सहकारनगर

सहकारनगर मधले मायबोलीकर


हाय मुलींनो कशा आहात?

सावनी बर्‍याच दिवसानी! काय काय बागकाम केलस?

भाग्यश्री मीपण वाचते तुझा ब्लॉग नियमीत, खरंच मस्त लिहीतेस.



काय site आहे भाग्यश्रीच्या ब्लॉगची?



अरे वा...बरेच वाचक दिसतायत.. सही.. थँक्यु थँक्यु!
आर्च, ही घे लिंक : http://bhagyashreee.blogspot.com/

बाकी आजचा काय प्लॅन सगळ्यांचा? मी काल पावभाजी केली होती पहील्यांदा.. छान झाली! आज तीच उरलेली खाणार.. कधी नव्हे ते पावसाळी वातावरण आहे, त्यामुळे मस्त वाटतय!



अरे वा, इकडे तर मस्त मैफल जमली आहे. मलाच यायला वेळ मिळत नाही. सकाळी एक फेरी मारुन जाते पण जास्त वेळ जमत नाही.

प्रज्ञा, खर तर मला ते लोकलचे धक्के खायला अजिबात आवडायचे नाही (कारण पुण्याला गाडीची सवय ना) पण आता सवय झाली. (न करुन कोणाला सांगतिये) तरी पण लोकल परवड्ली कारण लेडिज मध्ये चढता येते पण बसचा प्रवास नको किती जणांचे धक्के, आणि नकळत तर कधी मुद्दाम होणारे स्पर्श.

सावनी, मी नाही जाणार ग व्.वि. ला रियाची परिक्षा आहे त्या दिवशी.

भाग्यश्री, तुझा ब्लॉग पाहिला, वेळ मिळाला की आधी वाचुन काढणार आहे.



झेलम,
छान वाटलं ग तुला पण खुप दिवसांनी इकडे बघुन. मी मस्त मजेत आहे.
बागकाम म्हण्जे, यावर्षी बर्‍याच भाज्या लावल्यात. मेथी, आलं, लसूण, मिरच्या, कोथिंबीर आणि अजुन बर्‍याच भाज्या लावल्या. मेथीचं तर वेडं पीक आल्यासारखं झालयं. भरपुर मेथी येतीये.
वर्षा , रियाची कसली परिक्षा आहे ग? आता कितवीत गेली ग ती?
प्रज्ञा, झाली का तुझ्याकडची पार्टी. काय मस्त खमंग बेत होता ग. पण मी सुद्धा तुला सांगणार होते की अपेटायझर ऐवजी कसली तरी कोशिंबीर किंवा रायतं ठेव. गोड काय होतं ग या सगळ्याबरोबर?

भागाबाई स्वैपाकघरातले प्रयोग जोरात चालले आहेत वाट्टं.



सावनी कशी आहेस? घरच्या ताज्या भाज्या खायला मस्त वाटतातना. भरपुर मेथी आहे तर मग काय मेथीचे वेगवेगळे प्रकार चालु आहेत वाटते. आमच्यासाठी भजी किंवा वडे करुन आणलेस तरी चालेल.स्मित
रिया आता पाचवीत आहे. गणित अध्यापक मंडळाची परिक्षा आहे अग आणि या परिक्षा रविवारीच असतात ना. तिला गणित आवडत नाहि, स्वःतच तयार झाली आहे परिक्षेला बसायला तर बसुदे.



आहात का कोणी गप्पा मारायला?



नलिनी, खूप दिवसांनी दिसलीस ईकडे, कशी आहेस? काय चाललयं सध्या?
बाकी सगळ्याजणी कुठे गायबल्या?
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!



ही मी आले! स्मित
हाय नलिनी, मीपुणेकर..!
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!!



अरेचा, भा तु आता आलीस आणी माझ्या घरी जाण्याची वेळ झाली अरेरे..आज ईकडे गप्पा मारायला वेळ होता थोडा..
आज मी लवकर निघतिये घरी, वेगास ला निघतोय आता:)
पण हं, मला एक सांगशिल का प्लीज, युनिवर्सल स्टुडिओ जवळं एखाद बरं देसी रेस्टौरंट माहिती आहे का?



ओह.. नाही माहीत गं.. कारण आम्ही तिथे नेहेमी जेवूनच जातो ना.. त्यामुळे काही पत्ता नाहि रेस्टॉरंट्सचा..



