समान्/साधारण समान द्विपदी...... किंवा '' खयाल टकराना ''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 1 August, 2010 - 00:59

बर्‍याचदा आपण एखादी द्विपदी वाचल्यावर याच आशयाची दुसरी द्विपदी आपण ऐकल्याचे/वाचल्याचे स्मरते.दोन समकालीन्/भिन्नकालीन कवींची/गझलकारांची मते/विचार समान्/साधारण समान द्विपदींद्वारे व्यक्त होण्याचे प्रकार बर्‍याचदा वाचायला मिळतात....यात नक्कल असते असे नव्हे...... किंवा काही वेळा असेलही...... आपण या धाग्याद्वारे असे शेर सर्वांशी शे(अ)र करावे ही विनंती.

सुरुवात करतोय माझ्या एका शेराने........ जो साधर्म्य दाखवतोय '' मनोहर रणपिसे'' यांच्या द्विपदीशी.

बाहेर येउनी ना,दु:खास दर्शवावे
अश्रूंस पापण्यांची,ताकीद सक्त आहे
...... - डॉ.कैलास गायकवाड

शिस्त आहे लाविली,माझिया दु:खास मी
आसवांना पापण्यांशी यायचा मज्जाव आहे
.........- श्री.मनोहर रणपिसे

डॉ.कैलास

गुलमोहर: 

दोन्ही शेर आवडले.

'मराठी गझल' या स्थळावर माझे आवडते गझलकार श्री. नचिकेत यांनी दुसरे एक गझलकार 'बहर' यांचा एक शेर जवळपास वैभव जोशीच्या शेराप्रमाणे आहे असे लिहीले आहे. (येथे त्या धाग्याचा संदर्ब देणे कदाचित चूक ठरेल, पण आठवले म्हणून लिहीले.)

धन्यवाद! धागा आवडला!

-'बेफिकीर'!

वाटते व्हावे न केव्हा,तेच झाले शेवटी
सांत्वनाला माझिया,शत्रूच आले शेवटी
- डॉ. कैलास

ते परके होते मजला सावरणारे
ते अपुले होते जे होते नडलेले

- बेफिकीर

ज्याने सावरले तो नव्हता कुणीच माझा
ज्याने धीर खचवला तो सोयरा निघाला!
- नचिकेत (पोहरा)

खरे तर ह्या शेरातल्या विषयाचा चोथा सुद्धा चावून झाला आहे हे तो शेर लिहिताना वाटत/कळत होते पण मोह नेहमीच आवरता येत नाही. Happy

बेफिकीरजी, तुम्ही म्हणता तिथे ’मिसरे टकराना’ झाले आहे. अर्थाच्या बाबतीत ते शेर वेगळे असावेत असे वाटते.

आत्ताच मुटेजींचा

जिंकून मीच हरतो, ना जिंकतो कधी
तुमचा लवाद आहे, पंच तुमचे घरी

वाचला आणि मिल्याचा

ह्याचसाठी सामना करण्यास घाबरतो तुझा
पंच, खेळाडू, नियम सारे तुझ्या गोटातले

हा शेर आठवला.

अरे व्वा. माझा पण शेर टकरावलाच शेवटी.

हे असे शेर टकरावणारच. कारण हा आशय दैनंदिन जीवनातला आहे.

"ती स्वप्नसुंदरी" या गझलेत सात शेर आहेत. त्यातील उरलेले ६ अजिबात कुणाशीच टकरावणार नाहीत कारण ते नाविन्यपुर्ण आणि अस्सल आहेत.

नचिकेत तुम्ही माझी गझल वाचलीत, त्याबद्दल आभारी आहे. Happy
.............................................................................
माझ्या शेरामागील पार्श्वभूमी....

जिंकून मीच हरतो, ना जिंकतो कधी
तुमचा लवाद आहे, पंच तुमचे घरी

लवाद आणि पंच (तसेच कायदे करण्याचे अधिकार ) तुमच्या अखत्यारीत आहे.
त्यामुळे माझे खरे असूनही ते खरे मानले जात नाही. जिंकलो तरी विजेता घोषीत केले जात नाही,
तुमच्या बाजुने पंच असल्याने तुम्ही सदैव रडीचा डाव खेळून मला पराजित करता आहात.
आणि जर हरलो तर पराभुतच असतोच असतो.

