जनुकं ?

सकाळी नेहेमीप्रमाणे लवकर उठुन आईची स्वयंपाकघरात खुडबुड सुरु आहे. एवढ्यात बाबांना जाग येते, ते उठुन बसतात. आईची चाहुल लागल्याबरोबर-
"ऐकलं का ?"
"ऐकते आहे. बोला !!"
"बदाम आहेत का घरात ?"
"आहेत. का ?"
"शिरा कर मग"
"बदामाचा शिरा ? आज काय विशेष ?"
"खावासा वाटला म्हणून कर म्हणालो. शिरा काय तुझ्या मांजरी बाळांत झाल्यावरच करावा असे थोडीच आहे."
"हो !! जसं काय तुमच्यासाठी काही करतच नाही."
"म्हणून तर सांगतोय, शिरा कर"

मग आई बदाम भिजत घालते. बदामाचा शिरा फारच जड पडतो म्हणून आई सगळा बदामाचाच शिरा नाही करत. एक वाटी रवा आणि एक वाटी वाटलेले बदाम असं करते.

"घ्या तुमचा शिरा" आई बाबांच्या हातात शिर्‍याची बशी ठेवत म्हणते.
"एवढा ? कमी कर..कमी कर"
"खा तेवढा. आवडतो ना तुम्हाला ?"
"आवडतो म्हणून एवढा खायचा का ? घास दोन घास दे फक्त"
"बदामाचा शिरा काही नेहेमी होत नाही. केलाय तर खा"
"नको नको...कमी कर"

दुपारी जेवणात आईने खमंग लसणाची फोडणी घालून एखादी पातळ भाजी नाही तर पिठलं, लाल मिरच्यांची चटणी नाही तर ठेचा असे काही तरी केलेले असते. पोटभर जेवून तृप्त मनाने बाबा म्हणतात,
"हे खरं जेवण. तो तुमचा (?) शिरा कसा चवीपुरता खायला. पोटभर जेवायचं तर भाजी-भाकरी-चटणीच हवी."

*****************************************************

शनिवार असुनही नेहेमीप्रमाणे ईशानची आई सकाळी लवकर उठली आहे. आधुनिक आई असल्यामुळे स्वयंपाकघरात खुडबुड करण्याऐवजी ती की-बोर्डचा खडखडाट करते आहे. एवढ्यात ईशानला जाग येते, तो आईची चाहुल घेत बाहेर बैठकीच्या खोलीत येतो.
"I don't want to drink milk"
"आं ?"
"Mamma, Can you please make brown shiraa ?"
"आज शिरा खायचाय मनीमाऊला ? बर तू पटकन दात घासून घे. आपण शिरा करु."

कार्टं स्वतःहुन काही तरी खायला मागतय ह्या आनंदात मी शिर्‍यासाठी रवा भाजायला घेते. ईशान शिरा तयार होण्याची वाट बघत स्वयंपाकघरात खेळत बसतो.

"ईशान चल शिरा खाऊन घे"
"I don't want so much sheeraa"
"आं ?"
"I don't want to eat so much sheeraa"
"खा गुपचूप. तुला आवडतो, तू मागितलास म्हणून केलाय ना ?"
"...."

तरी फार फार तर अर्धी वाटी शिरा खाऊन तो स्वयंपाकघरातुन धूम ठोकतो. दुपारी जेवणात पराठे किंवा भाजी-पोळी किंवा आमटी-पोळी असे काही तरी असते. पहिला घास पोटात गेल्या बरोब्बर ईशान म्हणतो,
"hmmmmmmmmm....yummy"
"आवडली आमटी ?"
"I don't like sheeraa."
"आं ?"
"Mamma, I like spicy. Can you make spicy every day ?"
" अ ओ, आता काय करायचं "

Submit to kanokani.com

खो खो

टू क्युट स्मित

स्मित

पोरगं गोड आहे तुझं स्मित

हा हा हा हा...प्रसंग आठवून खूप हसलो. स्मित
मस्तच!!!

हा हा हा.... ती जाहिरात होती ना, बच्चे तो बच्चे, बाप रे(?) बाप.... का अशी काहीतरी!! मस्तच! स्मित

छान स्मित

स्मित

हेहे जबरी!! नाहीतरी जनुकं एक पिढी स्किप करून पुढच्या पिढीत जातातच..
मस्त !

स्मित

स्मित

मस्तच.. स्मित

फिदीफिदी सही किस्सा आहे सिंडे.

स्मित

उगाच जनुकांवर नका ढकलू...शिराच बेचव झाला असेल फिदीफिदी
छान लिहीलंय

विनायक, तू (माझ्यापेक्षा) लहान असल्याने तुला मोठ्या मनाने माफ करते आहे फिदीफिदी

उगाच जनुकांवर नका ढकलू...शिराच बेचव झाला असेल >> हाहा

विनायक, मानली भाऊ तुझी हिंमत. एकाच दगडात डायरेक दोन शिरे गारद केलेस?
आता दिसुदे बेटा तू शिट्टीत, तुझं शिर जाग्यावर राहायचं नाही! फिदीफिदी

शाब्बास रे इशान. असंच करत जा. रोज वेगवेगळे पदार्थ मागत जा. सिंड्रेलाची जरा प्रॅक्टीस होईल पदार्थ करायची. म्हणजे मग मी कधी आलो तुझ्याकडे तर मला ट्राईड अ‍ॅन्ड टेस्टेड पदार्थ खायला मिळतील.

स्वगत - आता बघ, पुढच्यावेळी मी जेव्हा येईन तेव्हा शिरा अतिगोड झाला नसेल. -

फिदीफिदी

मस्त!

स्मित

अतिगोड ( शिरा नव्हे ! डोळा मारा )

Smiley
शिर्षक वाचून वाटलं काहीतरी सायंटिफिक लेख लिहिलायस की काय? अ ओ, आता काय करायचं रच्याकने, आम्ही तुझ्या मांजरीचा लेख अजिब्बात लक्षात ठेवायचा नाही असं ठरवलंय.

सहिच!

हाहा अगदी अगदी स्मित

काही जनुकं अशी पास होतात ह्याचा अनुभव सगळ्याच आयांना असेल स्मित

हा हा मस्तच
आधि मला वाटल की हि एक कथा आहे पण प्रतिसाद पाहिल्यावर लिंक लागली.
Smiley

ही नको ती जनुकं निरनिराळ्या वयाच्या सगळ्या भारतीय ओरिजिन च्या पुरुषां मधे असतात च.. पोळी- भाजी- वरण भात टाइप चं जेवण = स्वर्गसुख फिदीफिदी
आमचे बाबा, माझा नवरा, मै चा नवरा,मैत्रेयीचा पोरगा सगळे पोळी भाजी पब्लिक .. मुली/बायका टोटल विरुध्द !

भारी स्मित
खरं आहे पण.

आउटडोअर्स,
मलाही वाटलं होतं साय्फाय असेल कायतर.....

मस्त किस्सा. माझ्या एका मैत्रीणीचा मुलगा पण अमरिकेत रहायला लागल्यावर I don't want to eat Rava stuff असे म्हणला होता. ते त्याच्या आज्जीने कौतिकाने सांगितले होते. स्मित

स्मित