****************************************************************
तुमच्या लग्नात घेतलवत का हो तुम्ही "नाव"?... नाही.... अरेरे!... पण असु द्या, आता भागवुन घ्या हौस...
काय म्हणला घेतलवतत... अहो मग परत घ्या ना! ... तेव्हढाच पुनःप्रत्ययाचा आनंद आणि दुसर्‍या कुणाच तरी नाव घ्यायची संधी!
काय? तुमच लग्न व्हायचय अजुन... मग तर उत्तमच!.... चला उखाण्याची नेट प्रॅक्टिस करुन घ्या...

कुठ काय विचारताय?.... गणेशोत्सवाच्या स्पर्धेत

सुरु झाला गणेशोत्सव
गोळा झालं गाव...
उखाण्यांच्या स्पर्धेत
टाका घेऊन "नाव" !

इथे टिचकी मारा
http://www.maayboli.com/node/3280/contests
***************************************************************



अरे! सहकारनगरातले लोक कुठे गायबले? सगळेच गणेशोत्सवात व्यस्त दिसतायेत.



वर्षा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

cake.jpg

बाकी सगळ्याजणी काय म्हणताय? सानिकाने सर्वांना हाय सांगितलाय.



नव्या मायबोलिवरचा एखादा प्रतिसाद जर पुसायचा असेल तर तो कसा पुसायचा?



...लंडन से गया पूना.. पूना से गया दिल्ली... दिल्ली से गया बाली... बाली से गया पॅरिस.. पॅरिस से गया पटना.. पटना से गया...............
अहो एवढं फिरून आलायत? मग तुमचे अनुभव आम्हालाही सांगा की...
पहा... गणेशोत्सव प्रवासवर्णन स्पर्धा.

आळस हा माणसाचा शत्रू आहे म्हणतात... त्यामुळेच कित्येक गोष्टींची सुरुवातच होत नाही... अहो पण मायबोली कथास्पर्धेत संयोजकांनी कथेची सुरुवात करूनच दिलेली आहे..
मारूया थोड्या कल्पनेच्या भरार्‍या आणि उतरवूया कागदावर जाडी कमी करण्याचे अनुभव, बिग बॉस मधे जाण्याची फाईट आणि रॉजर- सानिया ची डेट.....

सकाळच्या घाईत नाष्ट्याला वेळ नाही? अहो मायबोलीकारांनी झटपट न्याहरी ची यादीच केली आहे.
तुमच्या कडेही आहेत अजून काही पदार्थ?
पहा गणेशोत्सव पाककला स्पर्धा.

"आला पाऊस पाऊस.. आल्या पावासाच्या सरी.. शेतं शिवार साजरे.. गेले नदी नाले भरी... "
टिपा हा सुंदर पाऊस आपल्या कॅमेर्‍यात....
पहा गणेशोत्सव प्रकाशचित्र स्पर्धा.

थोडी गंमत, खास शालजोडीतला "आहेर", चिमटे आणि टपल्या...
पहा गणेशोत्सव नावगुंफण स्पर्धा आणि गणेशोत्सव व्यंगचित्र चारोळी स्पर्धा.

स्पर्धांच्या तयारी साठी सप्ताहांताचा वापर करता यावा म्हणून खास लोकाग्रहास्तव सर्व स्पर्धांची अंतिम मुदत सोमवार १५ सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.
मायबोली गणेशोत्सव २००८



धन्यवाद नलिनी, खुप मस्त आहे केक. हल्ली ईकडे कोणी येत नाही, त्यामुळे केक आपणच खाउन आपल्या दोघींचा वाठदिवस साजरा करुयात.



वर्षा,
वाढदिवसाच्या उशीराने खूप खूप शुभेच्छा!! कसा झाला वाढदिवस? रिया कडून काय गिफ्ट मिळाली?
आज बर्‍याच दिवसांनी आले इकडे. गणपतीची गडबड होती मध्यंतरी. छान झाला आमच्या घरचा गणपती. पण माझे यावर्षी उकडीचे मोदक साफ चुकले. काय झालं काय माहित पण दोनदा केले आणि दोन्ही वेळा फसले:(असो. बाप्पा घेतो बिचारा समजुन.
नलू, तुझी भारत वारी कशी झाली? कोणा कोणाला भेटलीस तिकडे?
सानिका आणि तिचं पिल्लु कसय? मूडीला भेटलीस का?



चांगला गेला दिवस. रियाने चॉकलेट दिले.
मी पहिल्यांदाच केले उकडीचे मोदक पण बरोबर नाही झाले. तळलेले करते नेहमी, ते चांगले होतात.