असा काहीसा अर्थ.

............................................................................

अवांतर;

या कृषिप्रधान देशात शेतकर्‍यांचे कायदेशिर हितसंबंध जोपासू शकेल,
असा एकही कायदा नाही.
शेतीसंबधित सर्व कायदे शेतकर्‍याच्या लुटीसाठी उपयुक्त आहेत.
किंबहूना शेतीचे शोषण करण्यासाठीच आहे.

त्यामुळेच

ओली पडो की सुकी, मरण शेतकर्‍यांचेच असते.

एका दीर्घ गझलचर्चेनंतर हा धागा पुनरिज्जिवित करण्याची संधी लाभली.

‘सौंदर्य आपले ती सांभाळते असे की-
नाहीच लेकराला पाजीत माय आता.

-डॉ.श्रीकृष्ण राउत

विरू नये डौल या भयाने मुलास माता जवळ करेना
मनात येथे पगारवाढी, स्तनात नाकाम क्षीर आहे

- बेफिकिर

जिंकून मीच हरतो, ना जिंकतो कधी
तुमचा लवाद आहे, पंच तुमचे घरी

मेरा कातील ही मेरा मुन्सफ है
क्या मेरे हकमे फैसला देगा ?

जम्या क्या ?

अपने होंठों पर सजाना चाहता हूँ
आ तुझे मैं गुनगुनाना चाहता हूँ

--कतील शिफाई

पुन्हा वाटते की तुला गुणगुणावे
तुला गुणगुणाया तुझे ओठ व्हावे

--चंद्रशेखर सानेकर

तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना लगे,
मै एक शाम चुरालु अगर बुरा ना लगे.

-----क़ैसर-उल-जाफ़री

मधुमासासम दरवळणार्‍या कळ्याफुलांचे गाव तुझे
तुझ्या गावची खुडून घ्यावी एक संध्याकाळ मला

---?????

काही वेळा तर ते 'खयाल टकराना' आहे की सरळ 'खयाल उठाना' है असेच वाटू लागते.

मला तर अगदी सरळ-सरळ 'खयाल चुराना' है असेच वाटू लागते. Sad

<<<< माझ्यामते 'खयाल टकराना' ही संज्ञा समकालीन शायरांच्या शेरांना लागू केली पाहिजे. >>>

हे काय सांगायला पाहिजे? माझे खयाल तुमच्याशी टकराऊ शकेल, महात्मा गांधींजींशी थोडेच टकरावणार आहेत? Lol

मुटे Lol

वरचे सगळे शेर वाचताय की नुसतेच आपले प्रतिसाद ठोकताय??

रणपिसे - कैलास

कतील शिफाई - सानेकर

राऊत - बेफिकीर

हे समकालीन शायर आहेत काय?

सापाला ऐकू येत नाही असं म्हणतात. त्याला जमिनीतली व्हायब्रेशन्स जाणवतात असं एकाने सांगितलं. मग उंच बिल्डींगच्या गच्चीवर किंवा झाडावरच्या घरट्यातली पक्षांची पिल्ल कशी काय खातो तो ?

<<< हे समकालीन शायर आहेत काय? >>>

नसेल! त्यात माझा काय कसूर?
कोणत्या सदीमध्ये कुणी जन्म घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. Lol

**********
मुख्य मुद्दा असा की खयाल केव्हा टकरावते.

जो खयाल/आशय/समज आपण शेर लिहिण्याच्या आधीच सर्वश्रूत होता. तो सर्वांना किंवा निदान काहींना आधीच माहित होता किंवा जो खयाल दैनंदिन जीवनाशी निगडीत असतो, तो खयाल आपण जेव्हा मांडतो तेव्हा आपण फक्त तो आपल्या शब्दात मांडता असतो. एवढेच. त्याला खयाल टकराना म्हणता येणार नाही.

