चपाती कशी करायची ????

Submitted by सुक on 26 April, 2010 - 14:09

इथे US मधे चपाती कशी करायची ???
मी येताना आणलेला तवा मधे थोडा खोलगट आहे.... Sad Sad Sad

जाण्काराणा विनंती .... मार्गदर्शन करा....
plz...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे US मधे चपाती कशी करायची ??? >> इंडियात करतो अगदी शेम टु शेम तशीच Proud
जोक्स अपार्ट, इथे प्रीतीने भाकरी आणि फुलक्यांचा विडीओ टाकला आहे.

परदेसाई, श्री, प्रीति .... मौल्यवान suggestions साठी धन्यवाद...
पण हे सगळा मला महिती आहे.... मी चपाती बनवण्यामध्ये प्रवीण आहे.... India मधे...
खास कोल्हापुरी styale च्या चपात्या मला छान जमतात....
पण इथे थोडा अवघड पडतय कारण माझा तवा खोलगट आहे..... म्हणुन म्हनला बघु विचारुन बघु कोणी मदत केली तर.... anyways.. thanks.

@तोषवी, Thanks Happy मी बघते ती पोस्ट.

तवा खोलगट असला म्हणुन काय झाल? सेम मेथड च वापरायची. तवा थोडा खोलगट असेल तर उलट चपात्या छान भाजल्या जातात. खुप खोलगट असेल तर भाकरी मस्त होतात. (इति आई)
तवा खोलगट असल्यान इलेक्ट्रिक कॉइल असेल तर ठेवायला त्रास होतो एवढाच काय तो फरक.

अग सीमा,
coil वर तवा evenly तापत नाही.. Sad
एकिकडे कच्ची आणि एकिकडे करपलेली अशी होतीये ...

Coil असेल तर Non-stick चा Flat तवा विकत आणा... तो सगळीकडून सारखा तापेल.. (डोसे पण करता येतील...)

तंगड्या ओढून स्वागत ही इथली पद्धत आहे.. तेव्हा स्वागत.. Happy

ह्म्म्म्म.......ठीक आहे.... Sad
मला वाटलं आहे त्यात काहि करता आला तर बघावं...
मी काही इथे फार दिवस नाहिये म्हनुन....

ह्म्म्म.... thanks प्रीति.

परदेसाई... तुमचे ही आभार. Happy

गावात युनिव्हर्सिटी असेल तर देसी स्टुडंटसना विचार आता ग्रॅज्युएशन होऊन बरेच जण सोडून जात असतात आपले आख्खे संसार. त्यात फुकटमधे लॉटरी लागली तर लागेल.

नीरजा, मीही अगदी हेच लिहायला आले होते. मिनेसोटात 'लोकलफाईल्स' अशी एक साईट होती तशी ह्यूस्टनमध्ये एखादी आहे का विचारुन बघ. तुझ्या आसपास राहणार्‍या भारतीयांनी स्वस्तात विकायला काढलेल्या वस्तू/ भांडी विकत घेता येतील म्हणजे जाताना फेकून देताना त्रास होत नाही.

मी उसगावात विद्यार्थीनी म्हणूनच राह्यलीये. तेव्हा पाठ केलेला फुकट ते पौष्टीक हा मंत्र माझा अजून पाठ आहे. तेव्हा मी हाच सल्ला पहिला देणार.. Proud

सुक, नीधपने बरोबर सांगितलय, देसी स्टुडंट बराच संसार सोडुन जातात. अजुन १ म्हणजे लोकल न्युज-पेपर मध्ये गराज सेलच्या बर्‍याच अ‍ॅड भेटतील किंवा तुम्ही ज्या गावात राहता तिथला "गराज सेल+पिनकोड" असा गुगल सर्च द्या.

सुक, तात्पुरता तोच तवा वापरायचा असेल तर तवा आधी तापत ठेवा बराच वेळ,
आणि पोळी लाटताना मध्ये जाड होईल अशी लाटा, म्हणजे मध्ये करपणार नाही
आणि शक्यतो सर्व बाजूंनी भाजली जाईल.