व्हर्जिनिया / वॉशिंग्टन डी.सी.

व्हर्जिनिया / वॉशिंग्टन डी.सी. मधले मायबोलीकर

Submit to kanokani.com

दीप
माझ्या माहितीत तरी कोणी मायबोलीकर त्या भागात रहात नाहीत. तुम्ही जिथे कामाला येणार आहात त्याच ऑफीसमध्ये ही सगळी चौकशी करा, लवकर उत्तर मिळेल.

quantico हे डिसीपासून थोडे लांब आहे, तिथे मरीन कोअर बेस आहे. तेथून अगदी जवळ असे रहायचे ठिकाण सापडणे कठीण आहे. माझ्या माहितीत तिथे काम करणारी काही मंडळी स्प्रिंगफिल्ड व डेल सिटीला रहातात. अर्थात अपार्टमेंटची माहिती नाही.

धन्यवाद रुनी आणि स्वाती , स्प्रिंगफिल्ड व डेल सिटी सुरक्शित आहे का?

डिसी/व्हर्जिनियामधून कुणी BMM शिकागोला जाणार आहात का?
http://www.maayboli.com/node/27127

आणि आता बॉस्टनच्या गटगचे आमंत्रण करायला आलोय !

http://www.maayboli.com/node/27199

जरूर या !

तुमच्या इथे भुकंप झाला ना? सगळे ठिक आहात ना?

हो आमच्या इथे ५.८ स्केलचा भुकंप झाला. सगळे सुखरूप आहोत काही हाणी झाली नाही. सगळ्यांची फोन वर चौकशी केली. विचारपूशीबद्दल खूप आभार.

ओके सगळे ठिक आहेत ना. गुड. स्मित

काळजी घ्या सगळ्यांनी.

रूनी, भूकंपाचं सेंटर तुमच्याइथे होतं का?

सेंटर आमच्या दक्षिणेला होते साधारण ८० मैल.

ह्म्म म्हणजे जवळच अगदी. तुमची बिल्डिंग खुप हलली वगैरे असेल ना! बाहेर पडल्यावर लगेच मोकळ्या जागा भरपुर आहेत का?

हो बिल्डींग खूप हलल्या.
मी रहाते तिथे बाहेर फार मोकळी जागा नाही त्यामुळे बाहेर पडून उपयोग नव्हता पण नशीबाने काही झाले नाही

हुश्श!

ओह. काळजी घ्या.

बाहेर मोकळी जागा नसेल तर -
वर (कपाटांवर वगैरे) काही जड सामान ठेवले असेल ते काढुन ठेवा खाली.
सहज घसरुन पडणारे जड सामान जसे टिव्ही इ. धक्का दिला तरी पडणार नाही असे ठेवा.
एखादे स्ट्राँग टेबल वगरे नोट करुन ठेवा , भुकंप झाला तर त्या खाली बसता येईल.
आणि घरातल्या सगळ्यांशी बोलुन इमर्जन्सी मधे कोणी कुठे भेटायचे/ थांबायचे, मुलांना कोणी पिकअप करायचे ते ठरवुन ठेवा ( ट्रेन, फोन बिन सगळं बंद झाल्यावर कॉन्टॅक्ट होणार नाही म्हणुन)
उदा. खुप मोठा भुकंप झाला, कम्युनिकेशन बंद झालं तर आम्ही दोघे एका ठिकाणी वाट बघणार एकमेकाची १ तास वाट बघुन भेटलो नाहीतर मुलांना पिकअप करायला चालायला सुरुवात करणार इ.

Davandi2riksha3.jpg

लोकहो... मायबोली गणेशोत्सवाच्या स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची दुसरी दवंडी झाली बरंका!
अहो, विचार काय करत बसलात? चला पटापट! गणेशोत्सव स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तयारीला लागा!

स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची सविस्तर माहिती बघण्यासाठी इथे टिचकी मारा!

ग्रेटर वॉशिन्ग्टन मंडळाचा गणपती..

mkmdcganesh.jpg

TV Asia वर गुरुवारी 'कम्युनिटी राऊंडअप' मध्ये लेझिम, मिरवणूक पहा..

लालू नाटक कसं झालं? आरास जोरदार आहे.

thangathang_final.jpg

नमस्कार मंडळी!!

गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला, रिकामं रिकामं वाटतय ना; बाप्पांना 'पुढच्या वर्षी लवकर या' सांगून निरोप दिला तरी निवांत बसायला वेळ आहेच कुठे? कारण दिवाळी अंकासाठी लिखाण करायचंय!

नवरात्र, कोजागरी आणि इतर कामांच्या गडबडीत तुम्हा सगळ्यांना दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचा विसर पडू नये म्हणून हा प्रपंच ! याही वर्षी अंकात एक खास, वेगळा विभाग असणार आहे. त्याची माहिती पुन्हा एकदा वाचायची आहे? ही काय या इथे दिवाळी अंकाची केव्हाच घोषणा झाली आहे! तेव्हा त्या अनुषंगानं साहित्य पाठवण्याचं लक्षात असू द्या. आपल्या कथा, ललित लेख, विनोदी लेख, कविता, गझलांशिवाय अंकाला शोभा नाही! तेव्हा लवकरात लवकर लिहिण्याचं मनावर घ्या. आम्ही आपल्या कलाकृतींची वाट पाहत आहोत.

तुमचं साहित्य २ ऑक्टोबर, २०११ च्या आत संपादक मंडळाकडे सुपूर्त व्हायला हवं. लागणार ना लिखाणाला?

दिवाळी अंकात साहित्य पाठवण्यासाठी काही मदत लागली तर नि:संकोच sampadak@maayboli.com या पत्त्यावर ईमेल पाठवून किंवा 'विचारपुशी'त जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.

आपले,

संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २०११

स्मित

नमस्कार मायबोलीकरांनो!