वळण

पुन्हा तेच वळण येऊ दे, मी तिथेच उभा असेन...
तुझा हात हाती घ्यायला,
मागच्या वळणावर निसटलेल्या क्षणांना,
पुन्हा भेटायला...
नकळत झालेल्या स्पर्शांनी मोहरूनही,
डोळ्यांत सारे दाटूनही,
कधीच वाहून गेलो नाही...
आता वाटतंय, "... सारं राहूनच गेलं, नाही!"
पण ओळख पुसलेल्या चेहेर्‍यावरती, अनोळखी हसू घेऊन
नको वाटतंय इथे वावरायला...
कुणीतरी हवं आहे, स्वतःचीच ओळख पटवायला...
प्रश्न फक्त एवढाच आहे, वळण आहे की गोलातच झालंय हरवायला?

Submit to kanokani.com

आवडली स्मित

छान कविता.

व्वा!!

वळण आहे की गोलातच झालंय हरवायला?
वाह....!!!स्मित

ग्रेट .

धन्यवाद रुतूवेद, गंगाधरजी, मयुरेशजी, अमित आणि छायाजी स्मित

छान आहे!

चकवा... मस्तच आहे रे..

धन्स अंजलीजी नि ठकुजी स्मित

मला मायबोलीचे नियम अजून व्यवस्थित माहीत नाहीत.

पण बहुधा हे लिखाण कथा विभागातही चालावे.

-'बेफिकीर'!

गुड वन.. शुभेच्छा !!!

धन्यवाद बेफिकीरजी, नि गिरीशजी... बेफिकीरजी आपल्या सांगण्याचा अर्थ नाही लागला...

कधीच वाहून गेलो नाही...
आता वाटतंय, "... सारं राहूनच गेलं, नाही!"
प्रश्न फक्त एवढाच आहे, वळण आहे की गोलातच झालंय हरवायला?

मोजक्या शब्दात कितीतरी....अहाहा!

मस्तच रे मित्रा !
माफ करा बेफिकीरजी पण आपल्याशी सहमत होता येत नाहीये. कविता छंदातच असायला हवी हा नियम असेलही कदाचीत पण प्रत्येक वेळी तो लागु होइलच असे नाही. स्मित

छान.!!!

धन्यवाद भरत, विशालजी नि ह बा जी स्मित

कवितेस (चर्चेस ) लागलेलं एक वेगळं....... ''वळण''. स्मित