लग्न

अनोलखी चेहर्या बरोबर
सारा जन्म काधायअचा
याच वलनावर आईबापान्च्या
मायेचा पदर सोदुन द्यायचा

निघाला दाम खरा
तर आपला मानायचा
खोता दाम मात्र
नशिबाच्या माथी मारायचा

विसरायच बालपन अन गाव
पुसायच माहेरच्या अस्तित्वाच
नाव आनि आदनाव

मिरवायच चारचोघात
अमक्याची बायको म्हनुन
स्वतःची अस्मिता
स्वत:च तुदवुन

त्याच्या चुकान्चे काते
अन्गभर ल्यायचे
स्वतःच्या वागनुकिचे पुश्पसाज
त्याच्या रस्त्यात पसरायचे

त्याच्या आवदिप्रमाने आपल्या
निवदी बद्लायच्या
त्याला आवदत नाही म्हनुन
आपल्या चकोर्या उखदायच्या

त्याच्याशि व्हायचे ईतके एकरुप
ईतके सलग्न
कि वातावे आपल्यालाहि असेच
म्हनत असावे यालाच लग्न

पल्लवी


Submit to kanokani.com

कविता चांगली आहे पल्लवी/अनुमधुरा पण.........
टायपोतल्या खुप चुका खड्यांसारखा लागताहेत गं!
दुरुस्त केल्यास तर छान वाटेल वाचायला !

अनोळखी चेहर्या बरोबर
सारा जन्म काढायचा
याच वळणावर आईबापांच्या
मायेचा पदर सोडुन द्यायचा

निघाला दाम खरा
तर आपला मानायचा
खोटा दाम मात्र
नशिबाच्या माथी मारायचा

विसरायच बालपण अन गाव
पुसायच माहेरच्या अस्तित्वाच
नाव आनि आडनाव

मिरवायच चारचौघात
अमक्याची बायको म्हणुन
स्वतःची अस्मिता
स्वत:च तुडवुन

त्याच्या चुकांचे काटे
अंगभर ल्यायचे
स्वतःच्या वागणुकिचे पुष्पसाज
त्याच्या रस्त्यात पसरायचे

त्याच्या आवडीप्रमाणे आपल्या
निवडी बद्लायच्या
त्याला आवडत नाही म्हणुन
आपल्या चकोर्या उखडायच्या

त्याच्याशि व्हायचे ईतके एकरुप
ईतके संलग्न
कि वाटावे आपल्यालाहि असेच
म्हणत असावे यालाच लग्न

पल्लवी

अनुमधुरा, मी पण बोरिवलीकर.
कविता अगदी प्रामाणिक उतरलीय, पण टायपिंग मुळे बोबद बोलणारी बालिकाबधु सांगतेय असे वाटते. (रागावू नका)...
चेहर्‍या =chehaRyaa

कविता अप्रतिम आहे. पण शब्दांची ओळख करुन घे, मला तु मायबोलीवर नवीनच वाटते.

छान आहे कविता.

कवीता सुंदर आहे.........पण

http://www.maayboli.com/node/1554 हे नक्की वाचा.

भीषण सत्य.
अरेरे

कवितेतले विचार चांगले उतरले आहेत पण आजच्या युगात असेच असण्याची अजिबात गरज नाहीये. मायबोलीत यावर अनेक विचार मांडले गेले आहेत. पण दुर्दैव हे की अजून हे विचार सगळ्या स्त्रिया व पुरुष ह्यांच्यापर्यंत पोचत नाहीत आणि पोचलेच तर विकृत स्वरुपात पोचतात. असो.

माझ्या कवितेबद्द्ल मनपासुन अभिप्राय दिल्यबद्दल धन्यवाद्.मी मायबोलिवर नविनच आहे. तुमच्या प्रतिसदबद्दल आभार.