ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

suhasg तुमचा प्रत्येक रेप्लाय म्हणजे tumchya ब्लोग ची जाहिरात आहे .... अर्ध्या कथा टाकायच्या आणि म्हणायचे कि ब्लोग ला भेट द्या ... इथे टाका न संपूर्ण कथा ...

च्रप्स , सुहासजी हे व्यावसायिक ज्योतिषी आहे त्यामुळे ते या प्रकारचे (म्हणजे जाहिरात सदृश) रिप्लाय देणार हे स्वाभाविक आहे. प्रत्येक ब्लॉगरला आपला ब्लॉग लोकांनी पहावा असे मनातून वाटत असते.त्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. ज्योतिष हा व्यवसाय असल्यास त्याला ग्राहक संरक्षण कायदा लावावा काय? हा मुद्दा उपस्थित होउ शकतो. पण हा विषय यापुर्वी इथे घेतला गेला आहे.अजून तरी ज्योतिषाने जाहिरात करणे हा गुन्हा नाही.अगदी जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत देखील.
आपला संपुर्ण कथा इथे टाकावी ही सुचना देखील चांगली आहे. एखादे लेखन ब्लॉग वर आले म्हणुन अन्य ठिकाणी येउ नये असे काही नाही. पण त्यालाही काही लोक आक्षेप घेणारे असतात. असो.

maazi janma taarikh 07.11.1980 pahate 5.40 am Pune female Janma Laxmipujan, married. sadhya professional life khoop traasdayak chalale aahe tari job change karne sadhya yogya ki ayogya. please lavkar kalava.

,,,,,

हा धागा नक्की कशासाठी आहे?
लोकांच्या ज्योतिष विषयक शन्का सोडवायला? त्यांच्या पत्रिका पाहायला? त्यांची उत्तरे द्यायला?

ज्योतिष विषयक चर्चा करायला?

की

आपल्या ब्लॉगची जाहिरात करायला? Uhoh

mnc, लिंबुटिंबु, मीराताई, अन्विता ताई यानंतर या धाग्याला कोणी वाली मिळणार आहे का नाही?

suhasg,

एक भोभाप्र : लाय डिटेक्टर म्हणजे असत्यशोधक यंत्र ना? सत्यशोधक यंत्र म्हणजे ट्रुथ डिटेक्टर असायला हवं. Proud

आ.न.,
-गा.पै.

गा.पै.

धन्यवाद.
असल्या उपकरणांना लाय डिटेक्टर च म्हणतात सग्ळे जण म्हणून आम्ही जरा वेगळे नाव वापर्ले झाले,मूळात आपल्याला सत्य शोधून काढायचे आहे असत्य नाही.

बाकी नावात काय हो, कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या , बारसे झाल्याशी मतलब ! म्हणा तुम्हाला काय म्हणायचे ते..

>>एक भोभाप्र : लाय डिटेक्टर म्हणजे असत्यशोधक यंत्र ना? सत्यशोधक यंत्र म्हणजे ट्रुथ डिटेक्टर असायला हवं<<
येस्स ये हुई ना बात! गामा पै क्या बात आहे.कोण म्हणतो पैलवानाचा मेंदु गुडघ्यात असतो म्हणुन! Lol

म्हणजे काय प्रकाश भाऊ तुम्ही तर चक्क कमालच करताय राव, म्हणजे इतके दिवस तुम्ही आमच्या आ.न. गा.पै. ना अगदीच 'हे' समजत होतात की काय ?

(गा.पै. जरा ह. घ्यायचे बर्का , नायतर मारायला धावशीला, आधीच पैल्वान त्यात चिडलेला ..).

.....

suhasg,

अहो मी चिडलोय कुठे? Lol

माणूस एकतर खरं बोलत असतो किंवा खोटं. या गृहितकावर लाय डिटेक्टरचं कार्य चालतं. पण दरवेळेस सत्य आणि असत्य हे एकमेकांविरुद्ध असतीलच असं नाही. मात्र यांचा शब्दखेळ मोठा मनोरंजक असतो नाही? आपल्याला सत्य हवंय की असत्य हाच एक गहन प्रश्न आहे.

आ.न.,
-गा.पै.

अहो गा.पै. मी पण जरा थट्टा केली झाले!

आपल्या कडे या लाय डिटेक्टर्स चा एव्हढा प्रसार , वापर नाही पण उसगावात हे तंत्र फार वापरले जाते व्हाईट हाऊस च्या कर्मचार्‍यांपासून ते सुपर मार्केट्च्या कर्मचार्‍या पर्यंत. मोदीजींना हे कळले तर आफत यायची
(" अब हम हर जगह लाई डिटेक्ट्र बिठवा देंगे चाहे वो सरकारी कार्यालय हो या स्कूल तथा अस्पताल, , ताकी मेरे देश की जनता .. असत्य को दुर करना और सत्य का सन्मान करना सिखें.. हमारे देश के लोगोंने जब हमे पाँच साल के लिये चुना था तब हमने कई चीजोंका आश्वासन दिया था, मेरे देशवासियों आज वो वक्त आया है.. ..................)

जौ दे .

या यंत्रांना चकवणे, प्रयत्न केला तर शक्य आहे,आणि कसे चकवायचे याची पुस्तके , क्लासेस, सेमीनार / वर्कशॉप असतात.

बर्‍याच वेळा सत्य / असत्य हे त्या व्यक्तीच्या समजूतीचा भाग असते.

आपण म्हणतो , मांजर दूध चोरुन पिते, आपल्या दृष्टिने ती चोरी पण त्या मांजराला त्याचे काय , त्याच्या साठी दूध हे त्याचे अन्न आहे, समोर दिसते आहे, मांजराला भूक लागली आहे तेव्हा ते पिणारच . चोरी ही माणसाने निर्माण केलेली संकल्पना आहे, मांजराला त्याच्याशी काहीही देणे घेणे नसते.

