम पाण्यात कधीच घालायचा नसतो अस वाचलेलं मी कुठेतरी. अधिक माहिती ज्ञाती किंवा आणखी कोणी जाणकार देऊ शकतील.

नेतीचा फायदा होतो असे ऐकले आहे मात्र ती काळजीपूर्वक करावी लागते. झिणझिण्या आल्या म्हणजे घशात पाणी गेले का? म्हणजे पोहायला गेल्यावर होते तसे? नेती करताना अँगल चुकला की होते असे कधीतरी पण तो उपाय सोडू नकोस.

सावली, हो.
नेहमीच आहे का अ‍ॅलर्जी? सीझनल पोलनची असेल तर तेवढ्यापुरत्या गोळ्या, नेती इ. उपाय किंवा मग वर्ष दीड वर्षं ऑलमोस्ट रोज शॉट्स घेणे. शॉट्स चा कोर्स केला की त्रास बराच कमी होतो. प्राडी म्हणते आहे तसं लोकल हनी घेतात कारण त्यात तिथला पोलन असतो, याचा उपयोग शॉट्स सारखाच होतो. थोड्या प्रमाणात सतत ते अ‍ॅलर्जेन शरीरात गेले की सेन्सिटिव्हिटी कमी होते.

हो, नेहमीचीच आहे अ‍ॅलर्जी. आणि काही खाण्याची अशी नाही, इथली हवाच तशी आहे असे डॉ. चे म्हणणे.आणि मागच्या वेळी शॉट्स चा चांगला उपयोग झाला.पण आता बाकीचे उपाय करून बघीन, मगच वाटलं तर शॉट.
नेती केल्यावर नाकाची आग झाली, आणि झिणझिण्या आल्या, पण घशात पाणी गेले नाही.पण पहिल्यांदा एकदोनदा त्रास झाला नाही हे पण खरे.आणि नाकही मोकळे वाटले.
वरचे वाचून आता पुन्हा नीट नेती करून बघीन, आणि मध ही घेइन. हा व्होल फूड्स मधे मिळेल का?

सगळ्यांना धन्यवाद Happy

लोकल हनी लोकल फार्मर्स मार्केटमध्ये मिळेल.
शॉट्स घेतले होते का? किती काळ? ते नेहमी नाही घ्यावे लागत. मग अजून दुसर्‍या कुठल्या अ‍ॅलर्जेनची अ‍ॅलर्जी असेल तर त्याचेही शॉट्स घ्यावे लागतील. Happy

माझ्या मुलीला अटोपिक / अलर्जीक डर्मटायटीस (अजून नक्की निदान व्हायचय) त्रास गेली २ वर्षे स्प्रिन्ग आणि फॉल मधे होतोय (चेहेर्यावर , पापण्यावर लाल रॅश ,खाज ) .तिला तिच्या डर्मा. नी अ‍ॅलर्जी टेस्टींग करायला सान्गितले आहे तिची ह्या शुक्र. अपॉ. आहे. ही टेस्ट कशी करतात? इंजेक्ट करून का ब्लड टेस्ट , का काही त्वचेला चोळून?? तिला ८ दिवस आधी पासून तिची अ‍ॅलर्जीची औषध बंद करायला सान्गितली आहेत.आण्खी एक की ह्या टेस्टीन्ग नन्तर ताप येणे, खाज येणे , रॅश असे त्रास पुढील दिवशी होतात का?
बर मी अस ऐकल होत की आपल्याला न वाटणार्या आणि नेहमीच आहारात असलेल्या पदार्थान्ची ही अ‍ॅलर्जी टेस्ट + येते ..(उदा. ती रोज दुध पिते /सिरीअल खाते पण तिला नेहमीच त्यामुळे रॅश नसतो किवा खाज येत नाही.) हे खरय का?

माझ्या डॉ. च्या मते अ‍ॅलर्जी डी व्हिटॅइमन कमी असल्यामुळे होते.मलाहि ३ वरशापासून त्रास होत होता पण आता कारण कळाल्.त्यामुळे सकाळच कोवळ उन अंगावर घ्याव्.करुन पहा .