रांगोळीचा हौशी प्रयत्न

SWAMI_VIVEKANAND.jpg


अश्विनी छानच काढलीयेस रांगोळी, चेहरा (सगळ्यात अवघड असलेले डोळे पण) खुपच चांगला जमलाय.
उजवा गाल (जिथे केशरी कपड्याला तो टच होतोय त्याच्या जवळ) मला थोSSSSडा म्हणजे अगदी जरासा गुबगुबीत वाटतोय स्मित

त. टी. : तु हा फोटो बहुदा सेलफोन कॅमेर्‍याने किंवा दुसर्‍या नेहमीच्या कॅमेराने पण फ्लॅश वापरुन काढलेला दिसतोय. त्यामुळे कपड्यांचा भगवा रंग नीट दिसत नाहीये तो flash मुळे भुरकट केशरी आलाय. शक्य असेल तर परत एकदा फोटो काढ म्हणजे रांगोळी अजुन जास्त उठावदार दिसेल.



अश्विनी- ही रांगोळी आणि त्यातले शेडींग कस करतात त्याची माहीती लिहता येईल का?



धन्यवाद.

रुनी, अगं विवेकानंदांच्या एका चरित्रावरचे कव्हर पाहून हि रांगोळी काढली होती. त्या चित्राप्रमाणे गाल प्रमाणात होता पण तुझ्या लक्षात आले असेल तर त्यांचा डावा खांदाच मी शेवटी शेवटी कंटाळले असल्यामुळे कसातरी काढला आहे. माझ्यात पेशन्स जास्त नसल्याने मी स्केच चिकटवल्यापासून दोन अडिच तासात रंग भरणे उरकते.

हा फोटो माझ्या ऑफिसच्या फोटोग्राफरने काढला होता. पोर्ट्रेट रांगोळीचा हा दुसरा प्रयत्न.

अजय, मी कुठेही शिकले नाही. पण मी काढते त्या प्रमाणे, पहिल्यांदा मूळ चित्रावर squares काढून घ्यायचे (मी त्या कव्हरच्या झेरोक्सवर काढले होते). मग ब्राऊन पेपरच्या खरखरीत बाजूवर योग्य प्रमाणात enlarge केलेले squares काढायचे. मग आपण graph plot करतो किनै तसे टोकदार पेन्सिलने वरपासून चित्र काढायला घ्यायचे. म्हणजे डोळे, भुवया, चेहर्‍याचा angle जमतो. पाहिजे असल्यास जिथे मुळ चित्रात शेड prominently बदलते तिथे outline draw करून घ्यायची. हा पेपर जमीनीवर व्यवस्थित सेलोटेपने चिकटवायचा. रंगांच्या शेड्स आधिच बनवून घ्यायच्या.

जिथे शेड बदलते, तिथे दोन्ही शेड्सचा थोडाथोडा रंग एका कागदावर सारख्याप्रमाणात mix करून बेमालूमपणे भरून टाकायचा. प्रत्यक्ष काढताना as per requirement adjust करता येते. रंग सुध्दा वरूनच खाली भरत यावेत.

ही झाली माझी वेळमारु पध्दत. पण कोणी professional असेल तर त्यांनी योग्य ती पध्द्त सांगितली तर मला देखिल सुधारणा करता येईल.



हि देखील छान आहे स्मित



ही पण रांगोळी छान आली आहे. तुझ्यात बरेच पेशन्स आहेत हां.....

रुनी म्हणते तशी मला पण हे विवेकानंद थोडे रुसलेले वाटले... गाल फुगवून बघताहेत. स्मित



मंजु, स्मित

Option 1 : शिकागोला भारतातुन आणलेला लाडू खाल्ला असेल.
Option 2 : दाढ सुजली असेल.
Option 3 : रुसले असतील.
Option 4 : शिकागोला जनसमुदायाला "माझ्या बंधु भगिनींनो" असे
संबोधल्यावर, त्या माठ लोकांना हे काय बोलले ते कळायला वेळ
लागल्याने वैतागले असतील.

त.टि. : हे सगळे lightly घ्यावे. माझ्यासकट सर्वांनाच त्यांच्याबद्दल अतिशय आदर आहे.



अश्विनी lol

तुझा चौथा ऑप्शन मला जास्त बरोबर वाटतो.... फिदीफिदी



छानच. .. .. ..



वा! डोळे फार सुंदर आलेत. किती चिकाटीचं काम आहे रांगोळीने हे काढायचं म्हणजे!



बढीया आलीये रांगोळी. फेट्यातुन बाहेर आलेले छोटे केस पण मस्त काढलेस.