"सुट्टे द्या......"
"अहो नाहीत सुट्टे...... असते तर दिले नसते का.....?"
"आधी सांगायचं कळत नाही का.....?"
असला प्रेमळ संवाद फक्त एकाच वाहनात ऐकू येतो..... रिक्षा.....
आपल्या सर्वांचं आवडतं वाहन...... adjustment हा इथला keyword.... जरा सर्कून बसा की राव..... ३ सीट च्या रिक्षात ६ माणसं बसवणं हे खरच "येरा गबाळ्याचे काम नोहे...."
रिक्षाची गंमत म्हणजे, हवी तेंव्हा एक ही येणार नाही, अन बस साठी उभं रहावं तर १० रिक्षा आपल्या stop चा पुकारा करून जाणार..... आणि बस वेळेवर येणार नाही.....
मग कंटाळून पुन्हा "शरणं गच्छामि" म्हणत रिक्षाला हात दाखवावा तर बसण्या आधीच रिक्षावाले(नवीन शब्द!) सांगणार, २० रू. जास्त होतील..... traffic jaam असतं तुमच्या रोडला..... फिरून जावं लागेल.... भेंडाळलेल्या पायांनी आणि ठणकणारया डोक्याने आपण "ठिक आहे" एव्हढच म्हणू शकतो....
पाऊस आला कि तर बोलूच नये.... रिपरिप पावसात बराच वेळ थांबल्यावर रिक्षा येणार..... आपण छ्त्री सावरत आत बसेपर्यंत आकाशवाणी....(अर्थात ही शेजारून झालेली असते)... "अहो, छत्री बाहेर धरा... पाणी गळतयं..."
पण काही वेळा एखादा आपल्या भागातला रिक्षावाला(ले काका) भेटतात.....
मग गप्पा निघतात..... "खरच राव, पोटासाठी आलो इथे, पण आपल्या सातार्याची सर नाहि..."
माहेरचं माणूस भेटल्यासरखं वाटतं तेंव्हा..... उतरताना एक तोंडभरून हसू असत चेहर्यावर......
खरयं..... रिक्षा नसत्या.... तर बर्याच गोष्टी नसत्या....(बरेचसे वैताग.... आणि काही आनंद...)


