मखमली अंग माझे....!!!

Submitted by MallinathK on 14 June, 2010 - 05:49

काल गाडीवर भिमाशंकरला जायचा योग आला. येताना एके ठिकाणी थांबलेलो, तिथे हा किडा दिसला. फोटो तसं निट काढायला जमले नाही, पण जणु मखमली सारखंच अंग होतं त्याचं. जसं लाल वेलवेटचं कापडच... !!! कधी तरी गाणं ऐकलेलं मी, 'मखमली तारुण्या माझे' (बोल असेच आहेत की माहीत नाही Uhoh ) तसं काहीसं 'मखमली अंग माझे' असं म्हणावं तसा होता तो.

त्याची विडिओ क्लिप. इथे दिसेल की नाही शंका आहे.

फुलाचे फोटो काढताना केलेले काही प्रयोग...

गुलमोहर: 

अय्या... हाच तो किडा...पहिल्या पाउसानंतर अगदी २-३ दिवसच दिसतो! आम्ही याल वेल्वेटचा किडा म्हणायचो!

मल्ल्या गूड कॅच ! Happy

red velvet mite असे गूगलवर सर्च मारलेस की सापडेल हा राणी कीडा.

मल्ल्या, किडेशोधक... बादवे मल्मली तारुण्य माझे... असं आहे रे ते गाणं... च्यामारी "सोनेरी उन्हात हिरव्या रानात," असली गाणी लक्षात ठेवतोस आणि हे रहात नाही होय रे..... ? Proud

अरे हा तर "मृगाचा किडा"!!!! (मृग नक्षत्राच्यावेळी हा दिसतो म्हणुन मृगाचा किडा) हा दिसायला लागला म्हणजे पावसाचे आगमन लवकरच होणार असा संकेत असतो आणि पाऊस सुरु झाल्यावर काहि दिवस दिसत असतो.
बाकि सगळेच फोटो छानच.

मस्त आहे किडा व बाकी सर्व फोटोज..
पाठीवर लाल वेल्वेटचे गाठोडे घेऊन चाललाय दुसर्‍या गावाला असे वाटतेय.
विडीओ क्लीप नाही दिसली..

मल्ल्या अरे हा रेशमाचा किडा आहे मलबेरी झाडावर पाळतात आयथिंक , मस्त आहे ,
नाशिकला आमच्या कडच्या झाडावर खुप असायचे हे किडे

चंदन, सायली, अशु प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

कवड्या, अधीक माहीतीसाठी धन्स रे.

Pages