>>बर्‍याच वेळा सत्य / असत्य हे त्या व्यक्तीच्या समजूतीचा भाग असते.<<;
वा! क्या बात है| सुहास जी उत्तम ज्योतिषी आहेत हे सत्य आहे! त्यांच्या व माझ्या ज्योतिष विषयक मतात मतभिन्नता आहे हे सत्य आहे. त्यांचा ब्लॉग मला आवडतो हे सत्य आहे. आपण सर्व मर्त्य आहोत हे सत्य आहे.

प्रकाशजी मान गये उस्ताद ! ड्वोल्यात पानी आलं वाचून ... त्ये गहीर्वरुन का काय म्हंतात ना त्ये आल बघा ... स्कीरिण शाट घ्येऊन ठिवलाय,,,

मि माझ्या मित्राला तुम्चा ब्लोग सुचवला , त्याने त्यावर सम्पर्क साधन्याचा प्रयत्न केला पन तो इन आक्तिव दाखवत आहे. तरि क्रुपया त्याला खालिल मैल आयदी वर तुमचा Contact details पाथवने.

rahulshinde3@rediffmail.com

ब्लोग वरचे लेख छापायला वेगळा धागा काढलात तर बरे! इथे एखादा गरजु आपला प्रश्न वविचरतो.
आणि धागा वर आला कि आपले उत्तर आले की काय हे बघायला येतो. त्याला मिळते काय तर तुमचा अर्धवट लेख!
बरे तो लेख वाचायला जावे तर तुम्हि लेखाची लिंक न देता ब्लोगची जनरल लिन्क देता. त्या वरुन नेमका लेख शोधता शोधता ३-४ हिट्स मात्र जास्त मिळतात.

राहुल१२३
अहो आता इथे लोकांकडून थेट पैसे मागता येत नाहीत ना? मग ब्लॉगची लिंक द्यायची आणि तिथे शंका विचारली की सांगायचं आम्ही फुकट सल्ला देत नाही म्हणून.. अशी ही सगळी गंमत आहे.
एवरीथिंग इज् फेअर् इन लव वॉर अ‍ॅण्ड बिजिनेस (धंदा)!

....

बिपीन चन्द्र हर... | ,राहुल१२३... सह्मत
तुम्ही 'धंदा' म्हणालात , राग नाही, जे करतोय ते प्रामाणिक पणे करतो,>>>
असहमत Mr . सुहास हा पोटापाण्याचा उद्योग प्रामाणिक पाने करत नसून पैसे मिळवण्यासाठी केवळ अंदाज वर्तवत असतात . ते ज्योतिष सांगताना मी सांगेल ते केवळ मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून पहावं हे specify करतात .
सांगितल्याप्रमाणे योगा योगाने घडलंच तर चांगलंच आहे आणि नाही घडलं तर मी आधीच specify केलं होतं म्हणायला मोकळे. खडा मारून बघायचा . लागला तर लागला नाही तर घडा फुटला . सगळे ज्योतिषी हेच करत असतात.

लोक मनोरन्जनासाठी ज्योतिषाकडे जातात?
अहो, जेव्हा एखाद्या समस्येवर उपाय सुचत नाही, मार्ग दिसत नाही, तेव्हा जोतिषाकडे जातात ना?

बऱ्याच दिवसांनी आज ह्या धाग्यावर आले . खूप महिन्यात इकडे कोणीच आलेले दिसत नाही .
मी आणि पशुपति ह्यांनी लिहिलेला ' गुरु बदल -२०१५ ' हा लेख पशुपतिजीनी नुकताच मायबोलीवर प्रकाशित केला. आहे. उत्सुकांनी जरूर वाचा.
http://www.maayboli.com/node/55061

नमस्कार, मी खूप विवंचनेत आहे, विवाह विलंब होण्यामागे कुंडलीतील ग्रह कारणीभूत असू शकतील का ? आणि शांती , जप वगैरे करण्यामुळे काही मदत होवू शकेल का ?

अनुभव असा की सप्तमात शनि वा सप्तमेश शनिच्या राशीत, वा सप्तमेश अष्टमात, वा सप्तमेश द्वितियात(सप्तमाच्या अष्टमात) अशा स्थितीत लग्नास विलंब वा विजोडत्व दिसुन येते.
या व्यतिरिक्त, सप्तमात मंगळ/हर्षल्/प्लुटो, प्रथम-सप्तमातुन राहुकेतु, हे जमत असलेल्या लग्नात मोडता येऊन लग्नास विलंब होण्याची उदाहरणे आहेत. याच ग्रहस्थितीची अन्यही भाकिते आहेत, पण त्याकरता अन्य ग्रहयोगही तपासावे लागतात. अंशात्मक स्थितीही विचारात घ्यावी लागते.
याव्यतिरिक्त, अदरवाईज गुरु कितीही शुभ ग्रह मानला तरीही प्रथम वा सप्तमात गुरु असल्यास, बर्‍याचदा विवाहयोगास विलंब/अनिश्चितता दिसुन येते.
या सर्व बाबी, ग्रहांमुळे होतात हे जेव्हा म्हणतो, तेव्हा ते ते ग्रह भावेश म्हणून वा स्थानगतरित्या व्यक्तिच्या वर्तनावर परिणाम घडवुन आणताना दिसतात, व व्यक्ति विशिष्ट पद्धतीने विचारसरणीने वागत जाते, त्यामुळे होतात.
यासर्व विषयात आहे ते ज्ञान अफाट आहे, व अजुन संशोधन करायलाही अफाट वाव आहे. Happy

Pages