सुरेंद्र्च्या आईचे नेहमीप्रमाणे डबा बनवणे चालू होते. उषाताईंना कामाच्या सुचना देत त्या सर्व कामे पटपट आवरुन घेत होत्या. त्यांनी सुरेंद्र्चा डबा भरला, शाळेची तयारी केली, इतक्यात रिक्षावाला दारात हजर झाला. सुरेंद्रला त्यांनी शाळेत पाठवून दिले. घरातील बाकीची कामे आटोपण्यात त्या गर्क झाल्या. त्यांनी रेडिओ लावला आणि छान गाणी ऐकत त्या काम करू लागल्या... सुरेंद्रच्या बाबांची ऑफिसची वेळ झालीच होती, पण आज हे इतका वेळ झाला, अजून का बरे उठले नाहीत? हा विचार त्यांच्या मनात आला... लगेच त्यांनी हाक मारली, पण काही उत्तर मिळाले नही... शेवटी त्याच बेडरूमध्ये गेल्या आणि... समोरील द्रुश्य पाहून त्यांना भोवळच आली... घाबरतच त्यांनी उषाताईंना हाक मारली, त्याही लगेचच आल्या... सुरेंद्रचे बाबां बेशूध्द होते. त्यांनी अॅम्ब्यूलन्स बोलवली पण दवाखान्यात नेईपर्यंत त्यांनी प्राण सोडले.
-------------------------------------------------------------------------------
वर दिलेली एक घटना आहे. त्यावर वेगवेगळ्या व्यक्त्तींच्या(नात्याच्या) काही प्रतिक्रिया आपण पाहू...
सुरेंद्र्च्या आई : त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकली, जीवनाचा आधार संपला, मी देवाच काय वाईट केल होत म्हणुन हे भोग वाट्याला आले? आता एकटीनी आयुष्य कस काढायच याच दु:ख...
सुरेंद्र : आईला आधार द्यावा कि स्वतःला सावरावे? एक अबोल - अस्वस्थ मन...
काही लोक, ज्यांना सुरेंद्रच्या बाबांनी कर्जावू पैसे दिले होते : आता आपल्याला पैसे द्यावे लागणार नाहीत, याच समाधान...
काही लोक, ज्यांनी सुरेंद्रच्या बाबांना कर्जावू पैसे दिले होते : पैसे न देताच गेला, आता याच्या कुठूंबाकडून पैसे वसूल करायची कटकट... एक चिडचिड..
सुरेंद्रच्या बाबांचे स्पर्धक / शत्रू : बर झाल.. आपला मार्ग मोकळा झाला... देवानी ऐकल एकदाच... असा आनंद...
.................
आशा कितीतरी प्रतिक्रिया...
घटना एकच आहे पण वेगवेगळ्या भावना निर्माण करते. एखाद्या व्यक्तिमध्ये / वस्तूमध्ये आपण किती गूंतलेले आहोत यावर भावना आणि तिची तीव्रता अवलंबून असते. आनंद, दु:ख, चिंता, समाधान, चिडचिड... या भावना आपण त्या घटनेकडे कसे पाहतो यावर अवलंबून असते. वरील प्रसंगावरून आपल्या लक्षात येते कि घटना एकच असते पण त्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तिवर वेगळा होतो. एखाद्या घटनेकडे पाहण्याचा जो द्रुष्टीकोन असतो, तोच भावनांची निर्मिती करायला कारणीभूत असतो. आपणच वेगवेगळ्या भावनांची निर्मिती करत असतो. आपले विचार, आपला द्रुष्टीकोन आपल्या जीवनात सु़ख - दु:खांची निर्मिती करत असतात. आता जर आपणास पटले असेल कि आपणच जर स्वतःसाठी ववेगवेगळ्या भावनांची निर्मिती करु शकतो, तर आपण आपल्यासाठी आनंद आणि शांती का नाही निर्माण करु शकणार?
प्रत्येकजण सुखाच्या मागे धावतो आहे, प्रत्येकाचे जीवनात काहीतरी ध्येय असते ते साध्य करण्यासाठी खुप धडपड चालू असते. हे सगळ कशासाठी? जीवन आनंदाने, समाधानाने जगण्यासाठीच ना?... आपला आनंद , समाधान आपणच निर्माण करू शकतो. आपल्याला जे हव आहे ते मिळवता येते. याच्यासाठी तुमचा द्रुष्टीकोन चांगला असावा लागतो. विचारांमध्ये परिपक्वता आसायला हवी. माणसांतील माणूसपण / माणूसकी शोधता यायला हवी.
आपल आयुष्य खुप छोटस आहे, प्रत्येक क्षण जगला पाहीजे. चिंता, राग, चिडचिड.. या नकारात्मक भावना काढून टाकल्या पाहीजेत. देव सर्वांचा पालक आहे, कोणाला वाटेल का कि आपलं मूल दु:खी राहाव? आपल्या आनंदी आसण्यातच देवालाही आनंद असतो. मूल जन्माला येण्यापुर्वीच त्याच्या दूधाची सोय देवानी केलेली असते. प्रत्येकाला जे हव असत ते ते त्याला मिळत असते. विचार रुजवा, निर्णय होईल... निर्णय झाला कि चांगल्या सवयी लागतील. चांगल्या सवयीतून चांगल्या क्रुती घडतील... आणि सर्वांच्या चांगल्या क्रुतींमधून मोठ्या कार्याची निर्मिती होईल. तणावमुक्त समाजाची जोपासना होईल. आपण आपल्या कर्मांनी, सकारात्मक विचारांनी वर्तमानकाळ घडवायचा, आपल संचित आपणच घडवायचे. आनंद निर्माण करायचा आणि आनंदात राहायचे.
"आनंदाचे डोही आनंद तरंग..."
[ प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या ताणातून जात असते, हा लेख त्या सर्वांसाठी आहे. मला आशा आहे कि या विचारांमधून त्यानां सकारात्मक उर्जा नक्की मिळेल. चुक-भूल माफ असावी. ]
---
अर्चना