बाहेर येउनी ना,दु:खास दर्शवावे
अश्रूंस पापण्यांची,ताकीद सक्त आहे
किंवा
शिस्त आहे लाविली,माझिया दु:खास मी
आसवांना पापण्यांशी यायचा मज्जाव आहे

‘सौंदर्य आपले ती सांभाळते असे की-
नाहीच लेकराला पाजीत माय आता.
किंवा
विरू नये डौल या भयाने मुलास माता जवळ करेना
मनात येथे पगारवाढी, स्तनात नाकाम क्षीर आहे

या शेरात शब्दरचना, मांडणी आणि भाव वेगळे आहेत. पण आशय तर सरसकट सर्वांना माहित आहे.
स्तनपानाच्या विषयाची जाहिरात तर खुद्द महाराष्ट्र शासनच करित आहे.

अपने होंठों पर सजाना चाहता हूँ
आ तुझे मैं गुनगुनाना चाहता हूँ
किंवा
पुन्हा वाटते की तुला गुणगुणावे
तुला गुणगुणाया तुझे ओठ व्हावे

या आशयाची तर हिंदी सिनेमात शेकडो गाणी येऊन गेली आहेत.

आणि यात विशेष काही नाही. प्रत्येक कवी आपापल्या वकूबानुसार जुनेच किंवा त्याला परिचीत असलेले विषय घेऊन मांडणी करून नवकाव्य निर्माण करत असतो. मात्र कविता त्याची असली तरी आशय त्याचा नसतो.

म्हणून या प्रकारच्या शेरांना खयाल टकराना असे म्हणता येईल, असे मला वाटत नाही.

केवळ अस्सल आणि अभिजात ज्या काही मोजक्या कलाकृती निर्माण होत राहतात, त्यांच्याबाबतीतच "खयाल टकराना" हा शब्द लागू पडेल असे वाटते.

अर्थात हे माझे सहज आकलन आहे. अभ्यासपूर्ण नाही, त्यामुळे हे चूकही असू शकते. Happy

एक अगदीच खरा विचार असा आहे की हे खयाल / चिंतने या जगात अव्याहतपणे करोडो मेंदूतून चालत असतात
आपण गझलेत एक शेर केला इतर शायरांच्या शेराशी तुलना करता जरा नवा वाटला की लगेच हुरळून जावू नये
या अनादी अनंत ब्रम्हांडात हे याही पूर्वी घडलेले असते व पुढेही घडत राहणार असते

माझा एक शेर होता

हा शेर जसा बस दो ओळींचा प्रवास नसतो
या गझला म्हणजे प्रसाद असती मिरास नाही

आपण फक्त .."पहापहा कित्ती एकसारखय नै".... असे म्हणत मुक्तकंठाने कौतुक करायचे असते दोन्ही शायरांचे इतकेच मला कळते
Happy

कर्दनकाळ | 8 May, 2013 - 19:21 नवीन

ही पोस्ट काही मला समजली नाही. Sad

काय आहे हे?

समान्/साधारण समान द्विपदी.

की

खयाल टकराना

की

पर्याय टकराना

की

जुगलबंदी टकराना?

वरिलपैकी कोणतेही असेल तर समजून घेता येईल

पण

यात देवपूरकरांचा "अहंभाव" जागृत होऊन "श्रेष्ठतेचा पोरखेळ" चालला असेल तर ती अतिशय गलिच्छ, घाणेरडी कृती आहे, असे मला वाटते. दुर्दैवाने तसे नसो आणि माझा संशय खोटा ठरो. Sad

बेफीजींचे हे शेर मी कधी वाचल्याचे स्मरत नाही त्यामुळे हे नवीन शेर आज वाचायला मिळाले याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे
यासाठी देवसरांचे आभार Happy

देवसरांचे शेर नीट पाहिल्यावर समजते की... अनेक शेरातील फक्त काफिये सेम टू सेम आहेत .कदाचित बेफीजींच्या गझलेतून उस्फूर्ती मिळवल्यावर त्यांनी त्यांचे उस्फूर्त शेर केले असावेत (आपली ब्वॉ एक शंका आहे कृ गै न)

देवपुरकर, नुसते कवाफींचे साम्य म्हणजे खयाल टकराना. असा समज करून घेतला आहात की काय?

