बोस्टन, मॅसॅच्युसेट्स

बोस्टन, मॅसॅच्युसेट्स मधले मायबोलीकर

Submit to kanokani.com

रच्याकने, आपला समोरासमोर परिचय नाही झालेला माझ्या मते. मी बोस्टन युनिव्हर्सिटी मध्ये गणितामध्ये पीएचडी करत असतो. आणि थोडा वेळ जगूनही घेतो कधीकधी हाहा.

आमच्यकडे पावर नाय. परवा खुप झाडं पडलि. त्यामुळे सध्या बेघर झालो आहे. मित्राकडे राहतो आहे.

अरे बापरे! अजय, वीज कधी येणार म्हणून सांगितलंय? काही लागलं तर कळवा. मी स्नो स्टॉर्मला इथे नव्हते. रविवारी दुपारी भारतातून परत आले.

बापरे अजय अरेरे काही लागलं तर कळवा.
आमच्या इकडे चक्क १ मिनिट सुद्धा वीज गेली नाही..

अरे बापरे! आमच्याहीकडं आहे पावर. झाडांमुळे बाकी काही नुकसान नाही ना? सगळं व्यवस्थित ना? बाकी सगळे लोक व्यवस्थित ना?

बापरे! होप तुम्ही सगळे सुखरूप आहात!

A company in US (Oregon) is currently looking for additional support for phone interpreting, particularly for calls in Marathi.

Due to restrictions with the client who is requesting, they can only work with interpreters who are based in the United States and possess a landline telephone. If you or any of your Marathi friends are interested, please let me know, I can provide contact details.
Contact me on varsha0714@yahoo.com

अजय, वीज आली का घरी? शनिवारी NEMM च्या नाटकाच्या कार्यक्रमाला असणार आहात का? मी, बिल्वा, आदित्य येत आहोत असं दिसतंय. अजून कुणी येतंय का?

नमस्कार बोस्टनकर,

एक दिवसात बोस्टन शहर दर्शन करण्याकरता एखाद्या टूर ची काही माहिती मिळेल का?
'मस्ट सी' अश्या काही जागांची नावे कळाली तर हवीच आहेत.
बहूतेक तरी 'डक टूर' घेणार आहोत तर त्याबद्दलही थोडीफार महिती हवी आहे.

NH मध्ये किंवा बोस्टनच्या जवळपास अजूनही फॉल कलर्स आहेत का?

हा NEMM च्या नाटकाचा कार्यक्रम शनिवारी किती वाजता आहे आणि Waltham पासून जवळ आहे का? असल्यास माबोकरांशी एक धावती भेट होऊ शकेल.

चमन,
बॉस्टन मधल्या टूर्स बद्दल माहिती नाही जास्ती.

बॉस्टन, एन एच एरियात फॉल कलर्स आता नाही मिळणार बघायला.
NEMM चा कार्यक्रम Framingham मध्ये आहे. www.nemm.org वर डिटेल्स मिळतील. कार्यक्रम ४:००वा. चालू होणार आहे.
Waltham पासून १५ मैल साधारण अंतर असेल.

चमन, आमच्याकडे आहेत फॉल कलर्स. स्मित

माहिती बद्दल धन्यवाद बिल्वा. शनिवारी जमत असल्यास इथे नक्की अपडेट करेन.

अन्कॅनी....

तिकडे चेरी ब्लॉसमसाठी नंबर लावणार....आत्ता नाही. स्मित

डक टूर प्रुडेंशियल सेंटर पासून निघते आणि माणशी $३५ च्या आसपास तिकीट असतं बहुतेक. एकदा केली होती -- ठीक ठीक आहे, खास नाही. गाडीतून सगळी ठिकाणं दाखवतात. थंडीत चालायची तयारी असेल तर फ्रीडम ट्रेलची एखादी गायडेड टुअर आहे का बघायला हरकत नाही. बाकी 'मस्ट सी' ठिकाणांकरता 'बोस्टनमधे पहाण्यासारखे' या बा फ वर अजय यांनी दिलेली यादी पहा.

फॉल कलर्स थोडेफार आहेत अजून, माझ्या ऑफिसच्या वाटेवरची निम्मीअधिक झाडे रंगीत आहेत आणि निम्म्यांची पानगळ झाली आहे.

ड्राईव्ह करणार असाल तर वॉल्टहॅम पासून फ्रेमिंगहॅमला जायला साधारण २५ मिनीट लागतील. येणार असाल तर जरूर संपर्कातून कळवा.

मंडळी, काय हालचाल?

बारा एवीएठीला जायचा विचार आहे. अजून कुणी येऊ शकले तर मजा येईल.
http://www.maayboli.com/node/29091

अजयः मला यायला आवडेल.

सुप्रभात बोस्टनकर !!
अजय, एक मुलगी गटगसाठी शुभेच्छा स्मित !

ghoshana green final.jpg

नमस्कार मायबोलीकरांनो!