सिंहगड रोड

Submitted by admin on 1 April, 2008 - 18:42
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा शुके आलीस का. बरे झाले. हातोहात तो गुब्बी धागा वाचुन ये बरं. Proud

सध्या सावली, गुब्बनंतर आता रैनावर पण धागा आलाय.

लिंब्या आता कुठली गाडी आहे.

>>> लिंब्या आता कुठली गाडी आहे. <<<< उधारउसनवारीमध्ये जी मिळेल ती गाडी पळवतो... Proud आत्ता मेव्हण्याची घेतली होती, झेनचे लेटेस्ट मॉडेल होते कोणते तरी......

>>>> लिंब्या उगाच बळचकर बरं का पण ते. <<<<<
बळंचकरं असे तुझे मत, ठिक आहे. पण बळंचकरं अस्त तर बारा वर्षात "विशिष्ट शहरातले विशिष्ट लोकं" इकडे फिरकले नाहीत हे पण "बळंचकरं" असणार ना? Wink

मी आश्चर्यचकीत! एवढे नविन मेसेज गडावर!!
शुभांगी, मनपाच्या निवडणुकीत व्यस्त होतीस का? Wink

सोलापूर हायवे- बातच नाय काय. एक नंबर आहे अगदी.>>

मी हैदराबाद-पुणे २-३ वेळा केले कार ने. सोलापुर पुणे मज्जा आणि सोलापूर हैदराबाद सजा... सगळी मज्जा खिळखीळी पुढच्या त्याप्रवासात!

लिंब्या टेंभुर्णी फाट्याजवळ एक ढाबा वजा हॉटेल आहे अगदी साधेच पण तिथली मिसळ अ फ ला तू न असते अगदी.

किशोर, नाही रे मनपा नाही अजुन, आम्ही आमच्या वॉर्डातच आहे अजुन तरी Wink

केपी, वाचला मी त्याच दिवशी तू सांगितल्यावर.

नमस्कार "निष्ठावंत गडकरीज"....
किस्ना, तुला पेशल नमस्ते,
झकोबा, तुला पेशल रामराम,
राज्या, तुला इस्पेशल दंडवत....

बाकी सार्‍यांना मानाप्रमाणे नमस्कार/चमत्कार व आशिर्वाद....

नमस्कार "निष्ठावंत गडकरीज"....
किस्ना, तुला पेशल नमस्ते,
झकोबा, तुला पेशल रामराम,
राज्या, तुला इस्पेशल दंडवत....

बाकी सार्‍यांना मानाप्रमाणे नमस्कार/चमत्कार व आशिर्वाद....

काल आख्खा दिवस २०० किमी बीआरएम करता स्वयंसेवक म्हणुन होतो.
माझे मोटरसायकलवरुन एकुण २५० किमि फिरणे झाले.
पहाटे ३ ला उठुन, आवरुन लिंबीसोबत सव्वापाचला चांदणी चौकात पोहोचलो.
तिथुन ६ वाजता बीआरएम मार्गस्थ झाल्यावर साधारण अर्ध्या तासानंतर आम्ही सोलापुर रस्त्यावरील केडगाव-चौफुला कडे जाण्यास निघालो. अंतर ६५ किमि.
आम्ही निघाल्यावर वाटेत पुढे गेलेले सायकलस्वार भेटत होते ते हडपसरच्या पुढे.... सगळ्यात पुढील सायकलस्वाराने लोणी ओलांडले होते. जबरी स्पीडने चालले होते. मी वाटेत कामत रेस्टॉरंटला थांबलो नाष्टा करायला, तोवर समोरुन काही सायकलस्वार जाताना दिसले.
घाईघाईत नाष्टा शब्दशः गिळून पुढे निघालो.
चौफुल्याच्या चेकपोस्ट वर पोहोचुन बाईक लावेस्तोवर मागुन पहिला सायकलस्वार आलाही.
या चेकपोस्टचे उघडण्याची वेळ होती ७:५५, तर पहिला सायकलस्वार पोहोचला ८:१० ला....
ते चेकपोस्ट साडेदहाला बंद केल्यावर तिकडुन निरा लोणंद मार्गे खंडाळ्याला गेलो. अंतर ७५ किमी. वाटेत मोरगाव लागते, तिथे मंदिरात जाऊन बाहेरुनच नमस्कार करुन परत फिरलो. गर्दी होती.
खंडाळ्यात पोहोचल्यावर तिथे आधीच एक सहकारि ते पोस्ट सांभाळत होते, त्यांना सोबत देऊ लागलो. मध्येच तासभर त्यांना जेवायला सोडले.
ते चेकपोस्ट साडेतिनला बंद केल्यावर निघालो, ते वाटेत खेडशिवापुरला अर्धा तास पिठल भाकरी वगैरे खाऊन निगडीला ठिक ६ वाजता पोहोचलो. Happy
एकंदरीत कालचा दिवस धामधुमीचा गेला.
खंडाळा चेकपोस्ट वर "स्थानिक आडग्यांची" दादागिरिही अनुभवायास मिळाली. ती दादागिरि मोडून कशी काढली गेली तो किस्सा परत कधीतरी सांगेन. इंटरेस्टींग आहे.

सुप्रभात. Happy

लिंब्या कसली दादागिरी?

नमस्कार "निष्ठावंत गडकरीज"....
किस्ना, तुला पेशल नमस्ते,
झकोबा, तुला पेशल रामराम,
राज्या, तुला इस्पेशल दंडवत....

बाकी सार्‍यांना मानाप्रमाणे नमस्कार/चमत्कार व आशिर्वाद....

नमस्कार "निष्ठावंत गडकरीज"....
किस्ना, तुला पेशल नमस्ते,
झकोबा, तुला पेशल रामराम,
राज्या, तुला इस्पेशल दंडवत....

बाकी सार्‍यांना मानाप्रमाणे नमस्कार/चमत्कार व आशिर्वाद....

नमस्कार "निष्ठावंत गडकरीज"....
किस्ना, तुला पेशल नमस्ते,
झकोबा, तुला पेशल रामराम,
राज्या, तुला इस्पेशल दंडवत....

बाकी सार्‍यांना मानाप्रमाणे नमस्कार/चमत्कार व आशिर्वाद....

बादवे तुम्ही भेटणार असाल तर रविवारी भेटा मला जमेलस वाटत नाही माझ्याकडे जेष्ठनागरीक सभा आहे (साबा, साबू, आई, काकू, मावशी, आत्या - माझ्या आणि नवर्‍याच्या) त्यामुळे सरबराई आणि पत्थ्यपाण्यात दिवस जाईल.

कृ, माझ्यासाठी मोती आणलाच तर केपी कडे देऊन ठेव तो कधीतरी कुठेतरी नक्की भेटेलच. किंवा मग तुम्ही माझ्या घरी येत असाल तर वेलकम.