वर्षा, मीपुणेकर, सावनी आणि येणार्‍यांना हाय.
भारतवारी एकदम मस्त झाली माझी. अजुनही मनाने तिकडेच वावरत असते मी.
ही भागाबाई कुठे गायब आहे? स्वयंपाकघरातले नविन नविन प्रयोग काय म्हणतायेत?
मॄ, नाही येत का हल्ली स. न. वर?



मंडळी, गणेशोत्सवातल्या स्पर्धांसाठी मतदान केलेत ना?
नाही?? अहो मग करा बघू लगेच. आता शेवटचे फक्त ३ दिवस उरलेत. मतदान २७ सप्टेंबर पर्यंत चालू राहील.
आपल्या आवडत्या फोटोला, उखाण्याला, चारोळीला, प्रवासवर्णनाला आणि कथेला नक्की मत द्या.

ही घ्या लिंकः
http://www.maayboli.com/node/3634



नमस्कार मंडळी.

दिवाळीची चाहूल कशी अगदी आसमंतात भरून राहिली आहे नाही?
वर्षातल्या सर्वात मोठ्या या उत्सवात लक्ष्मीच्या स्वागतासाठी तुमची लगबग सुरू झाली असेल. घरातली अडगळ काढून साफसफाई करायची आहे. घर रंगवायचे आहे. नवीन खरेदी करायला दोन-तीन दिवस तरी पाहिजेत. प्रियजनांच्या गाठी आणि त्यांच्यासाठी भेटी घ्यायच्या आहेत. नोकरी-धंद्यातल्या संबंधांना यानिमित्ताने उजाळा द्यायचा आहे. बर्‍याच नातेवाई़कांकडे जायचे नियोजन करायचे आहे.. हे ना ते. अनंत विषय मनात असतील, अन् कमी वेळेत कसे कसे होईल हा प्रश्नही!

या गडबडीत आपल्या दिवाळी अंकाला मात्र विसरू नका, म्हणजे झाले.

दिवाळी अंकाची घोषणा होऊनच आता आठवडा उलटून गेला आहे. दिवाळी अंकातला आपला सहभाग निश्चित करण्याच्या दृष्टीने हीच वेळ आहे घाई करण्याची.
आपल्या लाडक्या मायबोलीचा हा नववा 'हितगुज दिवाळी अंक', "मायबोली-मायमराठी- गेले तप आणि येणारे तप" असा विषय घेऊन महाजालावर आपणा सर्वांसमोर येतो आहे, हे दिवाळी अंक घोषणेत सांगून झालेच आहे. या वर्षी आपला दिवाळी अंक मूर्त रूप घेणार आहे तो फक्त शब्दरूपाने नव्हे, तर दृक्-श्राव्य रूपाने सुध्दा. यामध्ये कथा, कविता, ललित, हलकेफुलके लेख, प्रवासवर्णन, रसग्रहण यांबरोबरच बाल साहित्य व आपल्या गुणप्रदर्शनांचे स्वागत आहे..

आपण अजूनही विचार करत असाल, विषय ठरले झाले नसतील तर आपण घाई करायला हवी. ऐनवेळी तुमची धांदल नको, म्हणून ही आगाऊ सूचना!
तेव्हा, लागा बघू तयारीला..!!

आपले साहित्य तयार असेल तर दिवाळी अंकाची घोषणा व त्यातील सूचना पुन्हा एकदा वाचून, कृपया आपले साहित्य दिवाळी अंक लेखनाच्या खालील दुव्यावर पाठवावे.
http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1

काही शंका असल्यास, आपल्या प्रश्नांचे स्वागत आहे..

--
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २००८



हाय मी आहे इथेच.. पण सन मधे येणं नाही होत फारसं.. आता आले..
स्वयपाकातले प्रयोग चाल्लेत ना!! पुरणपोळी, उकडीचे मोदक वगैरे करून (चांगले ) झाले.. म्हणजे आता बर्यापैकी येतं असं मी समजतीय.. स्मित

बाकी कशा आहेत सगळ्या!



"कसला विचार करतोयस रामय्या ?"
"घराला आणि... नाही नाही, सवयीचा परिणाम ! अरे, या वर्षीच्या दिवाळी अंकात काय लिहावे याचा."
"अरे मग घाई कर थोडी. लवकर संपव विचार आणि उभा कर शब्दांचा चारमिनार. "

जेमतेम दोन आठवडे उरलेत मंडळी, परजा आपापले कीबोर्ड अन येउ द्या कलाकृती संपादक मंडळाकडे.

संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २००८