ऑटो अ‍ॅक्सीडेंट क्लेम बद्द्ल माहिती हवी आहे

Submitted by sneha1 on 29 June, 2010 - 21:06

काही दिवसांपूर्वी सॅम्समधे गेले होते.पार्किंग नेहमीसारखेच भरलेले.मी हळूहळू सरळ जात होती,तेव्हा बाजूचा ट्र्क मागे बॅक करायला लागला.मी हॉर्न दिला.तो काही थांबला नाही,मी अजून जोरात हॉर्न दिले.आणि काही कळायच्या आतच तो माझ्या बाजूच्या दारावर येऊन आपटला.मला काही झाले नाही,पण बम्पर ठोकल्या गेला,आणि दार पण पुर्ण उघडल्या जात नाही आता.ट्र्क चालवणारे ८० चे आजोबा होते.ते म्हणाले की त्यांना सूर्याच्या ग्लेअर मुळे मागचे दिसले नाही, आणि हॉर्न ऐकू आले नाहीत Sad
लगेच एक्मेकांच्या इन्शुरन्स ची माहिती घेतली.आजोबा खूप cooperative निघाले, लगेच माझ्या एजंट शी बोलले पण.
खरी अड्चण दुसरी आहे.आतापर्यत असे कधी झाले नाही, त्यामुळे काहीही माहिती नाही. अशा वेळी काय करणे फायद्याचे असते?म्हणजे आपल्या डिडक्टीबल मधून करून घ्यावे, की दुसर्‍या माणसाच्या इन्शुरन्स कडून क्लेम करून घ्यावे?आपल्या डिडक्टीबल मधून केले, तर आपला प्रीमियम वाढतो का?आपली चूक नसली तरी?
आम्ही त्या आजोबांच्या कम्पनीकडून vehicle inspection करून घेतले.पण ते म्हणतात की आम्ही ५०% देऊ, recycled parts वापरू वगैरे. ह्या गोष्टी कशा हाताळाव्यात, आणि अजूनही काही ह्याची माहिती कोणी जाणकार देऊ शकेल का प्लीज?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण क्लेम केला की नो क्लेम बोनस जातो. मग तो आपल्या चुकी मुळे की दुसर्‍याच्या हा प्रश्न येत नाही. तरी सुध्दा आणखी माहिती घ्यावी.

स्नेहा, जर तुझ्या इन्शुरन्स एजंटशी बोलणं झालं तर त्याने रिपेअरिंगला कुठे जा वगैरे सांगितलं नाही का?
>>>तर आपला प्रीमियम वाढतो का?आपली चूक नसली तरी?>>> हो. एकदा इन्शुरन्सवाल्यांशी बोलून घे ना.

सायो,त्यांनी दोन्ही ऑप्शन्स दिले आहेत्,त्यांच्याकदून किंवा दुसर्‍या कंपनी कडून करून घेण्याचे.अजून आम्हालाच काय करावे ह्याच्याबद्द्ल गोंधळ होतो आहे. म्हणून इथे टाकले,सगळयांकडून माहिती मिळेल ह्या उद्देशाने..

माझा अनुभव शेअर करते. माझी गाडी थंडीत बर्फावरुन स्किड झाली आणि ड्रायव्हरच्या पुढचं चाक जाऊन कर्बवर जोरात आपटलं. घरी आल्यावर इन्शुरन्सला फोन केल्यावर त्यांनी अमुक अमुक collision center ला फोन करायला सांगितलं. मी त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी- जे थोडं लांब होतं फोन न करता माझ्या घराजवळच्या ठिकाणी फोन केला नी कार tow करायला सांगितली. सगळ्या मेजर रिपेअर्स मध्ये १ महिना गेला. रिपेअरिंगचा खर्चही भरपूर होता म्हणून इन्शुरन्स कं. च्या डोक्यावर बसायला लागलं कारण त्यांचा माणूस जाऊन काम बघून आल्याशिवाय पुढचं रिपेअर व्हायचं नाही. त्यामुळे पुढे अशी वेळ आल्यास इन्शु. कं. रिपेअरिंग करता जी जागा सांगेल तिकडे निमूट घेऊन जायचं असं ठरवलंय.

तर आपला प्रीमियम वाढतो का?आपली चूक नसली तरी?>>> नाही, ते इन्सुरन्स कं वर डिपेंड आहे. माझ्या बाबतीत वाढला नाही (माझी चुक असतांना देखील).

ह्या केसमधे असे दिसते आहे कि आजोबांना चूक मान्य होती. मग त्यांच्या इन्शुरन्स मधून तुम्हाला भरपाई मिळेल. सध्यापुरती 'रेंटल' कार घेतल्यास तुमचा इन्शुरन्स आणि आजोबांचा ह्यापैकी जो जास्त असेल त्यातून कव्हरेज मिळू शकेल. तुमचा प्रिमियम वाढणार नाही कारण तुमची चूक नाही. 'डिडक्टीबल' पण जाणार नाहीत. मात्र आजोबांच्या इन्शुरन्स कंपनीच्या मार्फतच कारवाई करत रहा.

...

धन्यवाद, सगळ्यांना.एक बरे आहे की गाडीला मेजर काहीच झाले नाही, आणि ती अगदी नीट चालवण्यासारखी आहे.म्हणजे फक्त रिपेअरला जो काही वेळ लागेल तेव्हाच फक्त रेंटल कार घ्यावी लागेल , जे कव्हर्ड आहे.सध्या फक्त फोनाफोनी आणि मेलामेली चालू आहे..