अहो दोन शायर शेजारी=शेजारी रहायला आले तरी असे होणार नाही.

डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी....................... मंगेश पाडगावकर

डोळ्यामधे कुणाच्या आणू नकोस पाणी
सांगू नको कुणाला माझी-तुझी कहाणी....................... शाम

................................

या प्रकाराला काय म्हणावे???

खयाल टकराना हा फारच दुर्मिळ व मानवी योगायोग आहे हे दुस-या धाग्यावर स्पष्ट केले आहेच आम्ही!

खयाल टकराना ही कितीही नाही म्हटले तरी तशी दुर्दैवी बाब आम्ही तरी मानतो! विशेषत: जेव्हा एखाद्या प्रथितयश शेरांच्या मिस-यांचे खयाल टकरतात तेव्हा एक प्रश्नचिन्हही निर्माण होवू शकते! प्रथितयश शेर माहीत नव्हता, वाचला नव्हता , मी ते अमुक अमुक काळी लिहिले होते ही सर्व लंगडी समर्थने वाटतात!
एकच प्रकारचा काफिया/ प्रतिमा वेगवेगळ्या शायरांच्या कल्पकतेच्या/प्रज्ञेच्या व प्रतिभेच्या मुशीतून बाहेर पडतो/ते तेव्हा शायरनिहाय/शायराच्या साहित्यिक व्यक्तिमत्वानुसार कसे वेगळे आशय, वेगळ्या शैलीत अभिव्यक्त होतात ते शिकण्याजोगे असते!

इथे कोणत्याही तुलनेचा हेतू नाही, कुणाचा शेर उच्च दर्जाचा असा अभिनिवेश नाही! उर्दूत एकाच प्रतिमेवर आधारीत विविध शायरांचे शेर आमनेसामने (रूबरू) ठेऊन लोक त्यांचा स्वच्छ मनाने आनंद घेतात!
आपण मराठी शायर असे निखळ आस्वाद घ्यायला कमी पडतो की, काय?

शेरांचे अर्थ विभिन्न, आशय विभिन्न,अभिव्यक्ती विभिन्न, काव्य विुभिन्न पण प्रतिमा (एक वा अनेक) समान,यातून बरेच काही शिकण्यासारखे असते असे आम्हास वाटते !

कोणत्या शायराने तो शेर कधी लिहिला, कुणी कोणावरून स्फूर्ती घेतली हे सर्वच गौण आहे! प्रतिमेवर, शब्दांवर/काफियांवर/रदीफांवर कुणाचीही मालकी नसते किंवा त्याचे पेटंट नसते! तेच काफियांचे शब्द म्हणजेच तीच/त्याच प्रतिमा वापरून पण प्रतिमांची गुंफण वेगळी असल्याने वेगळा आशय काव्याच्या पातळीवर अभिव्यक्त करणे यात शायरांच्या व्यक्तित्व भेदाचा , कल्पकतेचा होणारा विलास हा निश्चितच अभ्यासजोगा असतो! इथे विविध शायरांचे शेर हे त्यांच्या त्यांच्या जागी सुंदर असू शकतात!
व्यक्तिनिरपेक्ष, स्थळकाळनिरपेक्ष निखळ अभिव्यक्त होणा-या काव्याचा आस्वाद घेणे हे अपेक्षित असते!

खयाल काहीसा स्पर्शून गेल्यासारखे वाटणे(शब्दांच्या/प्रतिमांच्या साधर्म्यामुळे) वेगळे असते! आणि शेरातील समग्र खयाल प्रतिमांसकट एक असणे फारच वेगळी गोष्ट आहे! जर तोच आशय अनेक शायर त्याच शब्दांत, शब्दांची जराशी जगा बदलून जर मांडू लागले, जे या धाग्यावर दिलेल्या अनेक उदाहरणांत दिसून येत आहे, तर मग शायरांचे व त्यांच्या शा यरीचे वेगळेपण ते काय राहिले आणि मग तेच खयाल परत परत वेगवेगळ्या शायरांनी मांडण्याचा खटाटोप तरी का करावा?

प्रतिमा एक असणे/काफिया एक असणे/ रदीफ एक असणे, वृत्त एक असणे, यात काहीही गैर नाही, पण प्रतिमांची गुंफण, शेराचा समग्र अर्थ/खयाल हा वेगळा असलाच पाहिजे जर त्या शेरांना स्वतंत्र निर्मितीचा दर्जा मिळायचा असेल तर! अन्यथा असे शेर zerox किंवा carbon copies होणार असतील तर मग काय मजा आहे, असे शेर लिहायचे कशाला व श्रोते/वाचक म्हणतील की, आम्ही वाचायचे कशाला?

*************************इति कर्दनकाळ

कर्दनकाळ किंवा जे कोण असाल ते...

हा प्रतिसाद वाचल्याक्षणी वर माझे जे शेर कोट केलेले आहेत ते व त्यासंबंधातील स्वतःचे प्रतिसाद रद्द करावेत.

माझ्या परवानगीशिवाय माझे कोणतेही शेर कोठेही स्वतःला हव्या त्या पद्धतीने यापुढे कोट करू नयेत.

माझ्या शेरांचा वा लेखनाचा वापर मला न विचारता स्वतःची मते मांडण्यासाठी कोणत्याही व्यासपीठावर केल्यास मी कायदेशीर कारवाई इनिशिएट करेन.

-'बेफिकीर'!

शिरीष कणेकरांच्या पुस्तकात वाचलेले.
गालीब आणी जौक समकालीन , पण दोघांमध्ये सख्य नव्ह्ते. एकदा शागिर्दाच्या तोंडुन एक शेर निघाला
अब तो घबराते है के मर जायेंगे
मरकेभी चैन न आया तो किधर जायेंगे.

गालीब म्हणाला , "बहोत खुब , कोणाचा आहे" , शागीर्दने घाबरतच सांगीतले , जौकचा.
गालीब म्हणाला असेना का , चांगला आहे.
विरोधकाच्याही चांगल्या कामाचे कौतुक करावे , हाच संदेश ह्यातून ३०० वर्षांपुर्वी गालीब देतो.
ह्याच अर्थाचा गालीबचा सुप्रसीध्द शेर सगळ्यांना माहीत आहेच.
मौत से पहले आदमी , गमसे नजात (की निजात) पाये क्यौ.

हे नाडकर्णींच्याही पुस्तकात आहे उदाहरण!

विरोधकाच्याही चांगल्या कामाचे कौतुक करावे , हाच संदेश ह्यातून ३०० वर्षांपुर्वी गालीब देतो.<<< हे ठीक आहे. त्यावेळी शायरांची रोजी रोटी शायरीवर अवलंबून असायची, त्यांना बादशहा आपल्या पदरी बाळगून बिदागी, मानधन द्यायचा. त्यातून राजकारण वाढायचे, तरीही महान कवी एकमेकांच्या कवितेतील महानतेसमोर लवूनच असायचे. आजचे कवी फावल्या वेळचे कवी आहेत. त्यांना चर्चेत आणि राजकारणात रस अधिक! हे असले कवी वेळीच ठेचले नाहीत तर त्यांचे पुतळे उभारले जातील आणि त्यांचे म्हणणे हेच खरे हा प्रघात ठरेल.

ह्याच अर्थाचा गालीबचा सुप्रसीध्द शेर सगळ्यांना माहीत आहेच.
मौत से पहले आदमी , गमसे नजात (की निजात) पाये क्यौ.<<<

गालिब व जौक यांच्या शेरांमध्ये (अर्थामध्ये) मला तरी फरक जाणवतो विप्रा! अर्थात विषय काहीसा समान आहे म्हणा! Happy

Pages